6 September | 6 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

6 September

6 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 06/09/2023, 6 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 7

शके– 1945

सुविचार- ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

म्हणी व अर्थ :

उंटावरचा शहाणा-
अर्थ :~  मूर्ख सल्ला देणारा.
मनी वसे ते स्वप्नी दिसे –
जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे .
वाक्प्रचार- छळ करणे – त्रास देणे.

ठळक घटना आणि घडामोडी

सप्टेंबर ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४९ वा किंवा लीप वर्षात २५० वा दिवस असतो.

दहावे शतक

  • ९५२ – सम्राट सुझाकु, जपानी सम्राट.

सोळावे शतक

  • १५२२ – फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोचले.

सतरावे शतक

  • १६२० – प्लिमथ, इंग्लंड येथून मेफ्लॉवर जहाजाचा प्रवास सुरू झाला.

अठरावे शतक

  • १७७६ – ग्वादालूप बेटावर चक्रीवादळ, ६,००० ठार.

एकोणिसावे शतक

  • १८८८ – चार्ल्स टर्नरने एकाच मोसमात २५० क्रिकेट बळी घेण्याचा विक्रम रचला.

विसावे शतक

  • १९०१ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीवर खूनी हल्ला.
  • १९३० – लश्करी उठावात आर्जेन्टिनाच्या राष्ट्राध्यक्ष हिपोलितो इरिगोयेनची उचलबांगडी.
  • १९३९ – दक्षिण आफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४० – बल्गेरियाच्या राजा कॅरोल दुसऱ्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा मायकेल सत्तेवर.
  • १९४९ – कॅम्डेन, न्यू जर्सीमध्ये हॉवर्ड अन्रुहने १३ शेजाऱ्यांची गोळ्या घालून हत्या केली.
  • १९६५ – भारत-पाकिस्तान दुसरे युद्ध-भारताने पाकिस्तानवर हल्ला केला.
  • १९६६ – दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.
  • १९६८ – स्वाझीलँडला स्वातंत्र्य.
  • १९७० – पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी युरोपमधून न्यू यॉर्कला निघालेल्या दोन विमानांचे अपहरण केले व जॉर्डनला नेली.
  • १९८५ – मिडवेस्ट एक्सप्रेस एरलाइन्स फ्लाइट १०५ हे डग्लस डी.सी.-९ प्रकारचे विमान मिलवॉकीहून उड्डाण करताच कोसळले. ३१ ठार.
  • १९८६ – अबु निदालच्या हस्तकांनी नेव्हे शालोम येथे सिनॅगॉगवर हल्ला चढवून २२ लोकांना ठार मारले.

जन्म

  • १६६६ – आयव्हन पाचवा, रशियाचा झार.
  • १७६६ – जॉन डाल्टन, ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ – सर एडवर्ड ऍपलटन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०६ – लुइस फेदेरिको लेलवा, नोबेल पारितोषिक विजेता आर्जेन्टीनाचा भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२३ – पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा.
  • १९२९ – यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.
  • १९५४ – कार्ली फियोरिना, अमेरिकन उद्योगपती.
  • १९५७ – होजे सॉक्रेटिस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९७१ – देवांग गांधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ९७२ – पोप जॉन तेरावा.
  • १९३८ – सली प्रुडहॉम, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
  • १९६६ – हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • १९९० – लेन हटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००७ – लुसियानो पाव्हारॉटी, इटालियन ऑपेरा गायक.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवें
स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
न्यायार्थ जे लढती रणीं
तलवार तू त्यांच्या करीं
ध्येयार्थ जे तमीं चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउलें
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

अती शहाणा 
एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका !
सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते.
कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा.
सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही.
नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.
मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल.
आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
तात्पर्य:~ अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪  जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना कोणते ?
➜ भारतीय राज्यघटना.
✪  ‘दौलताबाद’ चे पूर्वीचे नाव काय होते ?
➜ देवगिरी.
✪ ‘बजरंग पुनिया’ हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
➜ कुस्ती.
✪ बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली ?
➜ भारत.
✪  मुघल सत्तेचा संस्थापक कोण ?
➜ बाबर

इंग्रजी प्रश्न

1) Which animal guards the house?
Ans: The dog guards the house
2) animal is useful for agricultural work?
Ans: Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans: Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans: Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans: The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#6 september,6 september 2023, 6 september 2021 panchang, 6 september 2022 special day, 6 september 2023 weather, 6 september 2022 panchang in hindi,6 september is celebrated as, what is celebrated on 6 september, 6 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.