18 october |18 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

18 october

18 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- बुधवार

दिनांक- 18/10/2023, 18 ऑक्टोबर

मिती-  आश्विन शुक्ल 4

शके– 1945

सुविचार- धनाच्या लालसाने माणसात पशुत्व येते.

म्हणी व अर्थ – खाई त्याला खवखवे :-वाईट काम करणाऱ्याच्या मनात भीती असते.

वाक्यप्रचार- तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९१ वा किंवा लीप वर्षात २९२ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८७९ – थिऑसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा मुंबईत स्थापन झाली.

विसावे शतक

  • १९०६ – महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबईत डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना केली.
  • १९२२ – ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(बीबीसी)ची अधिकृतरीत्या स्थापना.
  • १९६७ – परग्रहावर उतरणारे पहिले यान- रशियन अंतराळयान व्हेनेरा-४, शुक्रावर उतरले.
  • १९७७ – जर्मन कमान्डोंनी मोगादिशू विमानतळावर अतिरेक्यांना मारून लुफ्तहंसाच्या विमानाची प्रवाशांसह सुटका केली.

एकविसावे शतक

  • २००३ – बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्ष गोंझालो सांचेझ दि लोझादाने पदत्याग करून देशाबाहेर पळ काढला.
  • २००७ – आठ वर्षे देशाबाहेर घालवल्यावर बेनझीर भुट्टो पाकिस्तानला परतली. त्या रात्री आत्मघातकी हल्लेखोरांनी तिच्या मोटारकाफिल्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात २० पोलीस अधिकाऱ्यांसह १०० व्यक्ती ठार झाले.

जन्म

  • ११२७ – गो-शिरिकावा, जपानी सम्राट.
  • १४०५ – पोप पायस दुसरा.
  • १८५४ – बिली मर्डॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८७३ – इव्हानो बोनोमी, इटलीचा पंतप्रधान.
  • १८७५ – लेन ब्रॉॅंड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ – पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.
  • १९२७ – बक दिवेचा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२८ – दीपक शोधन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२९ – व्हायोलेटा चमोरो, निकाराग्वाची राष्ट्राध्यक्ष.
  • १९३९ – ली हार्वे ऑस्वाल्ड, जॉन एफ. केनेडीचा मारेकरी.
  • १९५० – ओम पुरी, भारतीय अभिनेता.
  • १९५२ – रॉय डायस, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५४ – आमेर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५६ – मार्टिना नवरातिलोव्हा, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९६१ – ग्लॅड्स्टन स्मॉल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ – स्टीव स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ – नरेंद्र हिरवाणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ – स्टुअर्ट लॉ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९८० – रितींदरसिंग सोधी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९८१ – नेथन हॉरित्झ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ७०७ – पोप जॉन सातवा.
  • १०३५ – सांचो तिसरा, नव्हारेचा राजा.
  • १४१७ – पोप ग्रेगरी बारावा.
  • १५०३ – पोप पायस तिसरा.
  • १६६७ – फॅसिलिदेस, इथियोपियाचा सम्राट.
  • १८७१ – चार्ल्स बॅबेज,इंग्लिश गणितज्ञ व संशोधक.
  • १९२१ – लुडविग तिसरा, बव्हारियाचा राजा.
  • १९३१ – थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन संशोधक.
  • १९६६ – सेबास्टियन क्रेस्गि, अमेरिकन उद्योगपती.
  • १९८७ – वसंतराव तुळपुळे, कम्युनिस्ट नेता.
  • १९९३ – मंदाकिनी विश्वनाथ आठवले, पहिली मराठी बाल अभिनेत्री.
  • १९९८ – शंकर पाटील, मराठी ग्रामीण कथाकार.
  • २००५ – वीरप्पन, भारतीय चंदनचोर व तस्कर.

प्रतिवार्षिक पालन

  • अलास्का दिन – अमेरिका.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

प्राण्याला सर्वात प्रिय काय ?
  एकदा बादशहाने दरबारी मंडळींना प्रश्न केला की, “या जगात प्राणिमात्राला सर्वात अधिक प्रिय काय असेल?”
या प्रश्नावर बहुतेक सर्वजण म्हणाले, “आपले मूल परंतु बिरबल म्हणाला, “महाराज, या जगात प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो.”
बिरबलाच्या या उत्तराला बादशहाने सिद्ध करून दाखवायला सांगितले.
यानंतर बिरबलाने एका रिकाम्या हौदाच्या मध्यावर त्या हौदाच्या एकूण उंचीपेक्षा थोडा कमी उंचीचा खांब रोवला.
या नंतर त्या हौदात एका वानरीला तिच्या पिल्लासह सोडण्यात आले.
इतके झाल्यावर बादशहा व इतर दरबारी मंडळींना, त्या हौदा जवळ नेऊन बिरबल ने हौदात पाणी सोडणे सुरू केले.
जसं जसे हौदात पाणी वाढायला लागले तसे ती वानरी आपल्या पिल्लाला छातीशी कवटाळून खांबावर चढू लागली.
खांब शेंड्यापर्यंत बुडताचा आपले पिल्लू डोक्यावर घेऊन ती वानरी खांब्यावर उभी राहिली.
परंतु नंतर ते पाणी आणखी वर चढू लागले आणि वानरीच्या गळ्याला लागले.
तेव्हा मात्र आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पिल्लाला खाब्याच्या शेंड्यावर ठेवून ती त्या पिल्लावर उभी राहिली व आपले प्राण वाचविण्याचा प्रयत्न करू लागली.
असा प्रकार पाहताच बिरबल बादशहाला म्हणाला, “महाराज, या जगामध्ये प्राण्याला आपला जीव सर्वात प्रिय असतो,
हे माझे म्हणणे आता तरी तुम्हाला पटले ना?
आपल्या प्राणांची पर्वा न करता मुलाचे प्राण वाचवणारे आई-बाप ही असतात, पण ते अगदी अपवादाने.”
बादशहाने बिरबलचे म्हणणे मान्य करताच, बिरबलाच्या हुकुमावरून सेवकाने नाकातोंडात पाणी गेलेल्या वानरीच्या पिल्लाला बाहेर काढले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

आता पेटवू सारे रान
शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण
किसान मजूर उठतील
कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनी पेटवतिल हे रान !
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण !
शेतकऱ्यांची फौज निघे
हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान !
पडून ना राहू आता खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण !

बालगीत

मामाच्या गावाला जाऊया
झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

इंग्रजी प्रश्न

1) What is the colour of a sunflower?
Ans : Yellow
2) What is the colour of blood in a human body?
Ans : Red
3) What is the colour of a leaf in a plant?
Ans : Green
4) What  colour is the Crow ?
Ans : Black
5) Which color is at the top of the Indian national flag?
Ans : Saffron

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#18 october, 18 october 2023, 18 october 2021 panchang, 18 october 2022 special day, 18 october 2023 weather, 18 october 2022 panchang in hindi, 18 october is celebrated as, what is celebrated on 18,18 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.