17 august | 17 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

17 august

17 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 17/08/2023, 17 ऑगस्ट

मिती-  श्रावण शुक्ल 1

शके– 1945

सुविचार- शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते. Education ends ignorance in man.

म्हणी व अर्थ : आंधळे दळते कुत्रं पीठ खाते – एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा.

वाक्प्रचार- कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२९ वा किंवा लीप वर्षात २३० वा दिवस असतो.

चौथे शतक

३०९/ ३१० – पोप युसेबियसला सम्राट मॅक्सेंटियस याने सिसिलीला पाठवले, जिथे त्याचा मृत्यु झाला.

सातवे शतक

६८२ – पोप लिओ II ने पोप बनला.

एकोणिसावे शतक

  • १८६२ – अमेरिकेत आपल्याच जमिनींवरून हुसकून लावलेल्या लकोटा जमातीच्या लोकांनी मिनेसोटा नदीच्या किनारी असलेल्या श्वेतवर्णीय वसाहतींवर हल्ला केला.

विसावे शतक

  • १९१४ – पहिले महायुद्ध-स्टालुपॉनेनची लढाई – जर्मनीचा रशियन सैन्यावर विजय.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – जर्मनीने अमेरिकेची ६० लढाउ विमाने.
  • १९४५ – ईंडोनेशियाला नेदरलँड्स पासून स्वातंत्र्य.
  • १९६० – गॅबनला फ्रांस पासून स्वातंत्र्य.
  • १९६३ – जपानमध्ये फेरीबोट बुडाली. ११२ ठार.
  • १९६९ – कॅटेगरी ५ हरिकेन कॅमिल मिसिसिपीच्या किनाऱ्यावर आले. २४८ मृत, १,५०,००,००,००० डॉलरचे नुकसान.
  • १९७९ – एरोफ्लोत विमान-वाहतूक कंपनीच्या दोन विमानांची युक्रेनमध्ये टक्कर. १५६ ठार.
  • १९८८ – विमान अपघातात पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद झिया उल-हक व अमेरिकन राजदूत आर्नोल्ड रफेल ठार.
  • १९९९ – तुर्कस्तानच्या इझ्मित शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.४ तीव्रतेचा भूकंप. १७,००० ठार, ४४,००० जखमी.

एकविसावे शतक

  • २००५ – बांगलादेशच्या ६४पैकी ६३ जिल्ह्यांमध्ये बॉम्बस्फोट. दोन ठार.
  • २००८ – मायकेल फेल्प्सने २००८ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये आठवे सुवर्णपदक जिंकून उच्चांक स्थापला.

जन्म

  • १६२९ – जॉन तिसरा, पोलंडचा राजा.
  • १८४४ – मेनेलेक दुसरा, इथियोपियाचा सम्राट.
  • १८७८ – रेजी डफ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८८७ – चार्ल्स पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
  • १९१३ – डब्ल्यु. मार्क फेल्ट, एफ.बी.आय.चा निदेशक व वॉटरगेट कुभांडातील पत्रकारांचा खबऱ्या.
  • १९२६ – ज्यॉंग झमिन, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३२ – व्ही.एस. नायपॉल, इंग्लिश लेखक.
  • १९३३ – जीन क्रांट्झ, नासाचा उड्डाण निदेशक.
  • १९७२ – हबीबुल बशर, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ – थिएरी ऑन्री, फ्रेंच फुटबॉल खेळाडू.

मृत्यू

  • १३०४ – फुकाकुसा, जपानी सम्राट.
  • १७८६ – फ्रेडरिक दुसरा, प्रशियाचा राजा.
  • १९२४ – टॉम केन्डॉल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९८८ – मोहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – ईंडोनेशिया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म जाती प्रांत भाषा,
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा एक आशा,
एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा
जरी सूर्य सत्याचा
उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे,
जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

लोभी कुत्रा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागली होती. त्याला रस्त्यावर एक मोठा हाडाचा तुकडा सापडला. तो तुकडा एकट्याने खायचा असा विचार त्याच्या मनात आला व तो खूप वेगाने धावू लागला.
धावत धावत तो एका ओढ्यावर आला. ओढ्याला एक छोटा लाकडी पूल होता. तो लाकडी पुलावर चालत होता.
लाकडी पूल ओलांडून जात असताना त्याला खाली पाण्यात एक विचित्र दृश्य दिसले.
ओढ्याचे पाणी हे एकदम स्वच्छ आणि शांत होते. पाण्यात आणखी एक हाड तोंडात असलेला त्याला दुसरा कुत्रा दिसला. खरेतर तो दुसरा कुत्रा नसून त्याचेच प्रतिबिंब होते. पण त्या लोभी कुत्र्याला हे समजले नाही.
त्याला वाटले कि हा एक दुसरा कुत्रा आहे आणि आपले हाड सुद्धा घेईल. त्याला पाण्यात असलेल्या कुत्र्याकडे मोठ्या हाडाचा तुकडा दिसला. कुत्र्याने विचार केला कि, मी यांच्याकडून हा तुकडा सुद्धा हुसकावून घेतो आणि २ तिकडे खातो.
पण कुत्र्याला कळले नाही की पाण्यातील कुत्रा हे स्वतःचेच प्रतिबिंब आहे.
पाण्यातील कुत्र्याच्या हाडाचा तुकडा पकडण्यासाठी त्याने आपले तोंड उघडले. त्याने आपले तोंड उघडताच त्याच्या तोंडातील आपला तुकडा खाली पाण्यात पडला.
आता त्याला पश्चाताप करण्याशिवाय काहीच नव्हते, कुत्रा रिकाम्या जबड्याने पाण्याबाहेर टक लावून पाहत होता.
आता त्याला समजून चुकले कि हि त्याचीच सावली आहे.
तात्पर्य- जास्त लोभ करणे हे कधीच फायद्याचे नसते, जे आपल्या कडे आहे त्यात समाधान मानावे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

2.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते
नकटे नाक उडवीते
गुबरे गाल फुगवीते
दांत कांही घासत नाहीं
अंग कांही धूत नाहीं
भात केला, करपुन गेला!
पोळ्या केल्या, कच्च्या झाल्या!
वरण केलें, पातळ झालें
तूप सगळें सांडून गेलें
असे भुकेले नक्का जाऊं
थांबा करतें गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आंत!

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) १५ ऑगस्ट हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो?
उत्तर: १५ ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो.
२) २६ जानेवारी हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो?
उत्तर : २६ जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
३) १ मे हा दिवस आपण कोणता दिन म्हणून साजरा करतो ?
उत्तर : १ मे हा दिवस आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करतो.
४) भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले?
उत्तर : १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले.
५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?
उत्तर : १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

ENGLISH QUESTION

1) What is your grandfather name?
Ans : My grandfather name is ……
2) What is your grandmother name?
Ans : My grand mother name is ……..
3) What is your uncle name?
Ans : My uncle name is ……..
4) What is your aunt name?
Ans : My aunt  name is ……..
5) What is your cousin  name ?
Ans : My cousin  name is ……..

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#17 august, 17 august 2023, 17 august 2021 panchang, 17 august 2022 special day, 17 august 2023 weather, 17 august 2022 panchang in hindi, 17 august is celebrated as, what is celebrated on 17 august, 17 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.