6 November | 6 नोव्हेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

6 November

6 नोव्हेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-  सोमवार 

दिनांक-  06/11/2023, 6 नोव्हेंबर

मिती-  आश्विन कृ. 9

शके- 1945

सुविचार- जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.

म्हणी व अर्थ – अती झालं अन हसू आलं:- एखाद्या गोष्टीचा जास्त उहापोह केला तर ती गोष्ट हास्यास्पद ठरते.

वाक्यप्रचार- कान टोचणे- चूक लक्षात आणून देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

नोव्हेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१० वा किंवा लीप वर्षात ३११ वा दिवस असतो.

सोळावे शतक

 • १५२८ – समुद्री वादळात आपले जहाज बुडाल्यावर किनाऱ्यावर आलेला स्पेनचा आल्व्हार नुन्येझ काबेझा दि व्हाका टेक्सासमध्ये पाय ठेवणारा पहिला युरोपीय झाला

एकोणिसावे शतक

 • १८४४ – डॉमिनिकन प्रजासत्ताकने आपले पहिले संविधान अंगिकारले
 • १८६० – अब्राहम लिंकन अमेरिकेचा १६वा राष्ट्राध्यक्ष झाला
 • १८६१ – जेफरसन डेव्हिस कॉन्फेडरेट स्टेट्स ऑफ अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला
 • १८६५ – अमेरिकन यादवी युद्ध – जगप्रदक्षिणा करून आलेल्या दक्षिणेच्या सी.एस.एस. शेनान्डोआह या युद्धनौकेने उत्तरेच्या सैन्यासमोर आत्मसमर्पण केले

विसावे शतक

 • १९१३ – दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक
 • १९४१ – दुसरे महायुद्ध – जोसेफ स्टालिनने आपल्या राजवटीत फक्त दुसऱ्यांदा सोवियेत संघाला उद्देशून भाषण केले सोवियेत संघाचे ३.५ लाख सैनिक ठार झाले असले तरी जर्मनीचे ४५ लाख सैनिक ठार झाल्याचा दावा केला
 • १९४३ – दुसरे महायुद्ध – सोवियेत संघाने क्यीव परत घेतले. शहर सोडण्याआधी जर्मन सैनिकांनी तेथील जुन्या इमारतींची नासधूस केली
 • १९६५ – क्युबा आणि अमेरिकेने क्युबाच्या अमेरिकेस जाण्यास तयार असलेल्या नागरिकांना हलविण्याचे सुरू केले. १९७१पर्यंत सुमारे अडीच लाख क्युबन यामार्गे अमेरिकेत आले
 • १९८५ – कोलंबियामध्ये दहशतवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत काबीज करून ११ न्यायाधीशांसह ११५ व्यक्तींना ठार मारले
 • १९८६ – ब्रिटिश इंटरनॅशनल हेलिकॉप्टर्सचे बोईंग २३४एलआर प्रकारचे हेलिकॉप्टर कोसळून ४५ ठार

एकविसावे शतक

 • २००२ – पॅरिसहून व्हियेनाला जाणाऱ्या रेल्वेगाडीला आग. १२ ठार
 • २००४ – इंग्लंडमध्ये उफ्टन गावाजवळ मोटारगाडीला रेल्वेगाडीची धडक. ६ ठार, १५० जखमी
 • २००५ – अमेरिकेच्या एव्हान्सव्हिल शहराजवळ टोर्नॅडोमुळे २५ ठार
 • २००५ – म्यानमारच्या लश्करी राजवटीने राजधानी रंगूनहून प्यिन्मना शहरास हलवली

जन्म

 • १४९४ – सुलेमान, ऑट्टोमन सम्राट
 • १६६१ – कार्लोस दुसरा, स्पेनचा राजा
 • १८४१ – आर्मांड फॅलियेरेस, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष
 • १८६० – इग्नास पादेरेव्स्की, पोलंडचा राष्ट्राध्यक्ष
 • १८७६ – अर्नी हेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १८९३ – एड्सेल फोर्ड, अमेरिकन उद्योगपती
 • १८९७ – जॅक ओ’कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
 • १९१९ – ऍलन लिसेट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
 • १९२१ – जॉफ राबोन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू
 • १९२७ – एरिक ऍटकिन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
 • १९४६ – सॅली फील्ड, अमेरिकन चित्रपट अभिनेत्री
 • १९४८ – ग्लेन फ्रे, अमेरिकन संगीतकार
 • १९५६ – ग्रेम वूड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू

