7 November | 7 नोव्हेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

7 November

7 नोव्हेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-  मंगळवार  

दिनांक-  07/11/2023, 7 नोव्हेंबर

मिती-  आश्विन कृ. 10

शके- 1945

सुविचार- “कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही तर त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.”

म्हणी व अर्थ – आपलेच दात आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

वाक्यप्रचार- गहिवरून येणे – कंठ दाटून येणे.

ठळक घटना आणि घडामोडी

नोव्हेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३११ वा किंवा लीप वर्षात ३१२ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८३७ – गुलामगिरीविरुद्ध मजकूर व पुस्तके प्रसिद्ध करणाऱ्या एलायजाह पी. लव्हजॉयची आल्टन, इलिनॉयमधील मुद्रणशाळा तिसऱ्यांदा जाळण्यासाठी आलेल्या जमावाचा विरोध करताना लव्हजॉयचा मृत्यू

विसावे शतक

  • १९०७ – डेल्टा सिग्मा पायची न्यू यॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
  • १९९६ – नायजेरियाचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान लागोसपासून आग्नेय दिशेस ४० मैलावर कोसळले. १४३ ठार
  • १९९६ – नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण

एकविसावे शतक

  • २००० – हिलरी क्लिंटनची अमेरिकेच्या सेनेटवर निवड
  • २००१ – एकमेव स्वनातीत प्रवासी विमान कॉॅंकोर्ड १५ महिन्यांच्या बंदीनंतर पुन्हा आकाशात झेपावले
  • २००२ – इराणने अमेरिकन वस्तूंच्या जाहिरातींवर बंदी घातली

जन्म

  • ९९४ – इब्न हज्म, अरब तत्त्वज्ञानी
  • १८६७ – मेरी क्युरी, पोलिश भौतिकशास्त्रज्ञ
  • १८७४ – जोसेफ विलोबी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १८७६ – चार्ली टाउनसेन्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८७६ – टेड आर्नोल्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८७९ – लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी
  • १८८४ – पांडुरंग सदाशिव खानखोजे, भारतीय क्रांतिकारक
  • १८८८ – सर चंद्रशेखर वेंकट रमण, भारतीय शास्त्रज्ञ
  • १८८९ – लॉर्ड लायोनेल टेनिसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १८८९ – डस्टी टॅपस्कॉट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १९१८ – बिली ग्रॅहाम, अमेरिकन धर्मप्रसारक
  • १९५४ – कमल हासन, भारतीय चित्रपट अभिनेता
  • १९५९ – श्रीनिवास – भारतीय पार्श्वगायक
  • १९६१ – रॉन हार्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
  • १९६२ – वेन एन. फिलिप्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू
  • १९६६ – मार्टिन सुआ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
  • १९७२ – तनवीर मेहदी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९७९ – मंजुरल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू
  • १९८० – जेम्स फ्रॅंकलिन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
  • १९८० – कार्तिक – भारतीय पार्श्वगायक
  • १९८१ – अनुष्का शेट्टी, भारतीय अभिनेत्री

मृत्यू

  • १९१० – लिओ टॉल्स्टॉय, रशियन लेखक
  • १९६७ – जॉन गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष
  • २००० – चिदंबरम् सुब्रमणियम्, भारतीय राजकारणी
  • २००६ – पॉली उमरीगर, भारतीय क्रिकेट खेळाडू

प्रतिवार्षिक पालन

  • ऑक्टोबर क्रांती दिन – रशिया
  • विद्यार्थी दिवस – महाराष्ट्र राज्य

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

संत स्वभाव 
एक संत कपडे शिवून आपला चरितार्थ चालवीत होते. एक मनुष्य  त्यांच्याकडूनच कपडे शिवून घ्यावयाचा व कपडे खूप शिवायचा परंतू पैसे देतांना तो प्रत्येक वेळी खोटी नाणी द्यावयाचा संतही काही न बोलता गुपचूपपणे त्याचा स्वीकार करावयाचे.
एकदा संत काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दुकानावर त्यांचा नोकर होता.
जेव्हा त्या गिऱ्हाईकाने शिलाई  दिली तेव्हा सेवकाने त्याच्याकडे दुसरे पैसे मागितले व खोटे दिल्याबद्दल आग पाखडण्यास सुरुवात केली.
संत गावाहून परत आल्यावर सेवकाने त्यांच्या कानावर सर्व हकीकत घातली  व तो माणूस कसा फसवीत होता ते सांगितले.
संत त्यावर म्हणाले, “तू ती खोटी नाणी का नाही घेतलीस?
मला तर तो प्रत्येक वेळेस बनावट नाणी देतो. मी ती घेतो व जमिनीत पुरु टाकतो.
मी ती स्वीकारली नाहीत तर दुसरा कोणीतरी दरवेळेस त्याच्याकडून फसवला जाईल.
तात्पर्य : दुसऱ्यांचा विचार करून स्वतः त्रास सहन करण्याची  प्रवृती म्हणजे संतप्रवृत्ती.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

चिर विजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिर विजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येय पथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळि काळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिर विजयाचे वारस आम्ही॥४॥

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) सहकारी संस्था कोणाला म्हणतात?
उत्तर : लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात .
२) लोकांना सार्वजनिक सुविधा कशातून मिळतात?
उत्तर : लोकांनी दिलेल्या करातून त्यांना सार्वजनिक सुविधा मिळतात.
३) खेड्यांचा कारभार कोण करते ?
उत्तर : खेड्यांचा कारभार ग्रामपंचायत करते.
४) नगराचा कारभार कोण पाहते?
उत्तर : नगराचा कारभार नगरपालिका पाहते.
५) मोठ्या शहरांचा कारभार कोण पाहते ?
उत्तर: मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते.

इंग्रजी प्रश्न

1) What is your name?
Ans : My name is ……
2) What is your father name?
Ans : My father name is ……..
3) What is your mother name?
Ans : My mother name is ……..
4) What is your brother name?
Ans : My brother name is ……..
5) What is your sister name ?
Ans : My sister  name is ……..

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 november, 7 november 2023, 7 november 2021 panchang, 7 november 2022 special day, 7 november 2023 weather, 7 november 2022 panchang in hindi, 7 november is celebrated as, what is celebrated on 7 november, 7 november 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.