20 Jully | 20 जुलै दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

20 Jully

20 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – गुरुवार

दिनांक- 20/07/2023, 20 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 3

शके– 1945

सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.  Done with a concentrated mind The result of any work That means success.

म्हणी व अर्थ : उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग – उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.

वाक्प्रचार-   घाम गळणे – कष्ट करणे.

बातम्या

अकोल्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस मारले जोडे
कर्नाटकात सर्व मंदिरांमध्ये मोबाईल वापरावर बंदी
अकोला : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे तीन कर्मचारी निलंबित; शाखा अभियंत्यास ‘शो कॉज’!
मुंबई : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस
गडचिरोलीत धो-धो… भामरागडचा संपर्क तुटला, राष्ट्रीय महामार्गासह डझनभर रस्ते बंद
मीरारोड – भाईंदरच्या नगरभवन येथील मांदली तलावात बुडून अमित दास या तरूणाचा मृत्यू
मुंबई – नाशिक महामार्गावर खडवली फाट्यावर पुन्हा एकदा भीषण अपघात, ४ विद्यार्थी ठार

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०१ वा किंवा लीप वर्षात २०२ वा दिवस असतो.

सहावे शतक

  • ५१४ – हॉर्मिस्दस पोपपदी.

पंधरावे शतक

  • १४०२ – तैमुर लंगने तुर्कस्तानमधील अंकारा शहर जिंकले.

अठरावे शतक

  • १७३८ – पिएर गॉतिये दि व्हारेने एत दिला व्हेरेन्द्रे हा फ्रेंच शोधक मिशिगन सरोवराच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचला.

एकोणिसावे शतक

  • १८६४ – अमेरिकन यादवी युद्ध – पीचट्री क्रीकची लढाई.
  • १८७१ – ब्रिटीश कोलंबिया कॅनडात सामील झाले.
  • १८८१ – अमेरिकेच्या मूळ रहिवाश्यांपैकी सू जमातीच्या शेवटच्या टोळीने आपल्या नेता सिटिंग बुलसह अमेरिकन सरकारसमोर आत्मसमर्पण केले.

विसावे शतक

  • १९०३ – फोर्ड मोटर कंपनीने आपली पहिली कार विकायला पाठवली.
  • १९०७ – अमेरिकेत सेलम, मिशिगन येथे रेल्वे अपघात. ३० ठार, ७० जखमी.
  • १९१५ – वेल्समध्ये कोळसा खाण कामगारांचा संप मिटला.
  • १९२१ – टॅम्पिको, मेक्सिको येथील खनिज तेलाच्या विहीरींना आग. कोट्यावधी डॉलरचे नुकसान.
  • १९२१ – न्यू यॉर्क व सान फ्रांसिस्को दरम्यान हवाई टपालसेवा सुरू.
  • १९२२ – लीग ऑफ नेशन्सने आफ्रिकेतील टोगोलॅंड फ्रांसला तर टांगानिका युनायटेड किंग्डमला दिले.
  • १९२४ – ईराणची राजधानी तेहरानमध्ये अमेरिकन राजदूत रॉबर्ट इम्ब्रीची हत्या, लश्करी कायदा लागू.
  • १९२६ – मेथोडिस्ट चर्चने स्त्रीयांना धर्मगुरू होण्याची परवानगी दिली.
  • १९२७ – मायकेल पहिला रोमेनियाच्या राजेपदी.

एकविसावे शतक

  • २००२ – पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
  • २००३ – केन्यात प्रवासी विमान कोसळले. १४ ठार.
  • २००५ – चीनच्या शांक्सी प्रांतातील कोळश्याच्या खाणीत स्फोट. २४ ठार.
  • २०१२ – अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील डेन्व्हर शहराच्या अरोरा उपनगरात बॅटमॅन:द डार्क नाइट राइझेस या चित्रपटाचा पहिल्या खेळ चालू असताना जेम्स होम्स नावाच्या व्यक्तीने चित्रपटगृहात अंदाधुंद गोळीबार केला. १२ ठार, ५९ जखमी.

जन्म

  • ८१० – इमाम बुखारी, हदीथचा संपादक.
  • १८९० – जॉर्ज दुसरा, ग्रीसचा राजा.
  • १९०० – मॉरिस लेलेंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९११ – बाका जिलानी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ – सर एडमंड हिलरी, गिर्यारोहक.
  • १९२९ – राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.
  • १९५० – नसीरुद्दीन शाह, भारतीय अभिनेता.
  • १९७१ – एड गिडिन्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७६ – देबाशिष मोहंती, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ९८५ – पोप बॉनिफेस सातवा.
  • १०३१ – रॉबर्ट दुसरा, फ्रांसचा राजा.
  • ११५६ – टोबा, जपानी सम्राट.
  • १३२० – ओशिन, आर्मेनियाचा राजा.
  • १४५४ – जॉन दुसरा, कॅस्टिलचा राजा.
  • १९०३ – पोप लिओ तेरावा.
  • १९२२ – आंद्रे मार्कोव्ह, रशियन गणितज्ञ.
  • १९२३ – पांचो व्हिया, मेक्सिकन क्रांतीकारी.
  • १९२७ – फर्डिनांड, रोमेनियाचा राजा.
  • १९३७ – गुग्लियेल्मो मार्कोनी, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९५१ – अब्दुल्ला पहिला, जॉर्डनचा राजा.
  • १९५३ – डुमार्सैड एस्टिमे, हैतीचा राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन

  • आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन.
  • स्वातंत्र्य दिन – कोलंबिया.
  • शांती व स्वतंत्रता दिन – उत्तर सायप्रस.
  • मैत्री दिन – आर्जेन्टिना, ब्राझिल.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.
ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
so ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जो पर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससा पर्यंत आले and कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली.
ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हा देश माझा याचे,
भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा,
हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती,
बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता,
कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया,
स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले,
दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला,
या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात,
थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ,
काहिसा अर्थही येऊ द्या रे ॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली
माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी,
फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे,
द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) भारताची राजधानी कोणती?
उत्तर: नवी दिल्ली
२) महाराष्ट्राची राजधानी कोणती?
उत्तर: मुंबई
३) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती?
उत्तर :  नागपूर
४) विद्येचे माहेरघर कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर : पुणे
५) सात बेटांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर: मुंबई

ENGLISH QUESTION

1) Which is the tallest animal in the world?
Ans- Giraffe
2) Which is the fastest bird in the world?
Ans- Ostrich
3) Which is the highest waterfall in the world?
Ans: Angel Falls
4) Sunlight is the source of which vitamin?
Ans- Vitamin D
5) How many teeth does a human have?
Ans- 32

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#20 jully, 20 jully 2023, 20 jully 2021 panchang, 20 jully 2022 special day, 20 jully 2023 weather, 20 jully 2022 panchang in hindi, 20 jully is celebrated as, what is celebrated on 20 jully, 20 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.