27 october | 27 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

27 october

27 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक-  27/10/2023, 27 ऑक्टोबर

मिती-  आश्विन शुक्ल 13

शके– 1945

सुविचार- पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.

म्हणी व अर्थ – दुष्काळात तेरावा महिना- संकटात अधिक भर.

वाक्यप्रचार- दाती तृण धरणे- शरण जाणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०० वा किंवा लीप वर्षात ३०१ वा दिवस असतो.

सतरावे शतक

  • १६८२ – फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया शहराची स्थापना.

एकोणिसावे शतक

  • १८१० – अमेरिकेने पश्चिम फ्लोरिडा बळकावले.
  • १८३८ – मिसूरीच्या गव्हर्नर लिलबर्न बॉग्सने मॉर्मोन पंथील लोकांना राज्य सोडून जाण्यास फर्मावले. तसे न केल्यास त्यांचे शिरकाण करण्याची धमकी दिली.

विसावे शतक

  • १९२२ – ऱ्होडेशियाच्या जनतेने दक्षिण आफ्रिकेत सामील होण्याचे आवाहन धुडकावले.
  • १९२४ – उझबेक एस.एस.आर.ची स्थापना.
  • १९५८ – पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झाला पदच्युत केले.
  • १९७१ – कॉंगोच्या लोकतांत्रिक प्रजासत्ताकने आपले नाव बदलून झैर केले.
  • १९७३ – कॉलोराडोच्या फ्रिमॉंट काउंटीत १.४ कि.ग्रा. वजनाची उल्का जमिनीपर्यंत पोचली.
  • १९८६ – युनायटेड किंग्डमने आर्थिक बाजारपेठांवरील सगळे निर्बंध काढून घेतले.
  • १९९१ – तुर्कमेनिस्तानला रशियापासून स्वातंत्र्य.
  • १९९९ – हल्लेखोरांनी आर्मेनियाच्या संसदेत गोळ्या चालवून पंतप्रधान वाझगेन सर्गस्यान, संसदाध्यक्ष कारेन डेमिर्च्यान आणि सहा इतर सदस्यांची हत्या केली.

एकविसावे शतक

  • २००४ – ८६ वर्षांनी बॉस्टन रेड सॉक्सनी वर्ल्ड सिरीझ जिंकली व कर्स ऑफ द बॅम्बिनो ही दंतकथा खोटी ठरवली.

जन्म

  • १७२८ – जेम्स कूक, ब्रिटीश दर्यासारंग व शोधक.
  • १८११ – आयझॅक सिंगर, अमेरिकन संशोधक.
  • १८४४ – क्लाउस पॉॅंटस आर्नोल्डसन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
  • १८५८ – थियोडोर रूझवेल्ट, अमेरिकेचा २६वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७३ – एमिली पोस्ट, अमेरिकन लेखिका.
  • १८७७ – जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१४ – डिलन थॉमस, आयरिश कवी.
  • १९२० – के.आर. नारायणन, भारतीय राष्ट्रपती.
  • १९२३ – अरविंद मफतलाल, भारतीय उद्योजक.
  • १९२५ – वॉरेन क्रिस्टोफर, अमेरिकन परराष्ट्रसचिव.
  • १९३१ – नवल अल-सादवी, इजिप्तचा लेखक.
  • १९३९ – जॉन क्लीसी, इंग्लिश अभिनेता.
  • १९४० – जॉन गॉटी, अमेरिकन माफिया.
  • १९४५ – लुइस इनासियो लुला दा सिल्वा, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६४ – मार्क टेलर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ – कुमार संघकारा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ – इरफान पठाण, भारताचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ९३९ – एथेलस्टॅन, इंग्लंडचा राजा.
  • १४३९ – आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १५०५ – इव्हान तिसरा, रशियाचा झार.
  • १६०५ – अकबर, मोगल सम्राट.
  • १९८० – जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – तुर्कमेनिस्तान.
  • स्वातंत्र्य दिन – सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडीन्स.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

