12 December | 12 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

12 December 

12 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- मंगळवार 

दिनांक-  12/12/2023, 12 डिसेंबर

मिती- कार्तिक कृष्ण 30, दर्श अमावस्या

शके– 1945

सुविचार- जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.

म्हणी व अर्थ – अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ. दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.

वाक्यप्रचार- कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४५ वा किंवा लीप वर्षात ३४६ वा दिवस असतो.

सातवे शतक

  • ६२७ – निनेवेहची लढाई – हेराक्लियसच्या बायझेन्टाईन सैन्याने खुस्रो दुसऱ्याच्या पर्शियन सैन्याला हरविले.

अकरावे शतक

  • १०९८ – पहिली क्रुसेड – मा’अरात अल् नुमानची कत्तल – शहराची तटबंदी फोडून क्रुसेडर आत घुसले व २०,००० रहिवाश्यांची कत्तल उडविली. शहरात पुरेसे अन्न न मिळाल्याने त्यांनी मानवमांस खाल्ले.

अठरावे शतक

  • १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीने पहिल्यांदा निकोबार बेटांमध्ये प्रवे केला.
  • १७१९ – बॉस्टन गॅझेटचे प्रकाशन.
  • १७८१ – अमेरिकन क्रांती-उशान्तची दुसरी लढाई – रिअर ॲडमिरल रिचर्ड केम्पेनफेल्टच्या एच.एम.एस.व्हिक्टरी या युद्धनौकेच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश नौदलाच्या स्क्वॉड्रनने फ्रेंच तांड्याला हरविले.
  • १७८७ – पेनसिल्व्हेनिया अमेरिकेचे संविधान मान्य करणारे दुसरे राज्य ठरले.

विसावे शतक

  • १९०१ – न्यू फाउंडलंडमधील सेंट जॉन गावातील सिग्नल हिल येथे गुग्लियेल्मो मार्कोनीने प्रथम अटलांटिक महासागरापलीकडचा रेडियो संदेश पकडला.
  • १९११ – ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने भारताची राजधानी कोलकातायेथून दिल्लीला हलविली.
  • १९२५ – इराणच्या मजलिसने रझा खानची शाहपदी निवड केली.
  • १९३९ – हिवाळी युद्ध-तोल्वाजार्विची लढाई – फिनलंडच्या सैन्याने प्रथम सोवियेत युनियनविरूद्ध विजय मिळविला.
  • १९४१ – ब्रिटनने बल्गेरियाविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९६३ – केन्याला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९६४ – जोमो केन्याटा केन्याच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९७९ – ऱहोडेशियाचे नामांतर. नवीन नाव झिम्बाब्वे.
  • १९८५ – ऍरो एर फ्लाइट १२८५ हे डी.सी.८ जातीचे विमान न्यू फाउंडलंडमधील गॅन्डर विमानतळावरून उडताच कोसळले. २५६ ठार. मृतांमध्ये अमेरिकेच्या १०१व्या एरबॉर्न डिव्हिजनचे २४८ सैनिक.
  • १९९० – पाकिस्तान अंटार्क्टिकाला अभियान पाठविणारा ३७वा देश ठरला.
  • २००१ – भारतीय हवाई दलासाठी खास विकसित केलेल्या अधिक मोठ्या पल्ल्याच्या पृथ्वी क्षेपणास्त्राची बालासोर येथे यशस्वी चाचणी.
  • २००० – अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयने बुश वि. गोर खटल्यात निकाल दिला. ज्यॉर्ज डब्ल्यू. बुश राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म

