13 December | 13 डिसेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

13 December

13 डिसेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार 

दिनांक-  13/12/2023, 13 डिसेंबर

मिती- मार्गशीर्ष शुक्ल 1, देवदीपावली 

शके– 1945

सुविचार- मनुष्याची सर्वात श्रेष्ठ संपत्ती म्हणजे त्याचे उत्तम चारित्र्य.

म्हणी व अर्थ – आत फिरे तिथे लक्ष्मी फिरे- अर्थ :- ज्या घरी स्वच्छता असते त्या घरी धनधान्य,संपत्ती भरपूर असते.

वाक्यप्रचार- कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.

ठळक घटना आणि घडामोडी

डिसेंबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४७ वा किंवा लीप वर्षात ३४८ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५४५ – ट्रेंटची समिती सुरू.
  • १५७७ – सर फ्रांसिस ड्रेक पृथ्वी प्रदक्षिणेला प्लिमथ, इंग्लंड येथून निघाला.

सतरावे शतक

  • १६४२ – एबेल जान्स्झून तास्मान न्यू झीलंडला पोचला.

एकोणिसावे शतक

  • १८६२ – अमेरिकन यादवी युद्ध – फ्रेडरिक्सबर्गच्या लढाईत कॉन्फेडरेट जनरल रॉबर्ट ई. लीने युनियन जनरल ऍम्ब्रोस ई. बर्नसाइडला हरविले.

विसावे शतक

  • १९३० – ’प्रभातचा’ ’ उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
  • १९३७ – दुसरे चीनी-जपानी युद्ध-नानजिंगची लढाई – जपानी सैन्याने नानजिंग काबीज केले.
  • १९३८ – ज्यूंचे शिरकाण – साख्सेनहौसेनहून आणलेल्या १०० कैद्यांनी हांबुर्गजवळील नॉएनगॅम कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प बांधला.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध-रिव्हर प्लेटची लढाई – ब्रिटीश नौदलाच्या क्रुझर एच.एम.एस. एक्झेटर, एच.एम.एस. अजॅक्स व एच.एम.एन.झेड.एस. अकिलिसशी दिलेल्या झुंजीत पराभव अटळ दिसत असता जर्मनीच्या कॅप्टन हान्स लॅंग्सडॉर्फने आपली पॉकेट बॅटलशिप ॲडमिरल ग्राफ स्पी बुडविली.
  • १९४१ – दुसरे महायुद्ध – हंगेरी व रोमेनियाने अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारले.
  • १९७४ – माल्टा गणतंत्र झाले.
  • १९७७ – अमेरिकन सरकारचे डी.सी.३ जातीचे विमान एव्हान्सव्हिल प्रादेशिक विमानतळाजवळ कोसळले. २९ ठार. मृतांमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ एव्हान्सव्हिलचा बास्केटबॉल संघ.
  • १९८१ – पोलंडमध्ये जनरल वॉयसियेक यारूझेल्स्कीने लश्करी कायदा (मार्शल लॉ) लागू केला.
  • १९९६ – कोफी अन्नान संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीसपदी.
  • २००० – आदल्या दिवशी अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बुश वि. गोर खटल्याच्या निकालानंतर अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूकीत ऍल गोरनी हार मान्य केली.

एकविसावे शतक

  • २००१ – पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला. पाचही अतिरेकी व सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ८ अन्य व्यक्ती ठार.
  • २००२ – ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • २००२ – सायप्रस, चेक प्रजासत्ताक, एस्टोनिया, हंगेरी, लात्व्हिया,

लिथुएनिया, माल्टा, पोलंड, स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना युरोपीय संघात मे १, २००५ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.

  • २००३ – इराकी अध्यक्ष सद्दाम हुसेनला तिक्रीतजवळ पकडले.
  • २००३ – प्रसिद्ध बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांना ऑफिसर ऑफ आर्टस ऍन्ड लिटरेचर हा फ्रान्सचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी किताब जाहीर.