मूर्ख बोकड
एका जंगलामध्ये एक विहीर होती. ती सहजासहजी दिसून येत नसे. चालता चालता एके दिवशी एक कोल्हा त्या विहिरी मध्ये पडला आणि मदतीसाठी हाका मारू लागला.
त्या विहिरी मध्ये पाणी जास्त नव्हते त्यामुळे तो बुडला नाही. परंतु त्याला वर येता येईना. त्यामुळे तो मदतीसाठी इतरांना हाका मारू लागला. ‘वाचवा वाचवा मला कोणीतरी बाहेर काढा’.
परंतु खूप वेळ झाले तिथे कोणीच फिरकले नाही. खूप खूप उशिरा नंतर एक बोकड तेथून चालले होते. त्याने त्या विहिरीमध्ये सहज डोकावून पाहिले तर त्याला आतमध्ये कोल्हा दिसला.
बोकडाने कोल्ह्याला  विचारले ,”कोल्हे दादा तू काय करतो आहेस विहिरीमध्ये?”
कोल्ह्याला एक युक्ती सुचली त्याने बोकडाला खरे न सांगता खोटे सांगितले. म्हणाला, “अरे या विहिरीतील पाणी खूप गोड आहे. तुला प्यायचे का या विहिरीचे पाणी?
मी तर खूप वेळ झाले हे पाणी पीत आहे. ये तू पण हे पाणी प्यायला.”
हे ऐकून मूर्ख बोकडाला समजले नाही ,की हा कोल्ह्याचा कावा आहे.
त्यामुळे त्या बोकडाने विहिरीमध्ये उडी मारली. बोकडाने विहिरीमध्ये उडी मारता क्षणीच  कोल्हा त्याच्या पाठीवर चढून वरती निघून गेला आणि आणि बोकडाला म्हणाला,”मूर्ख बोकडा बस आता तू एकटाच पाणी पीत.
अशाप्रकारे बोकडाची मदत न करता उलट त्याला संकटात टाकून कोल्हा निघून गेला.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

एका माकडाने काढलंय दुकान 
एका माकडाने काढलंय दुकान आली गिऱ्हाईके छान छान
मनीने आणले पैसे नवे म्हणाली शेटजी उंदीर हवे
अस्वल आले नाचवीत पाय म्हणाले मधाचा भाव काय
कोल्ह्याने मागितला गुळाचा रवा आणि म्हणाला मांडून ठेवा
माकड म्हणाले लावून गंध आता झालंय दुकान बंद

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) उन्हाळ्यात कोणती फळे बाजारात भरपूर असतात ?
उत्तर : आंबे व कलिंगडे
२) पावसाळ्याची चाहूल लागते तोपर्यंत कोणती फळे बाजारात आलेली असतात?
उत्तर : फणस, करवंदे आणि जांभळे
३) हिवाळ्यात आंब्याच्या झाडाला फुलोरा येतो त्यास काय म्हणतात?
उत्तर : मोहर
४) थंडीचा कडाका कोणत्या महिन्यात कमी होतो?
उत्तर : फेब्रुवारी
५) उष्णता कोणत्या महिन्यात जाणावयाला सुरूवात होते?
उत्तर : मार्च

इंग्रजी प्रश्न

1) Which is the national animal of India?
Ans : Tiger
2) Which is the state animal of Maharashtra?
Ans : Giant Squirrel
3) Which is the fastest running animal?
Ans : Leopard
4) Who is called the king of animals?
Ans : Lion
5) Which animal is the tallest in the world?
Ans : Giraffes

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#27 october, 27 october 2023, 27 october 2021 panchang, 27 october 2022 special day, 27 october 2023 weather, 27 october 2022 panchang in hindi, 27 october is celebrated as, what is celebrated on 27,  27 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.