10 Jully
10 जुलै दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
आज वार– सोमवार
दिनांक- 10/07/2023, 10 Jully
मिती- आषाढ कृ.8
शके– 1945
सुविचार- श्रध्दा असावी पण अंधश्रध्दा नसावी.
म्हणी व अर्थ : न कर्त्याचा वार शनिवार – अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे .

ठळक घटना आणि घडामोडी
जुलै १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९१ वा किंवा लीप वर्षात १९२ वा दिवस असतो.
तेरावे शतक
- १२१२ – लंडन शहराचा मोठा भाग प्रचंड आगीच्या भक्ष्यस्थानी.
सोळावे शतक
- १५८४ – ऑरेंजच्या विल्यम पहिल्याची राहत्या महालात हत्या.
सतरावे शतक
- १६८५ – इंग्लिश गृहयुद्ध – लॅंगपोर्टची लढाई.
अठरावे शतक
- १७७८ – अमेरिकन क्रांती – फ्रांसने युनायटेड किंग्डम विरुद्ध युद्ध पुकारले.
- १७९६ – कार्ल फ्रीडरिक गॉसच्या सर्वप्रथम लक्षात आले की कोणताही आकडा जास्तीत जास्त तीन त्रिकोणी आकड्यांची बेरीज असतो.
एकोणिसावे शतक
- १८०० – कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.
- १८५० – मिलार्ड फिलमोर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १८९० – वायोमिंग अमेरिकेचे ४४वे राज्य झाले.
विसावे शतक
- १९२५ – तास या सोवियेत संघाच्या वृत्तसंस्थेची स्थापना.
- १९२५ – उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला.
- १९४० – दुसरे महायुद्ध – विची फ्रांसच्या सरकारची रचना.
- १९४७ – मुहम्मद अली जिना पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- १९६२ – टेलस्टार या जगातील पहिल्या संदेशवाहक उपग्रहाचे प्रक्षेपण.
- १९६७ – न्यु झीलॅंडने आपले चलन दशमान पद्धतीत आणले.
- १९६८ – मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
- १९७३ – बहामाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७३ – पाकिस्तानने बांगलादेशचे स्वातंत्र्य मान्य केले.
- १९७६ – इटलीत सेव्हेसो येथे विषारी वायुगळती. ३,००० प्राणी मृत्युमुखी. ७०,००० अजून प्राण्यांची कत्तल.
- १९७८ – मॉरिटानियात लश्करी उठाव.
- १९९१ – बोरिस येल्त्सिन रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९२ – मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
एकविसावे शतक
- २००० – नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार.
- २००३ – हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार.
जन्म
- १४१९ – गो-हानाझोनो, जपानी सम्राट.
- १४५२ – जेम्स दुसरा, स्कॉटलंडचा राजा.
- १८५६ – निकोला टेसला, वैज्ञानिक.
- १८६७ – माक्सिमिलियान, जर्मनीचा चान्सेलर.
- १९१३ – पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.
- १९२० – ओवेन चेंबरलेन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
- १९२० – आर्थर अॅश, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९२५ – मुहातिर मुहम्मद, मलेशियाचा चौथा पंतप्रधान.
- १९२३ – गुरुनाथ आबाजी कुलकर्णी, कथाकार.
- १९४० – कीथ स्टॅकपोल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९४९ – सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९७५ – स्कॉट स्टायरिस, न्यु झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- १३८ – हेड्रियान.
- ११०३ – एरिक पहिला, डेन्मार्कचा राजा.
- १२९८ – लाडिस्लॉस चौथा, हंगेरीचा राजा.
- १४८० – रेने पहिला, नेपल्सचा राजा.
- १५५९ – दुसरा हेन्री, फ्रान्सचा राजा.
- १५८४ – विल्यम पहिला, ऑरेंजचा राजा.
- १९६९ – डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर, गोव्याचे इतिहास संशोधक.
- १९७० – ब्यार्नी बेनेडिक्ट्सन, आइसलॅंडचा पंतप्रधान.
- १९७८ – जॉन डी. रॉकफेलर तिसरा, अमेरिकन उद्योगपती.
- २००५ – जयवंत कुलकर्णी, मराठी गायक.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन – बहामा.
- सैन्य दिन – मॉरिटानिया.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
ENGLISH QUESTION
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#10 jully, 10 jully 2023, 10 jully 2021 panchang, 10 jully 2022 special day, 10 jully 2023 weather, 10 jully 2022 panchang in hindi, 10 jully is celebrated as, what is celebrated on 10 jully, 10 jully 2022,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.