7 august | 7 ऑगस्ट दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

7 august

7 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- सोमवार

दिनांक- 07/08/2023, 7ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 7

शके– 1945

सुविचार- हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई.

There are only two words in the heart and that is mother.

म्हणी व अर्थ : आधी पोटोबा मग विठ्ठोबा – आधी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा.

वाक्प्रचार-  कंठस्नान घालणे – शिरच्छेद करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१८ वा किंवा लीप वर्षात २१९ वा दिवस असतो.

अठरावे शतक

  • १७९४ – व्हिस्की क्रांती – अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकऱ्यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.

एकोणिसावे शतक

  • १८१९ – बॉयाकाची लढाई – सिमोन बॉलिव्हारच्या सैन्याने स्पेनच्या सैन्याचा पाडाव केला.
  • १८८८ – लंडनमध्ये जॅक द रिपरने पहिला खून केला.

विसावे शतक

  • १९४२ – दुसरे महायुद्ध – ग्वादालकॅनालची लढाई सुरू.
  • १९४५ – दुसरे महायुद्ध – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने जपानच्या हिरोशिमा शहरावरील परमाणुबॉम्ब हल्ला सफल झाल्याचे जाहीर केले.
  • १९४७ – थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
  • १९४७ – मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
  • १९६० – कोट दि आयव्होरला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६४ – व्हियेतनाम युद्ध – अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
  • १९६५ – सिंगापुरची मलेशियामधून हकालपट्टी.
  • १९६७ – व्हियेतनाम युद्ध – चीनने उत्तर व्हियेतनामला मदत करण्याचे जाहीर केले.
  • १९७६ – व्हायकिंग २ हे अंतराळयान मंगळाच्या कक्षेत आले.
  • १९९१ – सामान्य माणसांना वर्ल्ड वाइड वेब उपलब्ध.
  • १९९७ – फाइन एर फ्लाइट १०१ हे मालवाहू विमान फ्लोरिडातील मायामी शहरात कोसळले. ५ ठार.
  • १९९८ – टांझानिया व केन्यामधील अमेरिकन वकिलातींवर दहशतवाद्यांचा बॉम्बहल्ला. २२४ ठार, ४,५०० जखमी.

एकविसावे शतक

  • २०१७ – भारताच्या गोरखपूर शहरातील बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न इस्पितळाने ३३ लाख रुपयांचे थकित न भरल्याने प्राणवायू पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने सेवा रोखली. ७-१३ ऑगस्ट दरम्यान ७२ लहान मुलांचा मृत्यू.

जन्म

  • ३१७ – कॉन्स्टेन्टियस दुसरा, रोमन सम्राट.
  • १८१६ – माटा हारी, डच गुप्तहेर.
  • १९२५ – एम.एस. स्वामीनाथन, भारतीय शेतीतज्ञ.
  • १९३७ – डॉन विल्सन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९४० – ज्यॉॅं-लुक डेहेन, बेल्जियमचा पंतप्रधान.
  • १९४८ – ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.
  • १९५९ – अली शाह, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ – जिमी वेल्स, विकिपिडीयाचा स्थापक.
  • १९७१ – डॉमिनिक कॉर्क, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ४६१ – माजोरियन, रोमन सम्राट.
  • ४७९ – युराकु, जपानी सम्राट.
  • ११०६ – हेन्री चौथा, पवित्र रोमन सम्राट.
  • १८५५ – मेरियानो अरिस्ता, मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४१ – रवींद्रनाथ टागोर, बंगाली कवी, लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९७३ – जॅक ग्रेगरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २००४ – रेड अडेर, अमेरिकेचा अग्निशमनतज्ञ.
  • २००५ – पीटर जेनिंग्स, अमेरिकेचा वार्ताहर.
  • २०१८ – एम. करुणानिधी, भारतीय राजकारणी व तमिळनाडूचे ३रे मुख्यमंत्री.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – कोट दि आयव्होर.
  • मुक्ती दिन – टर्क्स व कैकोस द्वीप.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

असो तुला देवा !
माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील
फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील
मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील
सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल
उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल
सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल
पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला
बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची
मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया !
बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

कावळा आणि कोल्हा
एकदा काय झालं एक कावळा रानावना मध्ये फिरत असताना त्याला एक चपाती चा तुकडा मिळाला चपाती चा तुकडा घेऊन येतो काळा जंगलातील एका झाडावर बसला.
चपाती खाण्याचा विचार करत असताना काळाच्या मनात कल्पना आली की आता एक चपाती मिळाले उद्या पर्यंत अन्न शोधण्याची गरज भासणार नाही तेवढ्यात झाडाखालून एक कोल्हा जात होता व त्या कुणाची नजर झाडावर बसलेल्या कावळ्याच्या चोचीतील चपाती कडे गेली.
आपल्याला देखील कावळ्याच्या चोचीतील चपाती खाण्याची तीव्र इच्छा झाली, त्यासाठी एक युक्ती सुचवली.
कोल्हा कावळ्याला म्हणाला, ” काय कावळे भाऊ कसे आहात फार दिवसांनी दर्शन झाले तुमचे.
फार दिवस झाले तुमचा आवाज ऐकला नाही आणि तुमच्या आवाजातील गाणे देखील ऐकले नाही किती मधुर आहे तुमचा आवाज एकदा मला तुम्ही गाणे म्हणून दाखवा.”
कोल्हे यांनी केलेली स्तुती ऐकून कावळा अगदी आनंदित झाला व गाणे म्हणण्यासाठी कावळ्याने आपली चोच उघडतात चोचीतील चपाती खाली पडली को्हा्याने ती चपाती पटकन उचलली आणि पळाला.
जात असताना कोल्ह्याला वाटेमध्ये एक नदी लागली कोल्हा पळून खूप दमला होता व त्याने पाणी पिण्यासाठी नदीमध्ये वाकून पाहिले असता त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसले.
कोल्हा होता मूर्ख त्यांना वाटले की नदीमध्ये आणखीन एक कोणतातरी कोल्हा आहे व त्याच्या तोंडामध्ये एक चपाती आहे मग ही देखील चपाती आपल्याला मिळाल्याने दोन चपात्या मिळतील.
व आपले पोट भरेल असे विचार करून कोल्हाने‌ ओरडण्यासाठी तोंड उघडताच त्याच्या तोंडातील चपाती नदीमध्ये पडली.
अशाप्रकारे कोल्ह्याला चपाती खायला मिळाली नाही व त्याला त्याची चूक कळली.
तात्पर्य: कधीही खोटी प्रशंसा वर आनंदित होऊ नये. लालच खूप वाईट सवय आहे.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
उत्तर : बाबाजीराजे
२)शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
उत्तर : मालोजीराजे
३) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
उत्तर : शहाजीराजे
४) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
उत्तर : जिजाबाई
५) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
उत्तर : शिवाजी शहाजी भोसले

ENGLISH QUESTION

1) Where does the Crow live?
Ans : Nest
2) Where does the Duck live?
Ans : Water
3) Where does the Cat  live?
Ans : Home
4) Where does the Deer live?
Ans : Forest
5) Where does the Elephant  live?
Ans : Forest

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#7 august, 7 august 2023, 7 august 2021 panchang, 7 august 2022 special day, 7 august 2023 weather, 7 august 2022 panchang in hindi, 7 august is celebrated as, what is celebrated on 7 august, 7 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.