23 august | 23 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

23 august

23 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 23/08/2023, 23 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 7

शके– 1945

सुविचार- जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा. Rather than being honest with the world Be honest with yourself first.

म्हणी व अर्थ : खायला काळ भुईला भार – निरोद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.

वाक्प्रचार- कबूल करणे – मान्य करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३५ वा किंवा लीप वर्षात २३६ वा दिवस असतो.

चौदावे शतक

  • १३०५ – देशद्रोहाच्या आरोपावरून स्कॉटलंडच्या विल्यम वॉलेसचा वध.

अठरावे शतक

  • १७०८ – मैडिंग्नु पम्हैबाचा मणिपूरच्या राजेपदी राज्याभिषेक.
  • १७७५ – इंग्लंडच्या राजा तिसऱ्या जॉर्जने अमेरिकेतील वसाहतींनी उठाव केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

एकोणिसावे शतक

  • १८६६ – प्रागचा तह – ऑस्ट्रिया व प्रशियातील युद्ध संपुष्टात आले.

विसावे शतक

  • १९१४ – पहिले महायुद्ध – जपानने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले व चीनच्या किंग्दाओ शहरावर बॉम्बफेक केली.
  • १९२९ – हेब्रॉन हत्याकांड – हेब्रॉन शहरात अरब दहशतवाद्यांनी सुमारे ६५ ज्यू व्यक्तींना ठार मारले व उरलेल्यांची हकालपट्टी केली.
  • १९३८ – इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या लेन हटनने ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेट सामन्यात ३६४ धावांची विक्रमी खेळी केली.
  • १९३९ – दुसरे महायुद्ध-मोलोटोव्ह-रिबेनट्रॉप करार – या कराराच्या गुप्त अटींनुसार जर्मनी व सोवियेत संघाने बाल्टिक देश, फिनलंड, रोमेनिया व पोलंडची आपापसात वाटणी करून घेतली.
  • १९४२ – दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई सुरू.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध-खार्कोव्ह शहराचा वेढा फुटला.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध-मार्सेल शहराचा वेढा फुटला.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – रोमेनियाने अक्ष राष्ट्रांचा साथ सोडून दोस्त राष्ट्रांशी संधान बांधले.
  • १९४४ – अमेरिकन सैन्याचे बी-२४ प्रकारचे विमान इंग्लंडच्या फ्रेकलटन शहरातील शाळेवर पडले. ६१ ठार.
  • १९७५ – लाओसमध्ये उठावात साम्यवादी पक्षाने सत्ता काबीज केली.
  • १९८९ – एस्टोनिया, लात्व्हिया आणि लिथुएनियातील सुमारे वीस लाख लोकांनी व्हिल्नियस-तालिन रस्त्यावर मानवी साखळी निर्माण केली.
  • १९८९ – ऑस्ट्रेलियातील १,६४५ वैमानिकांनी सामूहिक राजीनामा दिला.
  • १९९० – आर्मेनियाने सोवियेत संघापासून स्वतःला स्वतंत्र जाहीर केले.
  • १९९४ – पहिल्या महायुद्धातील एकमेव श्यामवर्णीय वैमानिक युजीन बुलार्ड याला मृत्युपश्चात सेकंड लेफ्टनंटचे पद देण्यात आले.

एकविसावे शतक

  • २००० – गल्फ एर फ्लाइट ७२ हे विमान इराणच्या अखातात मनामाजवळ कोसळले. १४३ ठार.

