10 august | 10 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

10 august

10 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 10/08/2023, 10 ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 10

शके– 1945

सुविचार-

जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
These are some of the defeats in life They are even better than victory.

म्हणी व अर्थ : अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ : दुर्बळ मनुष्य बलवान व्यक्ती वर सरळ हल्ला न करता छोटी खोडी काढून पसार होतो.

वाक्प्रचार- कपाळमोक्ष पडणे- मृत्यू ओढवणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२१ वा किंवा लीप वर्षात २२२ वा दिवस असतो.

सोळावे शतक

  • १५१९ – फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.

सतरावे शतक

  • १६८० – न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.

अठरावे शतक

  • १७९२ – फ्रेंच क्रांती – राजा लुई सोळाव्याला अटक.

एकोणिसावे शतक

  • १८०९ – इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • १८२१ – मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
  • १८४६ – जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.

विसावे शतक

  • १९१३ – दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह – युद्धाचा अंत.
  • १९२० – पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह – दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटून घेतले.
  • १९८८ – दुसऱ्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
  • १९९० – मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.

एकविसावे शतक

  • २००६ – युनायटेड किंग्डमची गुप्त पोलीस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.

जन्म

  • १२६७ – जेम्स दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १३९७ – आल्बर्ट दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८६० – पंडित विष्णू नारायण भातखंडे, भारतीय संगीतकार, संगीततज्ञ.
  • १८७४ – हर्बर्ट हूवर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८९५ – हॅमी लव्ह, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ – फ्रेड रिजवे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४३ – शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ – जॅक रिचर्ड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७० – ब्रेंडन ज्युलियन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७८ – क्रिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ – दिनुशा फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १७५९ – फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
  • १९४५ – रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
  • १९७६ – बर्ट ओल्डफील्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९८० – याह्या खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००० – गिल्बर्ट पार्कहाउस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – इक्वेडोर.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

असो तुला देवा !
माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील
फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील
मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील
सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल
उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल
सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल
पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला
बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची
मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया !
बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

नक्कल पडली महागात
एका पवित्र जागी एका व्यापाऱ्याने मंदिर बांधायचे ठरविले. मंदिराच्या बांधकामाला त्याने लगेच सुरवात केली.
तेथे लाकडाचे सुद्धा काम सुरु झाले. त्यामुळे काही सुतार रोज तेथे कामाला येत असत.
मोठाले झाडाचे ओंडके कापून त्यांचे काम चालत असे. समोरच असलेल्या झाडावर एक माकडाची टोळी राहत असे.
त्यातील काही माकडे फार उद्योगी होती. ती रोज सुताराना काम करताना पाहात असत.
एक दिवस दुपारच्या वेळेस ते सर्व सुतार जेवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला जवळच्या नदी काठावर गेले. सुतार तिथे झोपले आहेत असे पाहून सर्व माकडे झाडावरून खाली उतरली.
त्यातील काही माकडे जिथे काम करत होती तेथे गेली; आणि सुतारांची हत्यार उस्तरू लागली. एक भले मोठे झाडाचे खोड तिथे पडले होते. सुतारांनी ते अर्धे कापून ठेवले होते.
जेवण झाल्यावर ते पूर्ण कापायचे म्हणून त्या अर्ध्या कापलेल्या भागात त्यांनी पाचर म्हणजे लाकडाचा मोठा तुकडा घालून ठेवला होता.
एका माकडाने ते पाहिले. ते त्या खोडावर जाऊन बसले; आणि सुताराप्रमाणे ते पाचर काढू लागले. एका वृद्ध माकडाने तसे करू नको म्हणून सुचविले.
परंतु त्या माकडाने पाचर ओढून काढली. त्याबरोबर लाकडाची ती फट बंद झाली. त्यात त्या माकडाची शेपटी अडकली. शेपटीला दुखापत झाल्यामुळे ते ओरडू लागले.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा कृष्ण कोयना
भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी
मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना
या यमुनेचे पाणी पाजा
भीति न आम्हा तुझी मुळीहि
गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला
जवाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो
शिव शंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली
अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती
खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो
महाराष्ट्र माझा

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) आहार म्हणजे काय ?
उत्तर: दिवसभरात आपण जे खाद्यपदार्थ खातो व पेयपदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात.
२) कोकणात जास्त  काय पिकतो ?
उत्तर : कोकणात भात भरपूर पिकतो .
३) कोकणातील लोकांच्या आहारात काय असते?
उत्तर : कोकणातील लोकांच्या आहारात मासे व भात असतो.
४) खूप भूक कोणती कामे केल्यावर लागते ?
उत्तर : अंग मेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते.
५ ) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ?
उत्तर : ओला हरभरा बाजारात हिवाळा ऋतूत येतो.

ENGLISH QUESTION

1) Which animal guards the house?
Ans : The dog guards the house
2) Which animal is useful for agricultural work?
Ans : Bullock is useful for agricultural work
3) What does a cow give?
Ans : Cow gives a milk
4) Which is the fastest running animal?
Ans : Cheetah is the fastest running animal.
5) Who is called tiger aunt?
Ans : The cat is called the tiger’s aunt

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#10 august, 10 august 2023, 10 august 2021 panchang, 10 august 2022 special day, 10 august 2023 weather, 10 august 2022 panchang in hindi, 10 august is celebrated as, what is celebrated on 10 august, 10 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.