9 Jully | 9 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

9 Jully

9 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

दिनांक- 9/07/2023, 9 Jully

मिती- आषाढ कृ.7

शके– 1945

सुविचार- परिश्रम म्हणजे जीवनाच्या साफल्याचे रहस्य.

म्हणी व अर्थ- हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे

अर्थ :- ज्या घरी स्वच्छता असते त्या घरी धनधान्य,संपत्ती भरपूर असते.
वाक्प्रचार- विश्रांती घेणे – विसावा घेणे.
बातम्या-
दिल्लीत पावसाने ४१ वर्षाचा रेकॉर्ड मोडला एकाच दिवसात १५३ मिमी पाऊस
हिमाचल प्रदेशात जोरदार पावसामुळे २ दिवस शाळांना सुट्टी प्रशासनाचा निर्णय
विदर्भ दौऱ्यावर उध्दव ठाकरेंनी घेतले पोहरादेवीचे दर्शन
दोन दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता
विठोबाची भेट घेऊन तुकोबा परतीच्या मार्गावर; पुण्यात दौंड ग्रामस्थांच्या वतीने स्वागत
अमरनाथ यात्रा सलग दुसऱ्या दिवशी स्थगित, ५० हजार भाविक अडकले
पुण्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू; जून महिना कोरडा, जुलैमध्ये मुसळधारांची अपेक्षा

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९० वा किंवा लीप वर्षात १९१ वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४००

एकोणविसावे शतक

  • १८००
  • १८७३ – मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

विसावे शतक

  • इ.स. १९००
  • १९५१ – भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
  • १९६९ – वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

एकविसावे शतक

  • २००६ – सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
  • २०११ – सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

जन्म

  • १५७८ – फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १६५४ – रैगेन, जपानी सम्राट.
  • १६८९ – ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.
  • १७२१ – योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.
  • १८३६ – हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १८९३ – जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९४ – प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९१६ – एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
  • १९२५ – गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
  • १९२६ – बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२९ – हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.
  • १९३० – रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९३८ – संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
  • १९५० – व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.

मृत्यू

  • १२४९ – गो-कामेयामा, जपानचा सम्राट. (मृ. १३०५)
  • १५११ – सॅक्स-लाउएनबर्गची डोरोथी, डेन्मार्क आणि नॉर्वेची राणी (मृ. १५१७)[१]
  • १५७८ – दुसरा फर्डिनांड, पवित्र रोमन सम्राट (मृ. १६३७)[२]
  • १६५४ – गो-रायगेन, जपानचा सम्राट. (मृ. १७३२)
  • १६८९ – अलेक्सिस पिरॉन, फ्रेंच नाटककार (मृ. १७७३)
  • १७२१ – योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन साहित्यिक (मृ. १७८१)
  • १७६४ – अॅन रॅडक्लिफ, इंग्लिश साहित्यिक (मृ. १८२३)[३]
  • १७७५ – मॅथ्यू लुइस, इंग्लिश साहित्यिक (मृ. १८१८)
  • १८१९ – एलायस होव, शिवणयंत्राचा अमेरिकेची संयुक्त संस्थाने शोधक. (मृ. १८६७)
  • १८२५ – ए.सी. गिब्स, अमेरिकन राजकारणी, ओरेगनचा दुसरा गव्हर्नर. (मृ. १८८६)
  • १८९३ – जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू. (मृ. १९८१)

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

एक कुंभार मातीची चिलम बनवित होता. चिलमचा आकार केला सुध्दा … पण थोड्याच वेळात त्याने तो आकार बदलला..मातीने विचारले, अरे कुंभार दादा, तु छान चिलीम बनविली होती. मग का परत बदल केला? कुंभार म्हणाला, मी चिलम बनवत असताना माझी मति बदलली आणि घागर बनविण्याचा निर्णय घेतला.
मातीने म्हणाली, कुंभार दादा, तुमची मति बदलल्यामुळे, माझे जीवनपण बदलले, मी चिलम झाले असते तर मी ही जळाले असते आणि दुसऱ्यांना ही जाळले असते !
आता मी घागर झाल्यावर मी ही शीतल राहिल आणि इतरांना ही शीतलता देईल.
तात्पर्य- जीवनात सुयोग्य निर्णय घेतल्यास, आपल्याला ही आनंद मिळतो आणि आपल्या मुळे इतरांना ही आनंद मिळतो !

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
 ~प्रेम धवन

बालगीत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचं दार
शेपटीच्या झुपक्यानं झाडून जाईल खार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
“हॅलो, हॅलो !” करायला छोटासा फोन !
बिस्कटांच्या गच्‍चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाललाल
चांदीच्या झाडामागं चांदोबा रहातो
मोत्यांच्या फुलांतून लपाछपी खेळतो
उंच उंच झोक्याचा खेळ रंगला
मैनेचा पिंजरा वर टांगला
किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला
चंदेरी सोनेरी चमचमता चांगला
कवी : राजा मंगळवेढेकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

✪  कोर्णाक मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
 ➜उडीसा.
✪  भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ कोणते ?
 ➜ कुशीनगर.
✪  बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
 ➜मुरलीधर देविदास आमटे.
✪  ‘भारतीय शेक्सपियर’ असे कोणाला म्हटले जाते ?
 ➜कालिदास.
✪  विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?
 ➜गागोदे.( रायगड )

ENGLISH QUESTION

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans: Five
3) How many eyes do you have?
Ans: Two
4) How many legs do you have?
Ans: Two
5) How many nose do you have?
Ans: One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#9 jully, 9 जुलै दिनविशेष, परिपाठ, Daily Routine, शालेय परिपाठ, दैनंदिन परिपाठ, बोधकथा, प्रार्थना, सुविचार , पसायदान, संविधान, म्हणी,शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.