18 Jully | 18 जुलै दिनविशेष | शालेय परिपाठ, Daily Routine

18 Jully

18 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – मंगळवार

दिनांक- 18/07/2023, 18 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 1

शके– 1945.

सुविचार- जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा. Rather than being honest with the world Be honest with yourself first

म्हणी व अर्थ : करावे तसे भरावे – दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच.

वाक्प्रचार-  वाया जाणे – फुकट जाणे

बातम्या

पुण्यातून मोठी ताकद अजित पवारांच्या पाठिशी उभी केली जाईल; अजित पवार गटाचा निर्धार
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावात शेगाव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले
रोहित पवारांचे पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न; तीन जण सीसीटीव्हीत कैद
विरोधी पक्ष कुठे आहे त्यांनी आत्मविश्वास गमावलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फटकेबाजी
सोलापूर : महिलेला दंडाला पकडून ढकलून देत तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तीन मनपा कर्मचार्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सुषमा अंधारे यांच्या बदनामीप्रकरणी वाघमारेंवर ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा
मुंबईकरांच्या मेट्रोला विरोध होताच पण भाजपाने मेट्रो रुळावर आणलीच; आशिष शेलारांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस निष्कलंक, मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांचेही काैतुक

ठळक घटना आणि घडामोडी

लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मृतिदिन 

जुलै १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९९ वा किंवा लीप वर्षात २०० वा दिवस असतो.

इ.स.पू. चौथे शतक

  • ३९० – अलियाची लढाई – गॉल सैन्याने रोमजवळ रोमन सैन्याचा पराभव केला व नंतर रोममध्ये घुसून शहराची नासाडी केली.

पहिले शतक

  • ६४ – रोममध्ये प्रचंड आग. जवळजवळ सगळे शहर भस्मसात. यादरम्यान सम्राट निरो लांब उभा राहुन आपले तुणतुणे वाजवत असल्याची कथा.

तेरावे शतक

  • १२१६ – ऑनरियस तिसरा पोपपदी.

सोळावे शतक

  • १५३६ – इंग्लंडमध्ये पोपची सद्दी संपल्याचा फतवा.

एकोणिसावे शतक

  • १८३० – उरुग्वेने आपले पहिले संविधान अंगिकारले.
  • १८६३ – अमेरिकन यादवी युद्ध-फोर्ट वॅग्नरची लढाई – श्यामवर्णीय सैनिकांचा युद्धात सर्वप्रथम सहभाग. ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटच्या झेंड्याखाली फोर्ट वॅग्नरवरील हल्ला असफल, परंतु या लढाईत श्यामवर्णीय सैनिकांची बहादुरी व धडाडी अमेरिकन लोकांना दिसली.
  • १८५२ – इंग्लंडने निवडणुकांत गुप्त मतदान अंगिकारले.
  • १८७३ – ऑस्कार दुसरा नॉर्वेच्या राजेपदी.
  • १८९८ – मेरी क्युरी व पिएर क्युरीनी पोलोनियम या नवीन मूलतत्त्वाचा शोध लावला.

विसावे शतक

  • १९२५ – ऍडोल्फ हिटलरने माइन कॅम्फ हे आत्मकथेसदृश पुस्तक प्रकाशित केले.
  • १९४४ – जपानच्या पंतप्रधान हिदेकी तोजोने राजीनामा दिला.
  • १९६५ – सोवियेत संघाच्या झॉॅंड ३ या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६६ – अमेरिकेच्या जेमिनी १० या अंतराळयानाचे प्रक्षेपण.
  • १९६८ – इंटेल कंपनीची स्थापना.
  • १९६९ – अमेरिकेन सेनेटर एडवर्ड केनेडीच्या गाडीला अपघात. सहप्रवासी ठार. ही घटना केनेडीच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीतील प्रमुख अडसर होती.
  • १९७६ – ऑलिंपिक खेळात नादिया कोमानेसीने जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत सर्वप्रथम १० पैकी १० गुण मिळवले.
  • १९७७ – व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
  • १९८२ – प्लान दि सांचेझची कत्तल – ग्वाटेमालात २६८ खेड्यातील लोकांची हत्या.
  • १९८४ – सान इसिद्रोची कत्तल – कॅलिफोर्नियातील सान इसिद्रो गावातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मध्ये २१ लोकांची हत्या. खून्याला पोलिसांनी मारले.
  • १९९४ – बोयनोस एर्समध्ये इमारतीत स्फोट. ८५ ठार.
  • १९९५ – कॅरिबिअन समुद्रातील मॉंतसेरात द्वीपावरील सुफ्रीयेर ज्वालामुखीचा उद्रेक. राजधानी प्लिमथ उद्ध्वस्त.
  • १९९६ – कॅनडात साग्वेने नदीला प्रचंड पूर.
  • १९९८ – पापुआ न्यू गिनीत त्सुनामीसदृश समुद्री लाटेत ३,००० व्यक्ती मृत्युमुखी.

एकविसावे शतक

  • २००१ – अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील बोगद्यात रेल्वे गाडी रुळांवरून घसरली व पेटली. शहराचा मध्यवर्ती भाग बंद करावा लागला.
  • २०१३ – अमेरिकेच्या डेट्रॉइट शहराच्या महानगरपालिकेने २० अब्ज अमेरिकन डॉलर (१२ निखर्व रुपये) इतके कर्ज फेडण्याची क्षमता नसल्याचे जाहीर करून दिवाळे जाहीर केले.

