19 Jully |19 जुलै दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

19 Jully

19 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – बुधवार

दिनांक- 19/07/2023, 19 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 2

शके– 1945.

सुविचार- कामात आनंद निर्माण केला की त्याच ओझं वाटत नाही. When you create happiness in work He does not feel burdened.

म्हणी व अर्थ : एक ना धड भाराभर चिंध्या – एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे.

वाक्प्रचार- अधीर होणे – उत्सुक होणे.

बातम्या

यंदा अजित पवार एकटेच दिवाळी साजरी करणार; पुढील वर्षी कुटुंबासोबत – प्रकाश आंबेडकर
सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी वाढ खुंटली
तुमच्या मागे ‘ईडी’ लागली की ‘खोकी’ मिळाली?, व्ही.बी. पाटीलांचा आमदार राजेश पाटीलांवर हल्लाबोल
कोल्हापूर : राधानगरी धरण ५० टक्के भरले; कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची आस
सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक एका महिन्यासाठीच, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती
मुंबई – उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात मविआ आक्रमक, दुपारी राज्यपालांची घेणार भेट
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; कोयनेत एक टीएमसी पाणीसाठा वाढ
सरकार हे डबल इंजिनचं आहे की त्रिशूल याच्याशी लोकांना काहीही घेणं देणं नाही – रोहित पवार
पावसाळी अधिवेशनाचं कामकाज सुरु; एकनाथ शिंदेंनी नवीन मंत्र्यांची करुन दिली ओळख

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०० वा किंवा लीप वर्षात २०१ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५५३ – मेरी पहिली इंग्लंडच्या राणीपदी.

सतरावे शतक

  • १६९२ – अमेरिकेतील सेलम शहरात चेटकीण असल्याच्या आरोपाखाली ५ स्त्रीयांना फाशी देण्यात आली.

एकोणिसावे शतक

  • १८७० – फ्रांसने प्रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

विसावे शतक

  • १९१२ – अमेरिकेतील हॉलब्रुक शहरावर उल्कापात. सुमारे १६,००० उल्का जमिनीपर्यंत पोचल्या.
  • १९४० – दुसरे महायुद्ध – केप स्पादाची लढाई.
  • १९४७ – म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑॅंग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
  • १९६३ – ज्यो वॉकरने त्याचे एक्स १५ प्रकारचे प्रायोगिक विमान १,०६,०१० मीटर (३,४७,८०० फूट) उंचीवर नेले.
  • १९६७ – पीडमॉॅंट एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान सेसना ३१०शी अमेरिकेतील हेंडर्सनव्हिल शहराजवळ धडकले. ८२ ठार.
  • १९७६ – नेपाळमध्ये सगरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना.
  • १९७९ – निकाराग्वात उठाव.
  • १९८५ – ईटलीतील व्हाल दि स्लाव्हा धरण फुटले. पुरात २६८ ठार.
  • १९८९ – युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २३२ हे डी.सी. १० प्रकारचे विमान अमेरिकेतील सू सिटी शहराजवळ कोसळले. वैमानिकांच्या कौशल्यामुळे १८४ प्रवासी वाचले परंतु ११२ अन्य प्रवासी मृत्युमुखी.

जन्म

  • १८१४ – सॅम्युअल कॉल्ट, अमेरिकन संशोधक.
  • १८३४ – एदगा दगा, फ्रेंच चित्रकार.
  • १८७६ – जॉन गन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७ – आर्थर फील्डर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४ – ख्वाजा नझिमुद्दीन, पाकिस्तानचा दुसरा पंतप्रधान.
  • १८९६ – ए.जे. क्रोनिन, स्कॉटिश लेखक.
  • १९३४ – फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९३८ – डॉ. जयंत विष्णू नारळीकर, भारतीय अंतराळ-भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९४६ – इली नास्तासे, रोमेनियन टेनिस खेळाडू.
  • १९५५ – रॉजर बिन्नी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ५१४ – पोप सिमाकस.
  • ९३१ – उडा, जपानी सम्राट.
  • १९४७ – ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
  • १९६५ – सिंगमन ऱ्ही, दक्षिण कोरियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९८० – निहात एरिम, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
  • २००४ – झेन्को सुझुकी, जपानचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

