24 august | 24 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

24 august

24 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 24/08/2023, 24 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 8

शके– 1945

सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कार्याचे फलित म्हणजे यश होय. Done with a concentrated mind The result of any work That means success.

म्हणी व अर्थ : कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा , मतलबी माणूस.

वाक्प्रचार-  गट्टी करणे – दोस्ती करणे.
24 august

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३६ वा किंवा लीप वर्षात २३७ वा दिवस असतो.

पहिले शतक

  • ७९ – इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम व स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाउन नष्ट.

तेरावे शतक

  • १२१५ – पोप इनोसंट तिसऱ्याने मॅग्ना कार्टा रद्द केल्याचे जाहीर केले.

पंधरावे शतक

  • १४५६ – गटेनबर्ग बायबलची छपाई संपूर्ण.

सोळावे शतक

  • १५११ – अफोन्सो दि आल्बुकर्कने मलाक्काच्या सल्तनतीचा पाडाव केला.

सतरावे शतक

  • १६०८ – ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे उतरला.
  • १६९० – कोलकाताशहराची स्थापना.

एकोणिसावे शतक

  • १८१४ – १८१२ चेयुद्ध – ब्रिटीश सैन्य अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये घुसले व व्हाइट हाउससह अनेक इमारतींची जाळपोळ केली.
  • १८२१ – कोर्दोबाचा तह – मेक्सिकोच्या स्वातंत्र्ययुद्धाची सांगता.
  • १८५८ – अमेरिकेच्या रिचमंड शहरात शिकल्याबद्दल ९० श्यामवर्णीय व्यक्तींना अटक करण्यात आली.
  • १८९१ – थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचा पेटंट मिळवला.

विसावे शतक

  • १९०९ – पनामा कालव्याचे बांधकाम सुरू.
  • १९१२ – अलास्का अमेरिकेचा प्रांत झाले.
  • १९२९ – तुर्कस्तान व पर्शियामध्ये मैत्रीकरार.
  • १९२९ – पॅलेस्टाईनमधील वांशिक दंगलींमध्ये १०७ ज्यू व्यक्ती ठार.
  • १९३१ – फ्रान्स व रशियामध्ये ना-युद्ध करार.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिसवर हल्ला केला.
  • १९५४ – अमेरिकेत कम्युनिस्ट पक्षावर बंदी.
  • १९५४ – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गासने आत्महत्या केल्यावर होआव काफे फिल्हो राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९६० – व्होस्तोक, अंटार्क्टिका येथे जगातील सगळ्यात कमी तपमान (-८८ सेल्शियस) नोंदले गेले.
  • १९६६ – विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
  • १९६८ – फ्रांसने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला.
  • १९९१ – मिखाईल गोर्बाचोव्हने सोवियेत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
  • १९९१ – युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
  • १९९२ – चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले.
  • १९९२ – हरिकेन अँड्रु हे कॅटेगरी ५ चे वादळ फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर आले.
  • १९९५ – मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.

एकविसावे शतक

  • २००१ – एर ट्रॅन्सॅट फ्लाइट २३६ हे एरबस ए३३० प्रकारचे विमान इंधन संपल्यामुळे एझोर्स द्वीपांवर उतरले.
  • २००४ – मॉस्कोच्या दॉमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून निघालेली दोन विमाने आत्मघातकी हल्लेखोरांच्या बॉम्बहल्ल्यात नष्ट. शेकडो ठार.
  • २००६ – आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले.

जन्म

  • १८३३ – नर्मदाशंकर दवे, गुजराती साहित्यिक व समाजसुधारक.
  • १८७२ – न. चिं. केळकर (नरसिंह चिंतामण केळकर), मराठी साहित्यिक; ‘मराठा’, केसरी वृत्तपत्रांचे संपादक.
  • १९०८ – हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भारतीय क्रांतिकारक.

मृत्यू

  • १९२५ – डॉ. रा. गो. भांडारकर (रामकृष्ण गोपाळ भांडारकर), प्राच्यविद्या संशोधक, शिक्षणतज्ज्ञ
  • १९९३ – प्रा. दि. ब. देवधर, भारतीय क्रिकेट खेळाडू
  • २००८ – वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
  • अहिल्याबाई होळकर , होळकर घराण्यातील राज्यकर्ती, परम शिवभक्त

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥
अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान ॥१॥
ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान ॥२॥
ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण ॥३॥
स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान् ॥४॥
आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण ॥५॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

बळी तो कान पिळी
एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरु होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले.
ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं,
एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारुन खाल्लं.’ त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता.
पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकऱ्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही. या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली.
यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला. शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले,
‘एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले.
‘अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे.
यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचाऱ्या गाढवाला ठार मारले.
 तात्पर्य – बळी तो कान पिळी

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या
जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर – ‘क’ जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ‘ब’ जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर:’ ड’ जीवनसत्व

ENGLISH QUESTION

1) Name the National fruit of India?
Ans. Mango
2) What is the National song of India?
Ans. Vande Mataram
3) Who designed the National Flag of India?
Ans. The flag was designed by Pingali Venkayya.
4) Name the National game of India?
Ans. India does not have an official National Game.
5) Name the National tree of India?
Ans. Banyan tree

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#24 august, 24 august 2023, 24 august 2021 panchang, 24 august 2022 special day, 24 august 2023 weather, 24 august 2022 panchang in hindi, 24 august is celebrated as, what is celebrated on 24 august, 24 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.