21 august | 21 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

21 august

21 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 21/08/2023, 21 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 5

शके– 1945

सुविचार- शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

म्हणी व अर्थ :

रात्र थोडी सोंगे फार –अर्थ ::~ काम भरपूर, वेळ कमी
वाक्प्रचार-  सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट २१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३३ वा किंवा लीप वर्षात २३४ वा दिवस असतो.

  • १९५९ – युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयझेनहॉवर यांनी हवाई हे युनियनचे ५० वे राज्य घोषित करणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली.
  • १९८८ – भारत-नेपाळ सीमेवर भूकंप
  • १९९१ – सोव्हिएत युनियनचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव विरुद्ध सत्तापालटाचा प्रयत्न कोसळला.

जन्म

  • ११६५ – फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.
  • १६४३ – अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
  • १७६५ – विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १७८९ – नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.
  • १९१० – ऑगस्टिन लुई कॉशी, फ्रेंच गणितज्ञ.
  • १९३८ – केनी रॉजर्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९३९ – फेस्टस मोगे, बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४४ – पेरी क्रिस्टी, बहामासचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६३ – मोहम्मद सहावा, मोरोक्कोचा राजा.
  • १९७३ – सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक.
  • १९७५ – सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८४ – नील डेक्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८६ – उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू.

मृत्यू

  • १९४० – लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.
  • १९७८ – विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू
  • १९३१ – विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.
  • १९८२ – सोभुझा दुसरा, स्वाझीलॅंडचा राजा.
  • १९९५ – सुब्रमण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ
  • २००१ – शरद तळवलकर, मराठी चित्रपटअभिनेता
  • २००६ – उस्ताद बिस्मिल्ला खॉं, ख्यातनाम भारतीय सनईवादक.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

अमुचे जग गाइल जयगान॥ धृ॥
अमुच्या मंगल देशासाठी अम्ही उजळल्या जीवनज्योती
शांतपणाने इथे चालले अखंड जीवनदान ॥१॥
ओठावर या अनेक भाषा नयनापुढती एकच आशा
एकदिलाने सदैव नांदू सोडुनि हे अभिमान ॥२॥
ह्रदयांतिल ते स्वप्न मनोहर अवलोकाया होउनि आतुर
पत्थर कांटे तुडवित आलो तिमिरातून भयाण ॥३॥
स्मरण कुणाला भूकतृषेचे भानही कुठले भंवतालीचे
हासत अपुल्या हवनांतुन हे उभवू राष्ट्र महान् ॥४॥
आज जगी या म्हणती वेडे गातिल सगळे उद्या पवाडे
देतिल अमुच्या धवल यशाचे फडकावून निशाण ॥५॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते.
शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला.
शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला.
दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला.
शाम रामला म्‍हणाला, ’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’
रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला.
दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’
यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे.
तात्पर्य –
गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

◆ ‘ सेमीनरी हिल्स ‘ हे वनोद्यान कोणत्या जिंल्ह्यात आहे ?
  ➜नागपूर.
◆ मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता ?
  ➜निजाम.
◆ वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ठाणे.
◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
  ➜प्रीतिसंगम.
◆ ‘वाॅटर अँन्ड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ‘ कोठे आहे ?
  ➜औरंगाबाद.

ENGLISH QUESTION

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute?
Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are in half hour?
Ans: 30 minutes
6) How many minutes are there in a quarter of an hour?
Ans: 15 minutes
7) How many minutes are there hour?
in a three quarters of an
Ans: 45

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#20 august, 20 august 2023, 20 august 2021 panchang, 20 august 2022 special day, 20 august 2023 weather, 20 august 2022 panchang in hindi, 20 august is celebrated as, what is celebrated on 20 august, 20 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.