नारळ (Coconut)
1ली, बालभारती भाग 2
चला शिकूया.-
नारळाच्या झाडाचे निरीक्षण करून आपल्या शब्दांत वर्णन करणे.
नारळाच्या झाडापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूंची नावे सांगणे.
तुमच्या परिसरात असणाऱ्या झाडांचे उपयोग सांग.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी”, झाडे ही आपली खरे मित्र आहेत. झाडांचे उपयोग सांगावे तेवढे कमीच आहे.
झाडे हवेचे प्रदूषण रोखण्यास मदत करते. सजीवांना ऑक्सिजन पुरवते. झाडांपासून मधुर फळे, रंगीत मनमोहक फुले, लाकूड मिळते.
झाडांपासून सावली तसेच पक्षांना व जनावरांना असार मिळतो. उन्हापासून संरक्षण होते. झाडापासून अनेक औषधी बनवल्या जातात. झाडे मुळापासून ते पानापर्यंत सर्वकाही मानवाला अर्पण करते ते पण निस्वार्थीपणे.
झाडांचे अनेक फायदे आहेत म्हणूनच प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे व त्याची काळजी घेऊन जगावावे.
“झाडे लावा प्रदूषण टाळा.”
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |