21 June
21 जून दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार, दि- 21/06/2023
मिती- आषाढ शुक्ल 3 , शके 1945
सुविचार-तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
म्हणी व अर्थ- जिथे राबती हात तेथे हरी
ठळक घटना आणि घडामोडी
21 जून हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७२ वा किंवा लीप वर्षात १७३ वा दिवस असतो.
अठरावे शतक
- १७४९ – कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.
- १७८८ – न्यू हॅम्पशायर अमेरिकेचे नववे राज्य झाले.
एकोणिसावे शतक
- १८७७ – पेनसिल्व्हेनियात १० कामगार नेत्यांना फाशी देण्यात आली.
- १८९८ – गुआम अमेरिकेचा प्रांत झाला.
विसावे शतक
- १९४० – दुसरे महायुद्ध – फ्रांसने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- १९४२ – दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने टोब्रुक जिंकले.
- १९४५ – दुसरे महायुद्ध – ओकिनावाची लढाई संपली.
- १९४८ – स्मॉल स्केल एक्सपरिमेंटल मशीन या जगातील पहिल्या संचयित आज्ञावली संगणकाने आपली पहिली आज्ञावली पार पाडली.
- १९६४ – अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅनने ठार मारले.
- १९७५ – वेस्ट इंडीजने पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला.
- १९८९ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचा ध्वज जाळण्याची कृती ही वाचास्वातंत्र्याची अभिव्यक्ती असल्यामुळे वैध ठरवली.
- १९९१ – पी.व्ही.नरसिंह राव भारताच्या पंतप्रधानपदी.
एकविसावे शतक
- २००४ – स्पेसशिपवन या पहिल्या खाजगी अंतराळयानाचे पहिले उड्डाण.
जन्म
- १००२ – पोप लिओ नववा.
- १२२६ – बोलेस्लॉस पाचवा, पोलंडचा राजा.
- १७३२ – योहान क्रिस्चियन बाख, जर्मन संगीतकार.
- १७८१ – सिमिओन-डेनिस पॉइसॉन, फ्रेंच गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०५ – ज्यॉॅं-पॉल सार्त्र, फ्रेंच लेखक व तत्त्वज्ञानी.
- १९२३ – सदानंद रेगे, मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक.
- १९३७ – जॉन एडरिच, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९५३ – बेनझीर भुट्टो, पाकिस्तानची पंतप्रधान.
- १९५४ – जेरेमी कोनी, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९५५ – मिशेल प्लाटिनी, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.
- १९८२ – विल्यम, इंग्लिश राजकुमार.
मृत्यू
- १३०५ – वेंकेस्लॉस दुसरा, पोलंडचा राजा.
- १३७७ – एडवर्ड तिसरा, इंग्लंडचा राजा.
- १५२७ – निकोलो माकियाव्हेली, इटलीचा राजकारणी, इतिहासकार.
- १८७४ – अँडर्स योनास ॲंग्स्ट्रॉम, स्वीडीश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९३ – लिलॅंड स्टॅनफोर्ड, अमेरिकन उद्योगपती; स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
- १९२८ – नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे, मराठी कादंबरीकार.
- १९४० – केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- १९५७ – योहानेस श्टार्क, नोबेल पारितोषिकविजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७० – सुकर्णो, इंडोनेशियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९८४ – अरुण सरनाईक, मराठी चित्रपट अभिनेता.
- १९८५ – टेग अर्लॅंडर, स्वीडनचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- उत्तर गोलार्धातील वर्षातला सर्वात मोठा दिवस.
- दक्षिण गोलार्धातील वर्षातला सर्वात छोटा दिवस.
- या दिवसाला summer solstice दिवस म्हणतात.
- स्थानिक रहिवासी दिन – कॅनडा.
- राष्ट्र दिन – ग्रीनलॅंड.
- आंतरराष्ट्रीय योग दिवस
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीते
देशभक्ती गीत
बोधकथा
सामान्य ज्ञान
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.