13 october | 13 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

13 october

13 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शुक्रवार

दिनांक- 13/10/2023, 13 ऑक्टोबर

मिती-  भाद्रपद कृ.14

शके– 1945

सुविचार- “उद्याचा भविष्यकाळ वर्तमानात गाळलेल्या घामामुळेच निर्माण होत असतो”.

म्हणी व अर्थ – आपला हात जगन्नाथ- आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

वाक्यप्रचार- कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८६ वा किंवा लीप वर्षात २८७ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८१२ – १८१२ चेयुद्ध – सर सर आयझॅक ब्रॉकच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश आणि केनेडियन सैन्याने अमेरिकन सैन्याला परत अमेरिकेत रेटले.
  • १८८४ – ग्रीनविचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.

विसावे शतक

  • १९२३ – तुर्कस्तानने आपली राजधानी इस्तंबुलहून अंकाराला हलवली.
  • १९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – इटलीतील दोस्तधार्जिण्या सरकारने पक्ष बदलून जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – लाल सैन्यानेलात्व्हियाची राजधानी रिगा जिंकली.
  • १९४६ – फ्रांसने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९७२ – एरोफ्लोतचे इल्युशिन आय.एल. ६२ प्रकारचे विमान मॉस्कोजवळ कोसळले. १७६ ठार.
  • १९७२ – उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१ हे विमान चिली आणि आर्जेन्टिनाच्या सरहद्दीजवळ कोसळले. दोन प्रवाश्यांनी अनेक पर्वत पायी ओलांडून मदत मिळवल्यावर ४५ पैकी १६ व्यक्तींना डिसेंबर २३ रोजी वाचवण्यात आले.
  • १९७६ – बोलिव्हियाचे बोईंग ७०७ प्रकारचे मालवाहू विमान सांता क्रुझ, बोलिव्हिया येथे कोसळले. विमानातील तिघांसह १०० ठार.
  • १९७७ – पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी लुफ्तहंसा फ्लाइट १८१चे अपहरण करून विमान सोमालियाला नेले.
  • १९८३ – अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची एटीअँडटी ) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.
  • १९९२ – ॲंतोनोव्ह एरलाइन्सचे ॲंतोनोव्ह ए.एन. १२४ प्रकारचे विमान क्यीव्ह जवळ कोसळले.

एकविसावे शतक

  • २०११ – श्रीलंकी-अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती राज राजरत्नमला आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अटक.
  • २०१३ – मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.

जन्म

  • ७०९ – कोनिन, जपानी सम्राट.
  • १८६४ – टेड टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७ – बर्नार्ड बॉसान्केट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८७७ – भुलाभाई देसाई, कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसैनिक.
  • १९११ – अशोक कुमार, भारतीय अभिनेता.
  • १९२५ – मार्गारेट थॅचर, युनायटेड किंग्डमची पंतप्रधान.
  • १९४१ – जॉन स्नो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ – नुसरत फतेह अली खान, पाकिस्तानी गायक
  • १९५६ – अनुरा रणसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ – पेट्रस स्टीफानस तथा फानी डिव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ – हितेश मोदी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८९ – स्पृहा जोशी, मराठी अभिनेत्री.

मृत्यू

  • ५४ – क्लॉडियस, रोमन सम्राट.
  • १७०६ – इयासस, इथियोपियाचा सम्राट.
  • १८२५ – मॅक्सिमिलियन पहिला, बव्हारियाचा राजा.
  • १९११ – भगिनी निवेदिता,(मार्गारेट नोबल).स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.
  • १९८९ – किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
  • २००३ – बर्ट्राम ब्रॉकहाउस, नोबेल पारितोषिक विजेता केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • २०१८ – अन्नपूर्णा देवी, पद्मभूषण पुरस्कार विजेत्या, मैहर घराण्यातील संगीतकार

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

तहानलेला कावळा
एके दिवशी एका कावळ्याला खुप तहान लागली होती. पण त्याला खुप फिरून पण पाणी सापडत नव्हते.
फिरत फिरत त्याला एक सुरई दिसली.
उडत उडत तो त्या सुरईवर जाऊन पोहोचला.
त्या सुरईमध्ये पाणी तर होते, पण अगदी तळाशी.
त्या निमुळत्या तोंडाच्या सुरईमध्ये जाऊन पाणी पिणे कावळ्याला शक्य नव्हते.  आधीच तहानलेला तो, आणखीच निराश झाला.
पण त्याला आजूबाजूला दगड पाहुन एक शक्कल सुचली.
त्याने त्याच्या चोचीत छोटे मोठे दगड आणुन सुरईमध्ये टाकायला सुरवात केली.
दगडांमुळे तळाचे पाणी हळूहळू वर येण्यास सुरुवात झाली.
थोड्यावेळाने ते पाणी कावळ्याला पिता येईल इतके वर आले.
इतक्या मेहनतीनंतर शेवटी कावळ्याने आनंदाने आपली तहान भागवली.
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

ए आई मला पावसात जाउदे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवियत्री : वंदना विटणकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : चंदिगड
२) हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : सिमला
३) जम्मू काश्मिर राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : श्रीनगर
४) झारखंड राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : रांची
५) केरळ राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : तिरूअनंतपुरम

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#13 october, 13 october 2023, 13 october 2021 panchang, 13 october 2022 special day, 13 october 2023 weather, 13 october 2022 panchang in hindi, 13 october is celebrated as, what is celebrated on 13,13 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.