  • शहीद दिन – म्यानमार.
  • राष्ट्रीय मुक्ती दिन – निकाराग्वा.
  • राष्ट्राध्यक्ष दिन – बॉत्स्वाना.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

ससा आणि कासव
एका जंगलामध्ये एक ससा आणि कासव राहत होते ससा हा नावाप्रमाणे चतुर आणि चपळ आणि कासव थोडे मंद असते. परंतु दोघांची चांगली मैत्री असते.
एकदा सशाच्या मनामध्ये कासवा सोबत पैज लावण्याची इच्छा होते व तसे ससा कासवाला म्हणतो की, आपल्या दोघांमध्ये पैज लावूया जो कोणी या पैजमध्ये जिंकेल तो सर्वश्रेष्ठ असेल.
ठरल्याप्रमाणे कासव देखील पैज लावायला हो म्हणतो. त्यावर ससा कासवाला म्हणते की जो कोणी समोरच्या टेकडी पर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल तो ही शर्यत जिंकेल.
ठरल्या प्रमाणे दुसर्‍या दिवशी कासवाची आणि सशाची पैज लागली. ससा होता चटळ ससा शर्यतीमध्ये सुरुवातीलाखूप धावत पळत सुटला आणि कासव हळूहळू शर्यत जिंकण्याचा प्रयत्न करीत होते.
थोडे पुढे धावत आले आणि त्याने मागे वळून पाहिले तर त्याला कासव कोठे ही दिसले नाहीत त्यावर कसा म्हणाला, ” जोपर्यंत कासव माझ्यापर्यंत पोचतील तोपर्यंत एक झोप घेतो.” असे म्हणून ससा एका झाडाखाली एक विश्रांतीसाठी थांबला.
कासव हळूहळू चालत ससा पर्यंत आले व कासवाने पाहिले ते ससा विश्रांतीसाठी झोपला आहे.
कासव आपल्या मंद पावलाने हळूहळू टेकडीच्या दिशेने चालतं होते. कासव टेकडी पर्यंत पोचणार तोच सशाला जाग आली.
ससा उठून पाहतो तर काय कासव त्याला कोठेही दिसेना त्यावर ससाने टेकडीच्या दिशेने धाव घेतली व तेथे गेल्याने त्याला कळाले की ही शर्यत कासवाने जिंकलेली आहे.
अशाप्रकारे ससाच्या चपळता पुढे कासवाचा प्रयत्न जिंकला.
तात्पर्य :  कधीही कोणाला कमी समजू नये व प्रयत्न केल्यानंतर यश आपोआप मिळते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हा देश माझा याचे,
भान जरासे राहू द्या रे || धृ ||
हा उंच हिमालय माझा,
हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती,
बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता,
कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया,
स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे ॥१॥
जे हात उत्सुकलेले,
दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला,
या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात,
थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ,
काहिसा अर्थही येऊ द्या रे ॥ २ ॥
जरी अनेक अपुले धर्म,
जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली
माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी,
फुंका रे एक तुतारी
संदेह रोष जे,
द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे ! ॥ ३॥
हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे ..!
– सेनापती बापट (पांडुरंग महादेव बापट)

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) नदी कशी तयार होते?
उत्तर : असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते.
२) झरा कशाला म्हणतात ?
उत्तर : जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते त्याला झरा म्हणतात.
३) जलरूपांची नावे सांगा.
उत्तर: झरा, ओढा, नदी, तळे, जलाशय, खाडी, समुद्र, महासागर
४) भूरूपांची नावे सांगा.
उत्तर : पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी
५) धरण कशाला म्हणतात?
उत्तर :  नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात.

ENGLISH QUESTION

1) What is the National Animal of India?
Ans : Tiger
2) What is the National Bird of India?
Ans :  Indian Peacock
3) What is the National Flower of India?
Ans : Lotus
4) What is the National Anthem of India, and who wrote it?
Ans : Jana Gana Mana, written by Rabindranath Tagore
5) What is the National Song of India?
– Vande Mataram, written by Bankim Chandra Chatterjee

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#19 jully, 19 jully 2023, 19 jully 2021 panchang, 19 jully 2022 special day, 19 jully 2023 weather, 19 jully 2022 panchang in hindi, 19 jully is celebrated as, what is celebrated on 19 jully, 19 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.