मीनूची सहल (Minu’s picnic)
चला शिकूया.-
कथेचे समजपूर्वक वाचन करता येणे.
मीनू, ज्युली, हमीद, जोसेफ हे एकाच सोसायटीत राहायचे. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रिणी होते. रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी घराजवळ असलेल्या बागेत जायचे ठरवले. बागेत खेळायचे, गाणी म्हणायची, खाऊ खायचा आणि घरी यायचे, असा त्यांनी बेत ठरवला.
पण मीनू विचारात पडली, ‘मी कशी जाणार?’ हमीदने तिच्याकडे पाहिले व म्हणाला, ‘‘मीनू, आपण सगळे सोबतच बागेत जाऊ.’’
रविवारी ज्युली, हमीद, जोसेफ मीनूच्या घरी गेले. मीनूला बागेत घेऊन जाण्यासाठी त्यांनी तिच्या आईकडे परवानगी मागितली. मीनूची आई त्यांना म्हणाली, ‘‘मी मीनूला तुमच्याबरोबर पाठवते; पण काळजी घ्या हं तिची!’’ सगळ्यांनी एका सुरातच ‘हो ऽऽऽ’ म्हटले.
ज्युलीने मीनूला तिच्या व्हीलचेअरमध्ये बसायला मदत केली. मीनू सर्वांबरोबर बागेत जायला निघाली. रस्त्यात वाहनांची गर्दी होती; पण सगळ्या वाहनचालकांनी त्यांना जाण्यासाठी वाट करून दिली.
बागेत व्हीलचेअर जाण्यासाठी ठिकठिकाणी सोय केली होती. मीनूला कुठेच अडचण आली नाही. बागेत खेळणारी मुले बघून मीनूला खूपच आनंद झाला. मीनूही आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर चेंडू खेळण्यात दंग झाली.
चेंडूचा खेळ खेळून झाल्यानंतर सगळ्यांनी खाऊ खाल्ला, गाणी म्हटली. सर्वांनी बागेतील सहलीचा आनंद मनमुरादपणे लुटला. बागेतून घरी जाताना मीनूचा चेहरा आनंदाने उजळून गेला होता.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |