12 august | 12 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

12 august

12 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 12/08/2023, 12 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 11

शके– 1945

सुविचार- आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. In life, duty is greater than emotion.

म्हणी व अर्थ : अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी ?: एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे.

वाक्प्रचार- छाती दडपणे- घाबरून जाणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.

इ.स.पू. पहिले शतक

  • ३० – ऍक्टियमच्या लढाईत मार्क ॲंटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.

अकरावे शतक

  • १०९९ – पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई – क्रुसेड समाप्त.

तेरावे शतक

  • १२८१ – जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.

पंधरावे शतक

  • १४८० – ओट्रांटोची लढाई – ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.

एकोणिसावे शतक

  • १८३३ – शिकागो शहराची स्थापना.
  • १८५१ – आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
  • १८९८ – स्पॅनिश-अमेरिकन युद्ध समाप्त.
  • १८९८ – हवाईने अमेरिकेचे आधिपत्य स्वीकारले.

विसावे शतक

  • १९०८ – सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
  • १९१४ – पहिले महायुद्ध – ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४ – वाफ्फेन एस.एस.च्या सैनिकांनी सांताआना दि स्ताझेमा शहरात ५६० व्यक्तींची हत्या केली.
  • १९५२ – मॉस्कोमध्ये १३ ज्यू कवींची हत्या.
  • १९५३ – सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
  • १९६४ – वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
  • १९८१ – आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला.
  • १९८२ – मेक्सिकोने दिवाळे काढले.
  • १९८५ – जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.

एकविसावे शतक

  • २००० – रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
  • २००५ – श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
  • २०१० – मुंबई मध्ये रिक्षा टॅक्सी चालकांविरुद्ध प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने मीटर जॅम आंदोलन पुकारले.

जन्म

  • १५०३ – क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
  • १६२९ – ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
  • १६४३ – अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
  • १६४७ – योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
  • १७६२ – जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १८५९ – कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
  • १८६६ – जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
  • १८८७ – इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९७ – मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
  • १८९९ – बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१० – युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९१९ – विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२३ – जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२४ – डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२४ – मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
  • १९४० – एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४९ – मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
  • १९५६ – सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६० – ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ – मार्क प्रीस्ट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ – पीट साम्प्रास, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९७२ – ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ – रिचर्ड रीड, अतिरेकी.
  • १९७६ – पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • इ.स.पूर्व ३० – क्लिओपात्रा

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म जाती प्रांत भाषा,
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा एक आशा,
एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा
जरी सूर्य सत्याचा
उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे,
जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

सत्संगत-
बिरबलाची मुलगी एक दिवस वडिलांबरोबर राजदरबारात गेली तिचे वय होते अवघे पाच वर्षाचे.
अकबर बादशहाने तिला प्रेमाने आपल्या मांडीवर बसवले “तुला बोलता येते का?”
मुलीने उत्तर दिले “थोडे फार “
विचारले, “थोडे फारचा अर्थ काय?”
ती म्हणाली, “मोठ्यांपेक्षा मी थोडे व छोट्यांपेक्षा फार माझ्या बोलण्याचा अर्थ. म्हणून मी थोडेही बोलते व पुष्कळही बोलते. “
बादशहाने खूष होऊन तिला बक्षीस दिले व शेरा मारला ” आहे कोणाची? बिरबलाची.
संगतीचा असा प्रभाव असतो.”
तात्पर्य : संस्कार व संगत चांगली असल्यास आपले जीवनही संपन्न बनत जाते.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

2.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते
नकटे नाक उडवीते
गुबरे गाल फुगवीते
दांत कांही घासत नाहीं
अंग कांही धूत नाहीं
भात केला, करपुन गेला!
पोळ्या केल्या, कच्च्या झाल्या!
वरण केलें, पातळ झालें
तूप सगळें सांडून गेलें
असे भुकेले नक्का जाऊं
थांबा करतें गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आंत!

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) ज्ञानेंद्रिय म्हणजे काय ?
उत्तर :आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती देणा-या अवयवांना ज्ञानेंद्रिय म्हणतात .
२) ज्ञानेंद्रियांची नावे सांगा.
उत्तर : डोळे , कान, नाक , जीभ व त्वचा
३) दुधाचे दात कितव्या वर्षी पडतात ?
उत्तर: दुधाचे दात सातव्या – आठव्या वर्षी पडतात.
४) दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पध्दत कोणती?
उत्तर : ब्रश व पेस्ट वापरून दात घासणे ही दात स्वच्छ करण्याची सर्वात चांगली पध्दत आहे.
५) हिरड्या खराब का होतात ?
उत्तर : दातांच्या फटीत अन्नकण अडकून ते कुजतात असे वारंवार होत राहिले की हिरड्या खराब होतात.

ENGLISH QUESTION

1) What is your grandfather name?
Ans : My grandfather name is ……
2) What is your grandmother name?
Ans : My grand mother name is ……..
3) What is your uncle name?
Ans : My uncle name is ……..
4) What is your aunt name?
Ans : My aunt  name is ……..
5) What is your cousin  name ?
Ans : My cousin  name is ……..

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#12 august, 12 august 2023, 12 august 2021 panchang, 12 august 2022 special day, 12 august 2023 weather, 12 august 2022 panchang in hindi, 12 august is celebrated as, what is celebrated on 12 august, 12 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.