जन्म

  • १५२१ – पोप सिक्स्टस पाचवा.
  • १५३३ – एरिक चौदावा, स्वीडनचा राजा.
  • १५५३ – चौथा हेन्‍री, फ्रान्सचा राजा.
  • १५८५ – हॉथोर्न्डेनचा विल्यम ड्रमोंड, स्कॉटिश कवी.
  • १६७८ – यॉंग्झेंग, चीनी सम्राट.
  • १८१६ – वेर्नर बॉन सीमेन्स, सीमेन्स उद्योग समूहाचा पाया घालणाऱ्या सीमेन्सचा जन्म
  • १८१८ – मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
  • १८५४ – थॉमस वॉट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस.
  • १८९९ – पांडुरंग सातू नाईक, मराठी सिनेमॅटोग्राफर.
  • १९१३ – आर्ची मूर, मुष्टियोद्धा.
  • १९२४ – विद्याधर पुंडलिक, साहित्यिक.
  • १९२८ – सरिता पदकी, बालवाङ्मय लेखिका.
  • १९५५ – मनोहर पर्रीकर, गोव्याचे मुख्यमंत्री, भारताचे संरक्षणमंत्री.

मृत्यू

  • १०४८ – अल बिरूनी, ईराणी गणितज्ञ.
  • ११२४ – पोप कॅलिक्स्टस दुसरा.
  • १२०४ – फ्रेडरिक दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९८६ – स्मिता पाटील, हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेत्री.
  • १९९४ – विश्‍वनाथ अण्णा ऊर्फ तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक.
  • १९९६ – श्रीधर पुरुषोत्तम ऊर्फ शिरुभाऊ लिमये , भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक.

प्रतिवार्षिक पालन

  • माल्टा – प्रजासत्ताक दिन
  • नागरी संरक्षण दिन

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

संत स्वभाव 
एक संत कपडे शिवून आपला चरितार्थ चालवीत होते. एक मनुष्य  त्यांच्याकडूनच कपडे शिवून घ्यावयाचा व कपडे खूप शिवायचा परंतू पैसे देतांना तो प्रत्येक वेळी खोटी नाणी द्यावयाचा संतही काही न बोलता गुपचूपपणे त्याचा स्वीकार करावयाचे.
एकदा संत काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दुकानावर त्यांचा नोकर होता.
जेव्हा त्या गिऱ्हाईकाने शिलाई  दिली तेव्हा सेवकाने त्याच्याकडे दुसरे पैसे मागितले व खोटे दिल्याबद्दल आग पाखडण्यास सुरुवात केली.
संत गावाहून परत आल्यावर सेवकाने त्यांच्या कानावर सर्व हकीकत घातली  व तो माणूस कसा फसवीत होता ते सांगितले.
संत त्यावर म्हणाले, “तू ती खोटी नाणी का नाही घेतलीस?
मला तर तो प्रत्येक वेळेस बनावट नाणी देतो. मी ती घेतो व जमिनीत पुरु टाकतो.
मी ती स्वीकारली नाहीत तर दुसरा कोणीतरी दरवेळेस त्याच्याकडून फसवला जाईल.
तात्पर्य : दुसऱ्यांचा विचार करून स्वतः त्रास सहन करण्याची  प्रवृती म्हणजे संतप्रवृत्ती.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

या भारतात बंधुभाव..
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे
सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे
जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे
सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪  सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?
  ➜ पाटलीपुत्र.
 ✪  जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?
  ➜ १ मे.
 ✪  जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?
  ➜ पॅसिफिक महासागर.
 ✪  खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
  ➜ खुदा-ई-खिदमदगार.
 ✪  छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?
➜ रायगड

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans : The dog guards the house.
2) Which animal is useful for agricultural work?
Ans : Bullock is useful for agricultural work.
3) What does a cow give?
Ans : Cow gives a milk.
4) Which is the fastest running animal?
Ans : Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans : The cat is called the tiger’s aunt.

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#13 december, 13 december, 13 december 2023, 13 december 2021 panchang, 13 december 2022 special day, 13 december 2023 weather, 13 december 2022 panchang in hindi, 13 december is celebrated as, what is celebrated on 13 december, 13 december 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.