7 September | 7 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

7 September

7 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 07/09/2023, 7 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 8

शके– 1945

सुविचार- आपली दुर्बलता हाच आपल्या जीवनातील अत्यंत वाईट दोष आहे.

म्हणी व अर्थ : नावडतीचे मीठ अळणी – अर्थ :~ नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही.

वाक्प्रचार- छळ करणे – त्रास देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५० वा किंवा लीप वर्षात २५१ वा दिवस असतो.

  • ११९१ – तिसरी क्रुसेड – इंग्लंडचा राजा रिचर्ड पहिल्याने सलाद्दिनला हरवले.

एकोणिसावे शतक

  • १८२१ – ग्रान कोलंबियाच्या प्रजासत्ताकची स्थापना.

विसावे शतक

  • १९२९ – फिनलंडमध्ये जहाज बुडून १३६ मृत्युमुखी.
  • १९४० – दुसरे महायुद्ध-ब्लिट्झ – जर्मनीने लंडनवर बॉम्बफेक सुरू केली. यानंतर ५६ अजून रात्री सतत बॉम्बवर्षा होत राहिली.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मनीची पूर्व आघाडीवरून पीछेहाट सुरू झाली.
  • १९४३ – ह्युस्टनमध्ये हॉटेलला आग लागून ५५ ठार.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – जपानच्या सैन्याने ने वेक द्वीपावर आत्मसमर्पण केले.
  • १९५३ – निकिता ख्रुश्चेव सोवियेत संघाच्या सर्वेसर्वापदी.
  • १९७९ – क्रायस्लर कॉर्पोरेशनने दिवाळे न काढण्याबद्दल अमेरिकेच्या सरकारकडे एक अब्ज डॉलरची मागणी केली.
  • १९९८ – लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिनने गूगलची स्थापना केली.
  • १९९९ – अथेन्समध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.९ तीव्रतेचा भूकंप. १४३ ठार, ५०० जखमी.

एकविसावे शतक

  • २००४ – हरिकेन आयव्हन हे ५व्या प्रतीचे चक्रीवादळ ग्रेनडावर आले. ३९ ठार. ग्रेनडातील ९०% इमारतींना नुकसान.
  • २००५ – इजिप्तमध्ये पहिल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुका.

जन्म

  • १५३३ – एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.
  • १८३६ – हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८५७ – जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७१ – जॉर्ज हर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४ – व्हिक रिचर्डसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९११ – टोडोर झिव्कोव्ह, बल्गेरियाचा हुकुमशहा.
  • १९१२ – डेव्हिड पॅकार्ड, अमेरिकन संशोधक, उद्योगपती.
  • १९१४ – नॉर्मन मिचेल-इनेस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३० – बोद्वॉँ पहिला, बेल्जियमचा राजा.
  • १९३३ – इला भट्ट, असंघटित महिला कामगारांच्यासाठी काम करणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्या.
  • १९३६ – बडी हॉली, अमेरिकन गायक, संगीतकार.
  • १९५५ – अझहर खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५९ – केव्हन करान, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ – नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ – स्टीव जेम्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ – फरवीझ महरूफ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १३१२ – फर्डिनांड चौथा, कॅस्टिलचा राजा.
  • १४९६ – फर्डिनांड दुसरा, नेपल्सचा राजा.
  • १५५२ – गुरू अनंग देव, दुसरे शीख गुरू.
  • १६३२ – सुसेन्योस, इथियोपियाचा सम्राट.
  • १७७७ – टेकले हयामानोत पहिला, इथियोपियाचा सम्राट.
  • १८०९ – बुद्ध योद्फा चुलालोके, थायलंडचा राजा.
  • १९५३ – भगवान रघुनाथ कुळकर्णी, मराठी कवी, लेखक.
  • १९९७ – मोबुटु सेसे सेको, झैरचा हुकुमशहा.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – ब्राझिल.
  • विजय दिन – मोझाम्बिक.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

अती शहाणा 
एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका !
सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते.
कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा.
सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही.
नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.
मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल.
आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
तात्पर्य:~ अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪ गंगोत्री राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜उत्तराखंड.
 ✪ बळीवंश या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜डाॅ.आ.ह.साळुंखे.
 ✪ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?
  ➜सरदार वल्लभभाई पटेल.
 ✪ उस्मानाबाद जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜लातूर.
 ✪ गुरूत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला ?
  ➜ न्यूटन.
✪ विमानाचा शोध कोणी लावला ?
उत्तर : राईट बंधू
✪ सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर : मॅकमिलन
✪ टेलिव्हिजन (TV)चा शोध कोणी लावला ?
उत्तर: जॉन बेअर्ड
✪ टेलिफोन चा शोध कोणी लावला ?
उत्तर : अलेक्झांडर ग्राहम बेल
✪ विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर : थॉमस एडिसन

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 september,7 september 2023, 7 september 2021 panchang, 7 september 2022 special day, 7 september 2023 weather, 7 september 2022 panchang in hindi,7 september is celebrated as, what is celebrated on 7 september, 7 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.