जन्म

  • १५५२ – रुडॉल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८११ – विल्यम मेकपीस थॅकरे, इंग्लिश लेखक.
  • १८४८ – डब्ल्यु.जी. ग्रेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९० – फ्रॅंक फोर्ड, ऑस्ट्रेलियाचा १५वा पंतप्रधान.
  • १९०९ – आंद्रेइ ग्रोमिको, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९०९ – मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१८ – नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९२१ – जॉन ग्लेन, अमेरिकन अंतराळवीर.
  • १९४९ – डेनिस लिली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५० – सर रिचर्ड ब्रॅन्सन, इंग्लिश उद्योगपती.
  • १९६७ – व्हिन डीझेल, अमेरिकन अभिनेता.
  • १९८२ – प्रियांका चोप्रा, भारतीय अभिनेत्री.

मृत्यू

  • १६२३ – पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८६३ – रॉबर्ट गुल्ड शॉ, अमेरिकेच्या ५४वी मॅसेच्युसेट्स रेजिमेंटचा सेनापती.
  • १८७२ – बेनितो हुआरेझ, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९२ – थॉमस कूक, इंग्लिश प्रवास-व्यवस्थापक.
  • १९६९ – लोकशाहीर अण्णा भाऊ साठे.
  • १९९० – यून बॉसिऑन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • २०१२ – राजेश खन्ना, हिंदी चित्रपट अभिनेते.

प्रतिवार्षिक पालन

  • संविधान दिन – उरुग्वे.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

एका गृहस्थाने आपली विहिर शेजा-याला विकली. नवा मालक या विहिरीचे पाणी काढायला गेला असता, विहिरीचा पहिला मालक त्याला पाणी भरु देईना.

आश्चर्यचकीत झालेल्या नव्या मालकानं त्याला विचारलं, ‘अरे ! मी पूरेपूर पैसे मोजून तुझी जमीन विकत घेतली असताना, तू मला तिचे पाणी का भरु देत नाहीस?’
जुना मालक म्हणाला, ‘मी तुला केवळ विहीर विकली आहे. तिच्यातलं पाणी काही विकलेलं नाही. तेव्हा त्या पाण्यावर तुझा बिलकूल हक्क नाही.’
या अजब तर्कटाने संतापलेला त्या विहिरीचा नवा मालक न्यायालयात गेला. न्यायमुर्तींनी त्या विहीरीच्या नव्या व जुन्या दोन्ही मालकांना बोलावून घेतलं आणि त्या जुन्या मालकाला विचारलं, ‘तू तुझी विहीर या तुझ्या शेजा-याला विकलीस हे खरे आहे काय?’
जुना मालक – होय. पण विहिरीचं जे विक्रीखत झाले आहे त्यात मी माझी फ़क्त विहिरच काय ती याला विकली असल्याचा उल्लेख केला असल्याने, त्या विहिरीतील पाण्यावर या माझ्या शेजा-याचा बिलकूल हक्क नाही.
न्यायमुर्ती – तुझं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
जुना मालक – (आनंदून) न्यायमुर्ती ! आपल्यालासुध्दा माझं म्हणण रास्त वाटत आहे ना ? वाटणारच. पण असं असूनही हा माझा शेजारी, केवळ ती विहिर विकत घेतली, म्हणून तिच्यातील पाण्यावर हक्क सांगतो आहे !
न्यायमुर्ती – ते त्याचं म्हणणं चूक आहे, पण त्याचबरोबर, तू तुझी विहीर विकली असूनही पाणी ठेवण्यासाठी तिचा वापर करतोस. तेव्हा आता त्या विहिरीचा असा वापर करीत राहीपर्यंत दर दिवशी पन्नास रुपये भाडे त्या विहिरीचा आता मालक झालेल्या तुझ्या शेजा-याला दिले पाहिजेस.’
न्यायमुर्ती असे म्हणताच, तो खट मनुष्य़ त्यांना शरण गेला व केल्या अपराधाबद्दल क्षमा मागून, त्याने ती विहिर शेजा-याला पाण्यासह विकत दिल्याचे मान्य केले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण !
किसान मजूर उठतील कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता
खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) इंधन म्हणजे काय ?
उत्तर : सहजपणे पेटवू शकणारे आणि जळल्यानंतर भरपूर उष्णता देणारे जे पदार्थ असतात त्यांना इंधन म्हणतात .
२) स्वयंपाक करण्यासाठी कोणती इंधने वापरतात ?
उत्तर : गॅस सिलेंडर, राॅकेल, कोळसा, लाकडे, वीज , बायोगॅस, सूर्याची उष्णता ही इंधने वापरतात.
३) ज्वलनशील पदार्थ कोणाला म्हणतात?
उत्तर : जो पदार्थ जळू शकतो त्या पदार्थाला ज्वलनशील पदार्थ म्हणतात.
 ४) सौरचुली कोणाला म्हणतात?
उत्तर : सूर्याच्या उन्हातील उष्णता घेऊन पदार्थ शिजवणाऱ्या चुलींना सौरचुली म्हणतात .
५) अन्न शिजवण्याच्या पध्दती कोणत्या?
उत्तर : उकळणे, तळणे, वाफवणे व भाजणे या अन्न शिजवण्याच्या पध्दती आहेत.

ENGLISH QUESTION

1) What is the colour of the sunflower?
Ans : Yellow
2) Which is the national sport of India?
Ans : Hockey
3) How many legs does a cow have?
Ans : 4
14) In which season do we sweater wear ?
Ans : Winters
5) On which date, do we celebrate independence day in India?
Ans : 15th August

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#18 jully, 18 jully 2023, 18 jully 2021 panchang, 18 jully 2022 special day, 18 jully 2023 weather, 18 jully 2022 panchang in hindi, 18 jully is celebrated as, what is celebrated on 18 jully, 18 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.