26 June | 26 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

26 June

26 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– सोमवार

दिनांक- 26/06/2023, 26 June

मिती- आषाढ शुक्ल 8

शके– 1945

सुविचार- समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण आपल्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो.

म्हणी व अर्थ
कानात बुगडी, गावात फुगडी
अर्थ:- आपले वैभव प्रदर्शित करणारी स्री
वाक्प्रचार
प्रेम करणे – माया करणे.
26 जून दिनविशेष

ठळक घटना आणि घडामोडी

26 june हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७७ वा किंवा लीप वर्षात १७८ वा दिवस असतो.

चौथे शतक

  • ३६३ – रोमन सम्राट ज्युलियनचा मृत्यू. जोव्हियन सम्राटपदी.

सातवे शतक

  • ६८४ – बेनेडिक्ट दुसरा पोप पदी.

पंधरावे शतक

  • १४८३ – रिचर्ड तिसरा इंग्लंडच्या राजेपदी.

अठरावे शतक

  • १७२३ – रशियन सैन्याने अझरबैजानची राजधानी बाकु जिंकली.

एकोणिसावे शतक

  • १८०७ – लक्झेम्बर्गमध्ये गोदामावर वीज पडून २३० ठार.
  • १८१९ – सायकलचा पेटंट देण्यात आला.

विसावे शतक

  • १९२४ – अमेरिकेच्या सैन्याने डॉमिनिकन प्रजासत्ताकमधून माघार घेतली.
  • १९४५ – सान फ्रान्सिस्कोमध्ये संयुक्त राष्ट्रांचे संविधान जाहीर झाले.
  • १९४८ – सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.
  • १९५९ – अमेरिकेतील सेंट लॉरेन्स सी वे खुला झाला.
  • १९६० – सोमालियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९६० – मादागास्करला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६३ – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीने मी बर्लिनचा एक नागरिक आहे (इश बिन आइन बर्लिनेर) असे जाहीर केले.
  • १९७३ – सोवियेत संघातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम या उपग्रह प्रक्षेपणतळावर कॉसमॉस ३-एम. प्रकारच्या रॉकेटचा स्फोट. ९ ठार.
  • १९७५ – तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
  • १९७६ – कॅनडातील टोरोंटो शहरातील सी.एन. टॉवर खुला.
  • १९७७ – एल्व्हिस प्रेस्लीचा शेवटचा जाहीर कार्यक्रम.
  • १९७८ – एर कॅनडा फ्लाइट १८९ हे डी.सी.९ प्रकारचे विमान टोरोंटो येथे उड्डाण करताना कोसळले. २ ठार.
  • १९७९ – मुष्टियोद्धा मुहम्मद अलीने निवृत्ती घेतली.

एकविसावे शतक

  • २००६ – मॉॅंटेनिग्रोला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

जन्म

  • १६८१ – हेडविग सोफिया, स्वीडिश लेखक.
  • १६९४ – जॉर्ज ब्रांड्ट, स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १८२४ – लॉर्ड केल्व्हिन, इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८३८ – बंकिमचंद्र चटर्जी, आद्य बंगाली कादंबरीकार.
  • १८५४ – रॉबर्ट लेर्ड बोर्डेन, कॅनडाचा आठवा पंतप्रधान.
  • १८७४ – छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज.
  • १८८८ – नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ बालगंधर्व, मराठी रंगभूमीवरील अभिनेते, गायक.
  • १८९२ – पर्ल बक, अमेरिकन लेखिका.
  • १९१४ – शापूर बख्तियार, इराणचा पंतप्रधान.
  • १९५१ – गॅरी गिलमोर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ – मिखाइल खोदोर्कोव्स्की, रशियन उद्योगपती.

मृत्यू

  • ३६३ – ज्युलियन, रोमन सम्राट.
  • १५४१ – फ्रान्सिस्को पिझारो, स्पॅनिश कॉॅंकिस्तादोर.
  • १९२२ – आल्बर्ट पहिला, मोनॅकोचा राजा.
  • १९४४ – प्रफुल्लचंद्र रे, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
  • २००१ – वसंत पुरुषोत्तम काळे, मराठी साहित्यिक.
  • २००४ – यश जोहर, भारतीय चित्रपट निर्माता.

प्रतिवार्षिक पालन

  • ध्वज दिन – रोमेनिया
  • स्वातंत्र्य दिन – मादागास्कर, सोमालिया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

चतुराई
एका नगरा जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता. त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे. आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता. त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,
“राजू, तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी. पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार,मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती”.
दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले, ” बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत”.
दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.
लगेच मुलाचे पत्र आले, ” बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा”.
इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.
तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

माझा भारत महान
नाही लहान सहान
भुकेल्यांची भागवू रे
आम्ही भूकही तहान ।।धृ।।
मैत्री अशी निभवू रे
राहू प्रसंगी गहाण
शत्रू साठी सदा सज्ज
सारे जवान किसान ।।१।।
हिंदी आम्ही नका आम्हा
समजू रे हीन दीन
धन हृदयी आमुच्या
सदा शांती समाधान ।।२।।
आम्हावर आतिरेक
नाही बात ही आसान
अंत होताच शांतीचा
सोडू युध्दाचाही बाण ।।३।।
धर्म एक मानवता
आम्ही आहोत जाणून
शेती बाडी घरे बिरे
आम्ही पाहू मागाहून ।।४।।
काय सांगू आणखीन
माझ्या भारताचे गुण
सदा शांतीचा क्रांतीचा
इथे येतो जातो क्षण ।।५।।
~सौ.मंगला मधुकर रोकडे, धुळे

बालगीत

गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…
गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…
वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) कानिफनाथ महाराज यांची समाधी महाराष्ट्रात कुठे आहे?                                                                                                               – मढी, अहमदनगर

2) महाराष्ट्रातील शिवाजी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे?
– कोल्हापुर
3) कोणत्या नदीच्या खोऱ्यास संताची भूमी म्हणून संबोधले जाते?
– गोदावरी नदी
4) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?
– यशवंतराव चव्हाण
5) गुगली ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबधित आहे?
– क्रिकेट

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#26 june, 26 june 2023, 26 june 2021 panchang, 26 june 2022 special day, 26 june 2023 weather, 26 june 2022 panchang in hindi, 26 june is celebrated as, what is celebrated on 26 june, 26 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.