27 June | 27 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

27 June

27 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– मंगळवार

दिनांक- 27/06/2023, 27 June

मिती- आषाढ शुक्ल 9

शके– 1945

सुविचार- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

म्हणी व अर्थ- पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.

वाक्प्रचार- कासावीस होणे- व्याकूळ होणे.
27 जून दिनविशेष

ठळक घटना आणि घडामोडी

27 june हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १७८ वा किंवा लीप वर्षात १७९ वा दिवस असतो.

सातवे शतक

  • ६७८ – संत अगाथो पोपपदी.

सोळावे शतक

  • १५४२ – हुआन रॉद्रिगेझ काब्रियोने कॅलिफोर्नियावर स्पेनचे आधिपत्य जाहीर केले.

अठरावे शतक

  • १७०९ – पीटर पहिल्याने चार्ल्स बाराव्याचा पराभव केला.

एकोणिविसावे शतक

  • १८०६ – ब्रिटीश सैन्याने आर्जेन्टिनाची राजधानी बोयनोस एर्स जिंकली.
  • १८४४ – मोर्मोन चर्चच्या संस्थापक जोसेफ स्मिथ ज्युनियरचा कार्थेज, इलिनॉय येथे तुरुंगात खून.

विसावे शतक

  • १९५३ – जोसेफ लेनियेल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
  • १९५४ – सोवियेत संघात ओब्निन्स्क येथे जगातील पहिले अणुशक्तिवर चालणारे विद्युत उत्पादन केंद्र सुरू.
  • १९५७ – अमेरिकेच्या टेक्सास व लुईझियाना राज्यात हरिकेन ऑड्रीचा धुमाकूळ. ५०० ठार.
  • १९६७ – लंडनजवळ एन्फिल्ड येथे जगातील पहिले ए.टी.एम. सुरू.
  • १९७७ – जिबुटीला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९८० – एरोलिनी इटाव्हिया फ्लाइट ८७० हे डी.सी.८ प्रकारचे विमान इटलीत युस्टीका शहराजवळ कोसळले. ८१ ठार.
  • १९८८ – फ्रांसच्या गॅरे दि ल्यॉॅं रेल्वे स्थानकात दोन रेल्वे गाड्यांची टक्कर. ५९ ठार, ५५ जखमी.
  • १९९१ – युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
  • १९९८ – कुआलालम्पुर विमानतळ खुला.

एकविसावे शतक

  • २००७ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी राजीनामा दिला.

जन्म

  • १०४० – लाडिस्लॉस पहिला, हंगेरीचा राजा.
  • १३५० – मनुएल दुसरा पॅलिओलॉगस, पूर्व रोमन सम्राट.
  • १४६२ – लुई बारावा, फ्रांसचा राजा.
  • १५५० – चार्ल्स नववा, फ्रांसचा राजा.
  • १८६४ – शिवराम महादेव परांजपे, प्रखर राष्ट्रीय नेते आणि काळ या साप्ताहिकाचे संपादक.
  • १८६९ – हान्स श्पेमान, जर्मन प्राणीशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९१७ – खंडेराव रांगणेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२४ – रॉबर्ट ऍपलयार्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३० – रॉस पेरो, अमेरिकन उद्योगपती व राजकारणी.
  • १९५१ – मेरी मॅकअलीस, आयरिश राष्ट्राध्यक्ष.
  • १९६३ – मीरा स्याल, ब्रिटीश लेखिका, अभिनेत्री.
  • १९८० – केव्हिन पीटरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८३ – डेल स्टाइन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८५ – स्वेतलाना कुझ्नेत्सोवा, रशियाची टेनिस खेळाडू.

मृत्यू

  • ११४९ – ॲंटिओखचा रेमंड.
  • १४५८ – आल्फोन्से पाचवा, अरागॉनचा राजा.
  • १८३९ – रणजितसिंग, पंजाबातील शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक.
  • १८४४ – जोसेफ स्मिथ ज्युनियर, मोर्मोन चर्चचा संस्थापक.
  • १९९९ – जॉर्ज पापादुपॉलस, ग्रीसचा हुकुमशहा.
  • २००८ – सॅम माणेकशा, भारताचे फिल्ड मार्शल.

प्रतिवार्षिक पालन

  • एच.आय.व्ही. चाचणी दिन – अमेरिका
  • शिवराज्याभिषेकदिन – या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडला स्वराज्याच्या राजधानीचा दर्जा दिला आणि याच गडावर छत्रपतींचा राज्याभिषेक झाला.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

चतुराई
एका नगरा जवळील खेड्या मध्ये एक वृद्ध माणूस राहत होता. त्याची इच्छा होती कि घरासमोरील अंगणात बटाट्याची लागवड व्हावी, पण हे खूप कष्टाचे काम आहे. आणि दुर्दैवाने त्याचा मुलगा तुरुंगात होता. त्यामुळे हे कसे होणार, असे म्हणून तो आपल्या मुलाला एक पत्र लिहितो,
“राजू, तुझ्या स्वर्गवासी आईची इच्छा होती कि आपल्या अंगणात बटाट्याची लागवड व्हावी. पण त्यासाठी सारे आंगण खोदावे लागणार,मी तर थकलो आहे, तू इथे असतास तर मदत झाली असती”.
दोनच दिवसात त्या वृद्ध माणसाला त्याच्या मुलाकडून पत्र आले, ” बाबा, कृपया करून तुम्ही आपले आंगण खोदू नका, तिथे मी पिस्तुल व कार्तुस लपविली आहेत”.
दुसर्या दिवशी सकाळी पूर्ण मुंबई पोलीस सांगली मध्ये दाखल झाली, त्यांनी पूर्ण आंगण खोदले पण त्यांना काहीच मिळाले नाही.
लगेच मुलाचे पत्र आले, ” बाबा आंगण खोदून झाले, आता तुम्ही बी पेरा व बटाट्याची मोठी बाग आपल्या अंगणात फुलवा”.
इथे बसून मी तुमच्यासाठी सर्वोत्तम म्हणजे हेच करू शकतो.
तात्पर्य :- मनापासून काहीही करायचे ठरविले तर ते नक्की होते, मग तुम्ही दुसर्या गावी असूद्यात किंवा परदेशात असूद्यात.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

बालगीत

घड्याळ दादा — घड्याळ दादा –जरा थांब थांब !

सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !
तुझा एक हात आहे खूप -खूप मोठा
मिनटा-मिनटाला टोचे वेळेचा काटा
तुझा दुसरा हात आहे छोटा छोटा
पण तासाची गणिते करतो पटा -पटा
मोजतोस तू फक्त एक-ते – बारा आहेस ढ गोळा !
आमच्या आळसावर मात्र सतत तुझा डोळा !
हसतोस फक्त गोड-गोड बसून भिंतीवर !
सारे जग मात्र चाले तुझ्या तालावर !

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

 ✪ एका तासाचे किती मिनिटे होतात ?
 ➜ ६० मिनिटे
 ✪ एका मिनिटाचे किती सेकंद होतात ?
 ➜ ६० सेकंद
 ✪ एका तासाचे किती सेकंद होतात ?
 ➜ ३६०० सेकंद
 ✪ घड्याळातील मोठा काटा काय दाखवतो ?
 ➜ मिनीट
 ✪ घड्याळातील लहान काटा काय दाखवतो?
 ➜ तास

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#27 june, 27 june 2023, 27 june 2021 panchang, 27 june 2022 special day, 27 june 2023 weather, 27 june 2022 panchang in hindi,27 june is celebrated as, what is celebrated on 27 june, 27 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.