जन्म

  • १७५४ – लुई सोळावा, फ्रांसचा राजा.
  • १८५२ – क्लिमाको काल्देरॉन, कोलंबियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८६४ – एलेफ्थेरियोस व्हेनिझेलोस, ग्रीसचा पंतप्रधान.
  • १९०९ – सिड बुलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१७ – टेक्स विल्यम्स, अमेरिकन गायक.
  • १९२१ – सॅम कूक, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३१ – हॅमिल्टन ओ. स्मिथ, अमेरिकन सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ.
  • १९३२ – हूआरी बूमेदियेन, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५१ – अखमद कादिरोव, चेच्न्याचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५१ – नूर, जॉर्डनची राणी.
  • १९६३ – रिचर्ड इलिंगवर्थ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ – रिचर्ड पेट्री, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ – केरी वॉल्म्सली, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ – मलाइका अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

  • ६३४ – अबु बकर, अरब खलीफा.
  • ११७६ – रोकुजो, जपानी सम्राट.
  • १३०५ – विल्यम वॉलेस, स्कॉटलंडचा क्रांतिकारी.
  • १३८७ – ओलाफ चौथा, नॉर्वेचा राजा.
  • १८०६ – चार्ल्स ऑगुस्तिन दि कूलंब, फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९२ – देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९७१ – मूळ शामू, सीवर्ल्डमधील ओर्का देवमासा.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥
अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान ॥१॥
ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान ॥२॥
ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण ॥३॥
स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान् ॥४॥
आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण ॥५॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

मैत्री
विनोद आणि अजय यांची खूप चांगली मैत्री होती. ते एकाच वर्गात शिकत होते. विनोद मन लावून शिकायचा पण अजयचे मन मात्र सदैव इकडे तिकडे नेहमीच भरकटलेले असायचे.
वर्गात शिक्षक शिकवत असताना अजयला नेहमी बोलणी खावी लागायची ती ह्याच लक्ष न देण्याच्या कारणावरून पण विनोद मात्र नेहमीच अभ्यासात पुढे राहायचा व शाबासकी मिळवायचा.
एके दिवशी विज्ञानाचे शिक्षक वर्गात शिकवीत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वहीमध्ये गृहपाठ करण्याची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी गृहपाठ पूर्ण केला होता.
पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता.
पण अजयने मात्र आपल्या सवयीनुसार गृहपाठ व्यवस्थित पूर्ण केला नव्हता.
त्याची वही पाहून शिक्षक रागाने त्याला म्हणाले, “हे तू काय केले आहेस?
मी तर पानाच्या एका बाजूनेच लिहायला सांगितले होते पण तू दोन्ही बाजूने लिहीले आहेस.”
आता अजय घाबरला. कारण शिक्षकांनी त्या दिवशी सुट्टी होण्याच्या आत वही पूर्ण करायला सांगितले होते आणि सुट्टी होण्यास फक्त दोनच तास राहिले होते.
अजयला घाबरलेल्या अवस्थेत पाहून विनोदने त्याला त्याच्या लक्ष न देण्याच्या सवयीबद्दल उपदेश केला व शिक्षकांकडून परवानगी घेवून बाजारात जावून नवीन वही आणली.
इतकेच नाही तर अजयसोबत बसून त्याचा गृहपाठ पूर्ण केला.आणि त्याची वही शिक्षकांकडे जमा केली. त्या दिवसापासून अजयने आपल्या स्वभावात बदल केला आणि तो कोणतेही ठिकाणी लक्षपूर्वक काम करू लागला.
तात्पर्य – लक्षपूर्वक आणि विवेकबुद्धी जागृत ठेऊन काम केल्याने सर्व संकटावर मात करता येते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे

बालगीत

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या
जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर – ‘क’ जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ‘ब’ जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर:’ ड’ जीवनसत्व

ENGLISH QUESTION

1) Name the National fruit of India?
Ans. Mango
2) What is the National song of India?
Ans. Vande Mataram
3) Who designed the National Flag of India?
Ans. The flag was designed by Pingali Venkayya.
4) Name the National game of India?
Ans. India does not have an official National Game.
5) Name the National tree of India?
Ans. Banyan tree

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#23 august, 23 august 2023, 23 august 2021 panchang, 23 august 2022 special day, 23 august 2023 weather, 23 august 2022 panchang in hindi, 23 august is celebrated as, what is celebrated on 23 august, 23 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.