19 august | 19 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

19 august

19 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 19/08/2023, 19 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 3

शके– 1945

सुविचार- ज्याने स्वत:चं मन जिंकलं, त्याने जग जिंकलं. Who won his heart He conquered the world.

म्हणी व अर्थ : अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपण नुकसानकारक ठरते.

वाक्प्रचार-  सर्वस्व पणाला लावणे – सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३१ वा किंवा लीप वर्षात २३२ वा दिवस असतो.

सतरावे शतक

  • १६६६ – दुसरे ॲंग्लो-डच युद्ध-होम्सची होळी – रियर ॲडमिरल रॉबर्ट होम्सने नेदरलॅंड्सच्या टेर्शेलिंग बेटावर हल्ला चढवून १५० व्यापारी जहाजे जाळली.
  • १६९२ – सेलम विच ट्रायल्स – चेटूकविद्येचा वापर करीत असल्याच्या आरोपावरून सेलम, मॅसेच्युसेट्स येथे एक स्त्री एक धर्मगुरू सहित पाच व्यक्तींना मृत्युदंड.

एकोणिसावे शतक

  • १८३९ – जाक दग्वेरेने आपल्या फ्रेंच विज्ञान अकादमीला छायाचित्र तयार करून दाखवले.

विसावे शतक

  • १९१९ – अफगाणिस्तानला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९३४ – जर्मन जनतेने ८९.९% मतांनी फ्युह्रर हे पद निर्माण करण्याचे ठरवले.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – दोस्त सैन्याच्या साथीने पॅरिसमधील जनता जर्मनीविरुद्ध उलटली.
  • १९४५ – हो चि मिन्ह व्हियेतनाममध्ये सत्तेवर.
  • १९५३ – सी.आय.ए.ने इराणमध्ये मोहम्मद मोसादेघचे सरकार उलथवून शाह मोहम्मद रझा पहलवीला सत्तेवर बसवले.
  • १९५५ – हरिकेन डायेनने अमेरिकेच्या ईशान्य भागात २०० बळी घेतले.
  • १९८० – सौदी अरेबियातील रियाध शहराच्या किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौदिया फ्लाइट १६३ हे लॉकहीड एल-१०११ ट्रायस्टार प्रकारचे विमानचे आपत्कालीन परिस्थीतीत उतरले. नंतर लागलेल्या आगीत ३०१ ठार.
  • १९८१ – अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी सिद्राच्या अखातात लिब्याची दोन सुखॉई एस.यु. २२ प्रकारची विमाने पाडली.
  • १९८७ – युनायटेड किंग्डमच्या हंगरफोर्ड शहरात मायकेल रायनने सोळा व्यक्तींना गोळ्या घालून नंतर स्वतःचा जीव घेतला.
  • १९९१ – सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्हला फोरोस येथे सुट्टीवर असताना नजरकैदेत घातले गेले.

एकविसावे शतक

  • २००२ – ग्रॉझ्नीजवळ चेच्न्याच्या सैन्याने रशियाचे एम.आय. २६ प्रकारचे हेलिकॉप्टर पाडले. ११८ सैनिक ठार.
  • २००३ – इराकमधील संयुक्त राष्ट्रांच्या दूतावासावर आत्मघातकी हल्ला. राजदूत सर्जियो व्हियैरा डि मेलोसह २२ ठार.
  • २००३ – जेरुसलेममध्ये हमासने केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात ७ मुलांसह २३ ठार.

जन्म

  • १८७८ – मनुएल क्वेझोन, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८३ – होजे मेंडेस काबेसादास, पोर्तुगालचा राष्ट्राध्यक्ष आणि पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९०३ – गंगाधर देवराव खानोलकर, मराठी लेखक.
  • १९२१ – जीन रॉडेनबेरी, स्टार ट्रेक कथानाकाचे निर्माते.
  • १९२२ – बबनराव नावडीकर, मराठी गायक.
  • १९४६ – बिल क्लिंटन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८७ – आयलीना डिक्रुझ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू

  • १४ – ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
  • १४९३ – फ्रेडरिक तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १६६२ – ब्लेस पास्कल, फ्रेंच गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी.
  • १९४७ – ऍल्सिदे दि गॅस्पेरी, इटलीचा पंतप्रधान.
  • १९५४ – ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
  • १९७६ – केन वॉड्सवर्थ, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ – ग्राउचो मार्क्स, अमेरिकन अभिनेता.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा
उघड दार देवा आता,
उघड दार देवा
पिते दूध डोळे मिटुनी
जात मांजराची
मनी चोरट्याच्या का रे
भीती चांदण्याची
सरावल्या हातांनाही कंप का सुटावा
उजेडात होते पुण्य
अंधारात पाप
ज्याचे त्याचे हाती आहे
कर्तव्याचे माप
दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा
स्वार्थ जणू भिंतीवरचा
आरसा बिलोरी
आपुलीच प्रतिमा होते
आपुलीच वैरी
घडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी
मुक्तपणे भक्ती माझी,
तुझी तू लुटावी
मार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा
भलेपणासाठी कोणी
बुरेपणा केला बंधनात असुनी
वेडा जगी मुक्त झाला
आपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

