5 august | 5 ऑगस्ट दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

5 august

5 ऑगस्ट दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 05/08/2023, 5ऑगस्ट

मिती- अधिक श्रावण कृ. 5

शके– 1945

सुविचार-

ग्रंथ हेच आपले गुरु.
Books are our guru.

म्हणी व अर्थ :

तेरड्याचा रंग तीन दिवस-
एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे.
वाक्प्रचार- हृदय भरून येणे- गदगदून येणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑगस्ट ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१७ वा किंवा लीप वर्षात २१८ वा दिवस असतो.

बारावे शतक

  • ११०० – हेन्री पहिला इंग्लंडच्या राजेपदी.

चौदावे शतक

  • १३०५ – स्कॉटिश क्रांतीकारी विल्यम वॉलेस ग्लासगो जवळ पकडला गेला.

एकोणिसावे शतक

  • १८६० – कार्ल चौथा स्वीडनच्या राजेपदी.
  • १८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – युद्धाच्या खर्चास हातभार लागावा म्हणून अमेरिकन सरकारने प्रथमतः आयकर लागू केला.
  • १८८२ – जपानमध्ये लश्करी कायदा लागू.

विसावे शतक

  • १९०१ – पीटर ओ’कॉनोरने २४ फूट ११.७५ ईंच लांब उडी मारून विश्वविक्रम रचला.
  • १९१४ – जगातील पहिला विद्युतचलित वाहतूक नियंत्रक दिवा अमेरिकेच्या क्लीव्हलॅंड शहरात सुरू झाला.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध – ऑस्ट्रेलियाच्या कौरा गावाजवळील युद्धबंद्यांच्या तुरुंगातून ५४५ जपानी युद्धबंदी पळाले. बव्हंशी मारले गेले व उरलेल्यांपैकी मोठ्या संख्येने आत्महत्या केली.
  • १९४४ – ज्यूंचे शिरकाण – पोलिश क्रांतीकाऱ्यांनी वॉर्सोतील कारागृहातून ३४८ बंद्यांची सुटका केली.
  • १९४९ – इक्वेडोरमध्ये भूकंप. ६,००० ठार.
  • १९६० – बर्किना फासोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
  • १९६२ – मॅरिलिन मन्रोने आत्महत्या केली.
  • १९६२ – दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलाला कैद. २८ वर्षांनी १९९०मध्ये सुटका.
  • १९६४ – व्हियेतनाम युद्ध – अमेरिकेच्या यु.एस.एस. टिकोंडेरोगा व यु.एस.एस. कॉन्स्टेलेशन या विमानवाहू युद्धनौकांवरील विमानांनी टोंकिनच्या अखातातील हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून उत्तर व्हियेतनामवर बॉम्बफेक केली. वस्तुतः टोंकिनच्या अखातातील हल्ला ही बनावट घटना होती.
  • १९८१ – अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगनने संपावर असलेल्या ११,३८१ हवाई वाहतूक नियंत्रकांना नोकरीतून काढून टाकले.
  • १९९५ – क्रोएशियाच्या सैन्याने सर्बियातील क्निन शहर जिंकले.

एकविसावे शतक

  • २००६ – मराठी विकिपिडीयाने ५,००० लेखांचा टप्पा ओलांडला.
  • २०१२ – अमेरिकेच्या विस्कॉन्सिन राज्यातील ओक क्रीक शहरातील गुरुद्वारामध्ये घुसून एका माथेफिरूने गोळीबार केला. सहा व्यक्ती ठार. हल्लेखोराला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारले.
  • २०१९ – जम्मू आणि काश्मीर राज्याचे विभाजन. जम्मू आणि काश्मीर व लद्दाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात.

जन्म

  • १८०२ – नील्स हेन्रिक एबेल, नॉर्वेजियन गणितज्ञ.
  • १८१५ – देओदोरो दा फॉन्सेका, ब्राझिलचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १८१५ – एडवर्ड जॉन आयर, इंग्लिश शोधक.
  • १८६६ – हॅरी ट्रॉट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १८९० – दत्तो वामन पोतदार, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
  • १९०८ – हॅरोल्ड होल्ट, ऑस्ट्रेलियाचा १७वा पंतप्रधान.
  • १९६२ – रिचर्ड डि ग्रोएन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ – अतुल समरसेकरा, श्रीलंकी क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – वेंकटेश प्रसाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ – व्हॅस्बर्ट ड्रेक्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ – आकिब जावेद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ – सनवर होसेन, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ८८२ – लुई तिसरा, फ्रांसचा राजा.
  • १३६४ – कोगोन, जपानी सम्राट.
  • १९४४ – मॉरिस टर्नबुल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – बर्किना फासो.
  • विजयदिन, मातृभूमी आभार दिन – क्रोएशिया.
  • बाल दिन – चिली.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

असो तुला देवा !
माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार ॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील
फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील
मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील
सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल
उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल
सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल
पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला
बिंदू जरी मिळेल
तरि प्रभो ! शतजन्मांची
मतृषा शमेल
तुझे म्हणुनि आलो राया !
बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

स्वभाव
एक भिकारी भीक न मिळाल्यामुळे नेहमी उपाशी रहावयाचा. एकदा त्याने एका योगी पुरुषाला आपली व्यथा सांगितली. त्या योगी पुरुषाने त्याला एक मंत्र शिकविला व त्याची साधना करावयास सांगितली.
भिकाऱ्याने बारा वर्षे घोर तपश्चर्या केली. इंद्राचे सिंहासन त्या तपामुळे डळमळू लागले.
इंद्र घाबरून त्याच्याकडे आला व म्हणाला, “काय माझे सिंहासन घेतल्याशिवाय तुझी तपश्चर्या थांबणार नाही का?”
भिकाऱ्याला काय ठाऊक इंद्राच्या आसनाचे महत्त्व?
त्याने सहजपणे प्रश्न विचारला तुझ्या आसनावर बसून मला सहजगत्या भीक मिळू शकेल का?”
“म्हणजे तुला नेमके हवे आहे तरी काय?” इंद्राने त्याला प्रतिप्रश्न केला.
“माझी एवढीच इच्छा आहे की भिक्षेमुळे माझे पोट भरावे. मला त्यासाठी
फार यातायात करावयास लागू नये.”
इंद्राने “तथास्तु” आशीर्वाद दिला व तो स्वर्गात निघून गेला.
माणसाचा स्वभाव लवकर बदलत नाही म्हणतात ते काही खोटे नाही.
तात्पर्य : स्वभावो दुरतिक्रमः।

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभातुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल ते होऊ दे
कवियत्री : वंदना विटणकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शिवाजी महाराजांच्या पणजोबांचे नाव सांगा.
उत्तर : बाबाजीराजे
२)शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव सांगा.
उत्तर : मालोजीराजे
३) शिवाजी महाराजांच्या वडीलांचे नाव सांगा .
उत्तर : शहाजीराजे
४) शिवाजी महाराजांच्या आईचे नाव सांगा .
उत्तर : जिजाबाई
५) शिवाजी महाराजांचे संपूर्ण नाव सांगा.
उत्तर : शिवाजी शहाजी भोसले

ENGLISH QUESTION

1) What is the color of lemon?
Ans : Yellow
2) What is the color of buffalo?
Ans : Black
3) What is the color of milk ?
Ans : White
4) What colur is the sky ?
Ans : Blue
5) What color is the parrot?
Ans : Green

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#5 august, 5 august 2023, 5 august 2021 panchang, 5 august 2022 special day, 5 august 2023 weather, 5 august 2022 panchang in hindi, 5 august is celebrated as, what is celebrated on 5 august, 5 august 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.