21 Jully | 21 जुलै दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

21 Jully

21 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – शुक्रवार

दिनांक- 21/07/2023, 21 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 4

शके– 1945

सुविचार- एकमेकाची प्रगती साधते ती खरी मैत्री  It is true friendship that achieves each other’s progress.

म्हणी व अर्थ : इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.

वाक्प्रचार-  शेतात राबणे – शेतात कष्ट करणे.

बातम्या

रायगड – जिल्ह्यातील खालापूर तहसील क्षेत्रातील इर्शलवाडी गावावर दरड कोसळली १६ जणांचा मृत्यु
रायगड – इरसालवाडी दुर्घटनास्थळी १५-२० मुले ढिगाऱ्याखाली अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी देऊन मृतांच्या नातेवाईकांचे केले सात्वंन
पनवेल: मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात पूरसदृश्य स्थिती; शाळा महाविद्यायाला गुरुवारी सुट्टी जाहीर
यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी पहिल्यांदाच पडली पात्राबाहेर; कासारी नदीने ही पात्र ओलांडले
नवी मुंबई: घणसोलीत २ दुकानांना आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, शेजारीच CNG पंप असल्याने आग पसरल्यास धोका

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०२ वा किंवा लीप वर्षात २०३ वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७१८ – पासारोवित्झचा तह – ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
  • १७७४ – कुचुक-कैनार्जीची संधी – ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.

एकोणिसावे शतक

  • १८३१ – लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
  • १८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – बुल रनची पहिली लढाई.

विसावे शतक

  • १९२५ – अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – गुआमची लढाई.
  • १९६९ – नील आर्मस्ट्रॉॅंग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
  • १९७० – ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
  • १९७२ – आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
  • १९७६ – आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.

एकविसावे शतक

  • २००२ – अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.

जन्म

  • ३५६ – सिकंदर.
  • १४१४ – पोप सिक्स्टस चौथा.
  • १८९९ – अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
  • १९३४ – चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ – बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ – चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ – अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
  • १९७५ – रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १४२५ – मॅन्युएल दुसरा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.
  • १७९६ – रॉबर्ट बर्न्स, स्कॉटिश कवी.
  • १९३६ – जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९९८ – ऍलन शेपर्ड, अमेरिकन अंतराळवीर.
  • २००१ – शिवाजी गणेशन, तमिळ अभिनेता.
  • २००२ – गोपाळराव बळवंतराव कांबळे, मराठी चित्रकार.

प्रतिवार्षिक पालन

  • शहीद दिन – बॉलिव्हिया.
  • मुक्ती दिन – गुआम.
  • वांशिक सलोखा दिन – सिंगापुर.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.
ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
so ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जो पर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससा पर्यंत आले and कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली.
ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) परिसराचे प्रमुख चार घटक कोणते?
उत्तर : मानव, वनस्पती, प्राणी आणि पक्षी
२) बीजांकुरण म्हणजे  काय ?
उत्तर : अंकुर फुटण्याच्या प्रक्रियेला बीजांकुरण असे म्हणतात .
 ३) मुला-मुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते?
उत्तर : मुलामुलींची उंची वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत वाढते.
४) वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते ?
उत्तर : वनस्पतीचे अन्न पानात तयार होते.
५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर : महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.

ENGLISH QUESTION

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#21 jully, 21 jully 2023, 21 jully 2021 panchang, 21 jully 2022 special day, 21 jully 2023 weather, 21 jully 2022 panchang in hindi, 21 jully is celebrated as, what is celebrated on 21 jully, 21 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.