8 December | 8 डिसेंबर दिनविशेष शालेय परिपाठ, Daily Routine

8 December

8 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-  शुक्रवार  

दिनांक-  08/12/2023, 8 डिसेंबर

मिती-  कार्तिक कृष्ण पक्ष 11

शके- 1945

सुविचार- गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.

म्हणी व अर्थ – 

दृष्टी आड सृ्ष्टि- अर्थ ::~  जे प्रत्यक्षात नाही त्याविषयी उदासीन होणे.

वाक्यप्रचार- छळ करणे – त्रास देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४१ वा किंवा लीप वर्षात ३४२ वा दिवस असतो.

विसावे शतक

  • १९१४ – पहिले महायुद्ध-फॉकलंड बेटांचे युद्ध – कैझरलिक मरिन्सने ॲडमिरल ग्राफ मॅक्सिमिलियन फोन स्पीच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश नौदलावर हल्ला चढविला.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध – जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला उत्तर देण्यास अमेरिकन काँग्रेसने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध-पॅसिफिक युद्ध – जपानने केलेल्या आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्यानंतर अमेरिकेस पाठिंबा देण्यास चीनने जपानविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध-हॉंगकॉंगचे युद्ध – आदल्या दिवशीच्या पर्ल हार्बरवरील हल्ल्याला आठ तास होतात तो जपानने ब्रिटीश वसाहत असलेल्या हॉंग कॉंगवर आक्रमण केले.
  • १९४१ – ज्यूंचे शिरकाण – लॉद्झ जवळील चेल्म्नो कॉंसेंट्रेशन कॅम्पमध्ये कैद्यांना मारण्यासाठी विषारी वायुवाहनांचा उपयोग प्रथमच केला गेला.
  • १९६६ – समुद्रातील वादळात ग्रीसची फेरी बोट हेराक्लियोन बुडाली. २०० ठार.
  • १९६९ – ऑलिम्पिक एरवेझचे डी.सी.६-बी. जातीचे विमान अथेन्सजवळ वादळात कोसळले. ९३ ठार.
  • १९७६ – ईगल्सनी हॉटेल कॅलिफोर्निया प्रकाशित केले.
  • १९८० – मार्क चॅपमनने न्यू यॉर्क मध्ये डकोटा बिल्डींगच्या बाहेर जॉन लेननचा खून केला.
  • १९९१ – रशिया, बेलारूस व युक्रेनच्या नेत्यांनी सोवियेत संघराज्य विसर्जित केले व स्वतंत्र देशांचे राष्ट्रकुल स्थापन केले.
  • १९९८ – ताद्जेना कत्तल – अल्जीरियात अतिरेक्यांनी ८१ लोकांना ठार केले.

जन्म

  • ६५ – होरेस, रोमन कवि.
  • १५४२ – मेरी स्टुअर्ट, मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स, स्कॉटलंडची राणी.
  • १७०८ – फ्रांसिस पहिला, पवित्र रोमन सम्राट.
  • १८६१ – चार्ल्स लेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ – अर्नी टोशॅक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१७ – इयान जॉन्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२२ – जॉर्ज फुलरटन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२७ – प्रकाशसिंग बादल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री
  • १९३६ – पीटर पार्फिट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ – बस्टर फॅरर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४२ – हेमंत कानिटकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४६ – वॉरेन स्टॉट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ – मेल्ट व्हान स्कूर, नामिबियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ८९९ – कॉरिंथियाचा आर्नुल्फ.
  • १६२६ – जॉन डेव्हीस, ब्रिटीश कवी.
  • १६३२ – फेलिपे व्हान लान्सबर्ग, फ्लेमिश अंतराळतज्ञ.
  • १९६३ – सरित धनरजता, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९७८ – गोल्डा मायर, इस्रायेलची पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

  • विद्यार्थी दिन (स्टुदेन्स्की प्राझ्निक) – बल्गेरिया.
  • मातृ दिन – पनामा.
  • संविधान दिन – रोमेनिया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

ऊठ पंढरीनाथा
ऊठ ऊठ पंढरीनाथा ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा पुंडलिक वरदा
अस्त पातलासे चंद्रा, तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली, जाग ये सुगंधा
पात्र पाणियाचे हाती उभी असे भीमा
दर्शनास आले तुझिया ज्ञानदेव, नामा
भक्‍तराज चोखामेळा दुरून देई सादा
देह-भाव मिळुनी केला काकडा मनाचा
निघून धूर गेला अवघ्या आस-वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही उजळण्या अवेदा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

अतृप्त मन 
     ━━•●◆●★●◆●•━━
हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता.
पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते.
गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले.
असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई.
आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला.
लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला.
आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला.
तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.
तात्पर्य-
कुठलेही कसलेही दिवस आले तरी,अतृप्त मनाच्या मानसाचे समाधान कधीच होत नाही.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

स्वातंत्र्य प्राण
भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी
सैनिक हो तुमच्यासाठी
वावरतो फिरतो आम्ही नित्यकर्म अवघे करतो
राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो
परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी
आराम विसरलो आम्ही आळसा मुळी ना थारा
उत्तरेकडुनि या इकडे वार्तांसह येतो वारा
ऐकताच का अश्रुंची डोळ्यांत होतसे दाटी
उगवला दिवस मावळतो अंधार दाटतो रात्री
माउली नीज फिरवीते कर अपुले थकल्या गात्री
स्वप्‍नात येउनी चिंता काळजा दुखविते देठी
रक्षिता तुम्ही स्वातंत्र्या प्राणांस घेउनी हाती
तुमच्यास्तव आमुची लक्ष्मी तुमच्यास्तव शेतीभाती
एकट्या शिपायासाठी झुरतात अंतरे कोटी

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो ?
➜ पहिला.
✪ भारतीय शास्त्रीय संगीताच्या दोन प्रमुख पद्धती कोणत्या ?
➜ हिंदुस्थानी संगीत,कर्नाटकी संगीत.
✪ भारताची राजधानी कोणती आहे ?
➜ नवी दिल्ली.
✪  भारताचे प्रवेशद्वार कोणते ?
➜ गेट वे ऑफ इंडिया.
✪ भारतातील प्रमुख व्यवसाय कोणता आहे ?
➜ शेती

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#8 december, 8 december 2023, 8 december 2021 panchang, 8 december 2022 special day, 8 december 2023 weather, 8 december 2022 panchang in hindi, 8 december is celebrated as, what is celebrated on 8 december, 8 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.