मृत्यू

 • १२३१ – त्सुचिमिकाडो, जपानी सम्राट
 • १४०६ – पोप इनोसंट सातवा
 • १६३२ – गुस्ताफस ऍडोल्फस, स्वीडनचा राजा
 • १६५६ – होआव चौथा, पोर्तुगालचा राजा
 • १७९६ – कॅथेरिन दुसरी, रशियाची सम्राज्ञी
 • १८३६ – चार्ल्स दहावा, फ्रांसचा राजा
 • १८९३ – पीटर इल्यिच त्चैकोव्स्की, रशियन संगीतकार
 • १९२५ – खै दिन्ह, व्हियेतनामचा राजा
 • १९२९ – मॅक्सिमिलियन फोन बाडेन, जर्मनीचा चान्सेलर
 • १९८७ – भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते

प्रतिवार्षिक पालन

 • संविधान दिन – डॉमिनिकन प्रजासत्ताक, ताजिकीस्तान
 • गुस्ताफस ऍडोल्फस दिन – स्वीडन.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
 1. असो तुला देवा माझा
 2. देह मंदिर,चित्त मंदिर
 3. सर्वात्मका शिवसुंदरा
 4. केशवा माधवा
 5. या भारतात
 6. इतनी शक्ती हमे देना
 7. सत्यम शिवम सुंदरां
 8. हा देश माझा
 9. खरा तो एकची धर्म
 10. हंस वाहिनी
 11. तुम्ही हो माता
 12. शारदे मां
 13. ऐ मलिक तेरे बंदे
 14. हमको मन की शक्ती

बोधकथा

संत स्वभाव 
एक संत कपडे शिवून आपला चरितार्थ चालवीत होते. एक मनुष्य  त्यांच्याकडूनच कपडे शिवून घ्यावयाचा व कपडे खूप शिवायचा परंतू पैसे देतांना तो प्रत्येक वेळी खोटी नाणी द्यावयाचा संतही काही न बोलता गुपचूपपणे त्याचा स्वीकार करावयाचे.
एकदा संत काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दुकानावर त्यांचा नोकर होता.
जेव्हा त्या गिऱ्हाईकाने शिलाई  दिली तेव्हा सेवकाने त्याच्याकडे दुसरे पैसे मागितले व खोटे दिल्याबद्दल आग पाखडण्यास सुरुवात केली.
संत गावाहून परत आल्यावर सेवकाने त्यांच्या कानावर सर्व हकीकत घातली  व तो माणूस कसा फसवीत होता ते सांगितले.
संत त्यावर म्हणाले, “तू ती खोटी नाणी का नाही घेतलीस?
मला तर तो प्रत्येक वेळेस बनावट नाणी देतो. मी ती घेतो व जमिनीत पुरु टाकतो.
मी ती स्वीकारली नाहीत तर दुसरा कोणीतरी दरवेळेस त्याच्याकडून फसवला जाईल.
तात्पर्य : दुसऱ्यांचा विचार करून स्वतः त्रास सहन करण्याची  प्रवृती म्हणजे संतप्रवृत्ती.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

चिर विजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिर विजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येय पथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळि काळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिर विजयाचे वारस आम्ही॥४॥

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) सहकारी संस्था कोणाला म्हणतात?
उत्तर : लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना सहकारी संस्था म्हणतात .
२) लोकांना सार्वजनिक सुविधा कशातून मिळतात?
उत्तर : लोकांनी दिलेल्या करातून त्यांना सार्वजनिक सुविधा मिळतात.
३) खेड्यांचा कारभार कोण करते ?
उत्तर : खेड्यांचा कारभार ग्रामपंचायत करते.
४) नगराचा कारभार कोण पाहते?
उत्तर : नगराचा कारभार नगरपालिका पाहते.
५) मोठ्या शहरांचा कारभार कोण पाहते ?
उत्तर: मोठ्या शहरांचा कारभार महानगरपालिका पाहते.

इंग्रजी प्रश्न

1) What is your name?
Ans : My name is ……
2) What is your father name?
Ans : My father name is ……..
3) What is your mother name?
Ans : My mother name is ……..
4) What is your brother name?
Ans : My brother name is ……..
5) What is your sister name ?
Ans : My sister  name is ……..

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#6 november, 6 november 2023, 6 november 2021 panchang, 6 november 2022 special day, 5 november 2023 weather, 5 november 2022 panchang in hindi, 5 november is celebrated as, what is celebrated on 5 november, 5 november 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.