  • १२९८ – ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक आल्बर्ट दुसरा.
  • १५७४ – डेन्मार्कची ऍन, इंग्लंडचा राजा जेम्स पहिला याची राणी.
  • १८७२ – बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
  • १८९२ – गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’’धूमकेतू’’, गुजराती कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे.
  • १९०२ – अ. ना. भालेराव, संपादक व मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक.
  • १९०५ – डॉ. मुल्कराज आनंद, हिंदी लेखक.
  • १९०७ – खेमचंद प्रकाश, भारतीय संगीतकार
  • १९४० – शरद पवार, भारतीय राजकारणी,केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
  • १९४१ – गोपीनाथ मुंडे, भारतीय राजकारणी,केंद्रीय मंत्री,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री
  • १९५० – रजनीकांत तथा शिवाजीराव गायकवाड, भारतीय अभिनेता.
  • १९८१ – युवराजसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ८८४ – कार्लोमान, पश्चिमी फ्रॅंक्सचा राजा.
  • १५७४ – सलीम दुसरा, ऑटोमन सुलतान.
  • १६८५ – जॉन पेल, ब्रिटिश गणितज्ञ.
  • १८४३ – विल्यम पहिला, नेदरलॅंड्सचा राजा.
  • १९१३ – मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
  • १९३० – बाबू गेनु, पुण्यात परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना.
  • १९६४ – मैथिलिशरण गुप्त, हिंदी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली.
  • १९९१ – दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर, शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६)
  • १९९२ – पं. महादेव शास्त्री जोशी, भारतीय संस्कृतिकोशाचे लेखक.
  • १९९२ – जसु पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • २००० – जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल, कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ ऑक्टोबर १९९९)
  • २००४ – निरंजन उजगरे, मराठी कवी.
  • २००५ – रामानंद सागर, हिंदी चित्रपट निर्माते
  • २०१५ – शरद जोशी, महाराष्ट्रातील शेतकरी नेता.

प्रतिवार्षिक पालन

  • केन्या – स्वातंत्र्य दिन.
  • स्वदेशी दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

संत स्वभाव 
एक संत कपडे शिवून आपला चरितार्थ चालवीत होते. एक मनुष्य  त्यांच्याकडूनच कपडे शिवून घ्यावयाचा व कपडे खूप शिवायचा परंतू पैसे देतांना तो प्रत्येक वेळी खोटी नाणी द्यावयाचा संतही काही न बोलता गुपचूपपणे त्याचा स्वीकार करावयाचे.
एकदा संत काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दुकानावर त्यांचा नोकर होता.
जेव्हा त्या गिऱ्हाईकाने शिलाई  दिली तेव्हा सेवकाने त्याच्याकडे दुसरे पैसे मागितले व खोटे दिल्याबद्दल आग पाखडण्यास सुरुवात केली.
संत गावाहून परत आल्यावर सेवकाने त्यांच्या कानावर सर्व हकीकत घातली  व तो माणूस कसा फसवीत होता ते सांगितले.
संत त्यावर म्हणाले, “तू ती खोटी नाणी का नाही घेतलीस?
मला तर तो प्रत्येक वेळेस बनावट नाणी देतो. मी ती घेतो व जमिनीत पुरु टाकतो.
मी ती स्वीकारली नाहीत तर दुसरा कोणीतरी दरवेळेस त्याच्याकडून फसवला जाईल.
तात्पर्य : दुसऱ्यांचा विचार करून स्वतः त्रास सहन करण्याची  प्रवृती म्हणजे संतप्रवृत्ती.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

चिर विजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिर विजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येय पथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळि काळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिर विजयाचे वारस आम्ही॥४॥

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) धरण कशाला म्हणतात ?
उत्तर : धरण म्हणजे पाणी साठवण्यासाठी बांधलेला अडथळा
2) जगातील सर्वात उंच धरण कोणते?
उत्तर : नुरेक धरण (ताजिकिस्तान) हे जगातील सर्वात उंच धरण आहे.
3) भारतातील पहिले धरण कोणते?
उत्तर : कावेरी  नदीवरील कल्लनाई धरण  हे भारतातील पहिले धरण आहे.
4) भारतातील सर्वात लांब धरण कोणते?
उत्तर : हिराकुड धरण (ओरिसा) हे भारतातील सर्वात लांब धरण आहे
5) भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर : भाखरा नांगल धरण सतलज नदीवर आहे.

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans : The dog guards the house.
2) Which animal is useful for agricultural work?
Ans : Bullock is useful for agricultural work.
3) What does a cow give?
Ans : Cow gives a milk.
4) Which is the fastest running animal?
Ans : Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans : The cat is called the tiger’s aunt.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#12 december, 12 december, 12 december 2023, 12 december 2021 panchang, 12 december 2022 special day, 12 december 2023 weather, 12 december 2022 panchang in hindi, 12 december is celebrated as, what is celebrated on 12 december, 12 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.