11 august | 11 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

11 august

11 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 11/08/2023, 11 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 11

शके– 1945

सुविचार- आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. In life, duty is greater than emotion.

म्हणी व अर्थ : अगं अगं म्हशी, मला कुठं नेशी ?: एकाच्या चुकीसाठी इतर लोकाना दोष लावणे.

वाक्प्रचार- छाती दडपणे- घाबरून जाणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२३ वा किंवा लीप वर्षात २२४ वा दिवस असतो.

इ.स.पू. बत्तीसावे शतक

  • ३११४ – माया दिनदर्शिकेनुसार या दिवशी सध्याचे युग सुरू झाले.

पंधरावे शतक

  • १४९२ – अलेक्झांडर सहावा पोपपदी.

अठरावे शतक

  • १७८६ – कॅप्टन फ्रांसिस लाइटने मलेशियातील पेनांग या वसाहतीची स्थापना केली.

एकोणिसावे शतक

  • १८९८ – स्पॅनिश-अमेरिकन युद्ध – अमेरिकन सैन्याने पोर्तोरिकोतील मायाग्वेझ हे शहर जिंकले.

विसावे शतक

  • १९५१ – रेने प्लेव्हेन फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
  • १९५२ – हुसेन जॉर्डनच्या राजेपदी.
  • १९६० – चाडला फ्रान्सपासून स्वातंत्र्य.
  • १९८७ – ॲलन ग्रीनस्पान युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्वच्या अध्यक्षपदी. ग्रीनस्पान २००६पर्यंत या पदावर होता.

जन्म

  • १८७० – टॉम रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७२ – शिदेहारा किजुरो, जपानी पंतप्रधान.
  • १८९७ – एनिड ब्लायटन, बालसाहित्यकार इंग्लिश लेखिका.
  • १९११ – प्रेम भाटिया, पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक. (मृ: ८ मे १९९५)
  • १९१२ – थानोम कित्तिकाचोर्ण, थायलंडचा पंतप्रधान.
  • १९२८ – वि.स. वाळिंबे, मराठी लेखक.
  • १९४३ – परवेझ मुशर्रफ, पाकिस्तानचा लश्करप्रमुख, हुकुमशहा, राष्ट्राध्यक्ष.
  • १९५४ – यशपाल शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९५४ – मडिरेड्डी नरसिंहराव, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७४ – अंजु जैन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ४८० – लिओनिदास, स्पार्टाचा राजा.
  • १२०४ – गुट्टोर्म, नॉर्वेचा राजा.
  • १९०८ – क्रांतिकारक खुदिराम बोस
  • १९३९ – जीन बुगाटी, इटालियन अभियंता.
  • १९६५ – बिल वूडफुल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

  • विद्यार्थी दिन – ब्राझील.
  • वकील दिन – ब्राझील.
  • व्हॅलेन्टाईन दिन – तैवान.
  • नायक दिन – झिम्बाब्वे.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

हीच अमुची प्रार्थना
अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म जाती प्रांत भाषा,
द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा एक आशा,
एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर
शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा
जरी सूर्य सत्याचा
उद्या उगवेल आहे खात्री
तोवरी देई आम्हाला
काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके
ते जगावे चांगले
पाऊले चालो पुढे,
जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता
तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

नक्कल पडली महागात
एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली.
तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत.
मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे.
त्यातील काही माकडे फार उद्योगी होती. ती रोज सुताराना काम करताना पाहात असत.
एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला जवळच्या नदी काठावर गेले. सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली.
त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तेथे गेली; आणि सुतारांची हत्यार उस्तरू लागली. एक भले मोठे झाडाचे खोड तिथे पडले होते. सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते.
जेवण झाल्यावर ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता.
एका माकडाने ते पाहिले. ते त्या खोडावर जाऊन बसले; आणि सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचविले.
परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली. त्याबरोबर लाकडाची ती फट बंद झाली. त्यात त्या माकडाची शेपटी अडकली. शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते ओरडू लागले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

बालगीत

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली
घारे डोळे फिरवीते
लुकूलुकू ही पहाते
नकटे नाक उडवीते
गुबरे गाल फुगवीते
दांत कांही घासत नाहीं
अंग कांही धूत नाहीं
भात केला, करपुन गेला!
पोळ्या केल्या, कच्च्या झाल्या!
वरण केलें, पातळ झालें
तूप सगळें सांडून गेलें
असे भुकेले नक्का जाऊं
थांबा करतें गोड खाऊ
केळीचे शिकरण करायला गेली
दोनच पडले दांत
आडाचे पाणी काढायला गेली
धपकन् पडली आंत!

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) आहार म्हणजे काय ?
उत्तर: दिवसभरात आपण जे खाद्यपदार्थ खातो व पेयपदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात.
२) कोकणात जास्त  काय पिकतो ?
उत्तर : कोकणात भात भरपूर पिकतो .
३) कोकणातील लोकांच्या आहारात काय असते?
उत्तर : कोकणातील लोकांच्या आहारात मासे व भात असतो.
४) खूप भूक कोणती कामे केल्यावर लागते ?
उत्तर : अंग मेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते.
५ ) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ?
उत्तर : ओला हरभरा बाजारात हिवाळा ऋतूत येतो.

ENGLISH QUESTION

1) What is your grandfather name?
Ans : My grandfather name is ……
2) What is your grandmother name?
Ans : My grand mother name is ……..
3) What is your uncle name?
Ans : My uncle name is ……..
4) What is your aunt name?
Ans : My aunt  name is ……..
5) What is your cousin  name ?
Ans : My cousin  name is ……..

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#11 august, 11 august 2023, 11 august 2021 panchang, 11 august 2022 special day, 11 august 2023 weather, 11 august 2022 panchang in hindi, 11 august is celebrated as, what is celebrated on 11 august, 11 august 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.