श्रीमंत व्यापारी
एका मोठ्या शहरात एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता आणि नुकतेच त्याने शहरात एक मोठे घर घेतले होते. त्याच्याकडे धनसंपत्ती तर भरपूर होती. परंतु शरीराने तो अतिशय दुबळा व अस्वस्थ होता.
तो दिवस-रात्र मेहनत करून पैसे कमावित असे. परंतु आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला त्याच्याकडे वेळ नव्हता. हळू हळू तो खूप श्रीमंत झाला परंतु त्याला आहेत रोगांनी विळखा घातला.
तो व्यक्ती स्वार्थी नव्हता, परंतु त्याच्याकडे आपला पैसा खर्च करण्यासाठी वेळ नव्हता त्याला जणू पैसे कमावण्याची सवयच लागली होती. त्याला डॉक्टराकडे जाण्याची वेळच मिळत नसे.
शरीराकडे लक्ष न दिल्याने हळूहळू त्याचे शरीर कमजोर व्हायला लागले.
एक दिवस कामावरून थकून तो घरी आला. आज त्याचे डोके खूप दुखत होते, म्हणून तो सरळ आपल्या रूम मध्ये जावून झोपून गेला.
जेव्हा त्याच्या नौकराने त्याला जेवायला विचारले तेव्हा भूक नाही म्हणून, त्याने जेवायला नाही म्हटले.
अर्ध्या रात्री त्याचे डोक्यात अतिशय वेदना व्ह्यायाला लागल्या.
त्याला काहीही लक्षात येत नव्हते. अचानक त्याच्या समोर त्याच्याच आकाराएवढी एक आकृती उभी राहिली.
ती आकृती म्हणाली, “मी तुझी आत्मा आहे आणि आज मी तुझे शरीर सोडून जाणार आहे.”
तेव्हा तो माणूस भित भित म्हणाला, “तू माझ्या शरीराला का सोडत आहे?
माझ्याकडे भरपूर पैसा आहे व मी माझे संपूर्ण आयुष्य मेहनत केली आहे. मी एवढ्या विशाल घरात राहतो, की या घरात राहण्याची आणि अनेक जण फक्त स्वप्नेच पाहतात.
आत्मा म्हणाली, “माझी गोष्ट ऐक, तुझे हे मोठे घर माझ्या काहीही कामाचे नाही.
माझे घर तर तुझे शरीर आहे. जे दिवसेंदिवस कमजोर होऊन, अनेक रोगांनी ग्रसित झाले आहे.”
“तू कल्पना कर अनेक वर्षे तुटलेल्या झोपडीत राहण्याची. बस त्याच पद्धतीने तू माझी हालत केली आहे. आणि आता मी या घरात अधिक काळ राहू शकत नाही.”
एवढे बोलून आत्मा त्या शरीराला सोडून निघून गेली.
तात्पर्य: शरीर व चांगले स्वास्थ ही सर्वात मोठी संपत्ती आहे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

2.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
सोनेरी हे दूत आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी
अजूनही अजूनही ।।१।।
लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहीकडे चोहीकडे ।।२।।
झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या चिमुकल्या ।।३।।
बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई
भूर भूर भूर भूर ।।४।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर : मौलाना आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  होते .
२) ‘ जन गण मन ‘ हे राष्ट्रगीत कोणी रचले?
उत्तर : ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी रचले.
३) रवींद्रनाथ टागोर यांना किती साली नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली पारितोषिक मिळाले.
४) आपले राष्ट्रीय दिवस कोणते आहेत?
उत्तर : स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय उत्सव आहेत.
५) भारतीय संविधानाची अंमलबजावणी कधीपासून सुरू करण्यात आली?
उत्तर : भारतीय संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून सुरू करण्यात आली.

ENGLISH QUESTION

1) How many minutes are there in an hour?
Ans. 60 minutes
2) How many seconds are there in a minute?
Ans. 60 seconds
3) How many seconds make one hour?
Ans. 3600 seconds
4) How many hours are there in a day?
Ans. 24 hours
5) How many minutes are in half hour?
Ans: 30 minutes
6) How many minutes are there in a quarter of an hour?
Ans: 15 minutes
7) How many minutes are there hour?
in a three quarters of an
Ans: 45

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#19 august, 19 august 2023, 19 august 2021 panchang, 19 august 2022 special day, 19 august 2023 weather, 19 august 2022 panchang in hindi, 19 august is celebrated as, what is celebrated on 19 august, 19 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.