12 September | 12 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

12 September

12 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-मंगळवार

दिनांक- 12/09/2023, 12 सप्टेंबर

मिती-  श्रावण कृष्ण 13

शके– 1945

सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

म्हणी व अर्थ – पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.
वाक्यप्रचार- धमाल उडणे – मजा येणे, आनंद वाटणे

ठळक घटना आणि घडामोडी

 

सप्टेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५४ वा किंवा लीप वर्षात २५५ वा दिवस असतो.

इ.स.पू. पाचवे शतक

  • ४९० – मॅरेथॉनची लढाई – अथेन्सने पर्शियाला हरवले.

सतरावे शतक

  • १६८३ – व्हियेनाची लढाई – ऑस्ट्रिया व इतर युरोपीय देशांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला.

एकोणिसावे शतक

  • १८४७ – मेक्सिकन अमेरिकन युद्ध – दल बदलून मेक्सिकोतर्फे लढणाऱ्या अमेरिकन सैनिकांना जनरल विनफील्ड स्कॉटने फाशी दिली.
  • १८५७ – कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेउन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज केप हॅट्टेरास पासून १६० मैलावर बुडाले. सोन्यासह ४२६ प्रवाशांना जलसमाधी.
  • १८९० – सॅलिसबरी, ऱ्होडेशिया शहराची स्थापना.

विसावे शतक

  • १९३० – विल्फ्रेड ऱ्होड्सने आपल्या १,११०व्या व शेवटच्या प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यात ९५ धावा देऊन ५ बळी घेतले.
  • १९३८ – एडोल्फ हिटलरने चेकोस्लोव्हेकियाच्या सुडेटेनलँडमधील जर्मन व्यक्तींना स्वतंत्र करण्याची मागणी केली.
  • १९४० – केनव्हिल, न्यू जर्सी येथे कारखान्यातील स्फोटात ५१ ठार, २०० जखमी.
  • १९४२ – दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांचे सैनिक, नागरिक व इटालियन युद्धबंद्यांना घेउन जाणाऱ्या आर.एम.एस. लॅकोनिया जहाजाला बुडवले.
  • १९४३ – ऍब्रुझी येथे पकडून ठेवलेल्या इटलीच्या हुकुमशहा बेनितो मुसोलिनीला जर्मनीच्या कमांडोंनी सोडवून नेले.
  • १९४८ – आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
  • १९७४ – इथियोपियाच्या सम्राट हेल सिलासीची लश्करी उठावात उचलबांगडी.
  • १९७९ – इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
  • १९८० – तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
  • १९८३ – लोस मशेतेरोस या टोळीने हार्टफर्ड, कनेक्टिकटमधील बँकेतून ७० लाख अमेरिकन डॉलर पळवले.
  • १९९२ – शायनिंग पाथचा म्होरक्या ऍबिमेल गुझमान पकडला गेला.
  • १९९४ – फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.

एकविसावे शतक

  • २००२ – ‘मेटसॅट’ या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • २००३ – पॅन ऍम फ्लाइट १०३वर केलेल्या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने लिब्यावरचे आर्थिक निर्बंध संयुक्त राष्ट्रांनी काढले.
  • २००५ – डिझनीलँड हाँगकाँग खुले.
  • २०१२ – दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
  • २०१२ – पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.

जन्म

  • १४९२ – लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.
  • १४९४ – फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
  • १५७५ – हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
  • १९१३ – जेसी ओवेन्स, अमेरिकन धावपटू.
  • १९२० – फिरोज गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
  • १९३२ – वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ – वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ – मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ – नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १२१३ – पीटर दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १३६२ – पोप इनोसंट सहावा.
  • १६१२ – व्हासिली चौथा, रशियाचा झार.
  • १६८३ – अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
  • १९१८ – जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
  • १९५२ – सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
  • १९८० – सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
  • १९९२ – पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
  • १९९३ – रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.
  • १९९६ – श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
  • २००३ – जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.

प्रतिवार्षिक पालन

  • राष्ट्रीय दिन – केप व्हर्दे.
  • राष्ट्रीय क्रांती दिन – इथियोपिया.
  • राष्ट्रगीत

    जनगणमन अधिनायक जय हे

    भारत भाग्य-विधाता |

    पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

    विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

    उच्छल जलधितरंग,

    तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

    गाहे तव जयगाथा,

    जनगण मंगलदायक जय हे,

    भारत भाग्य-विधाता|

    जय हे, जय हे, जय हे,

    जय जय जय, जय हे ||

    @_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रतिज्ञा

    भारत माझा देश आहे.

    सारे भारतीय माझे बांधव आहेत.

    माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

    माझ्या देशातल्या समृद्ध आणि

    विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

    त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

    माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

    मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

    वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

    आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

    माझा देश आणि माझे देशबांधव

    यांच्याशी निष्ठा राखण्याची

    मी प्रतिज्ञा करीत आहे.

    त्यांचे कल्याण आणि

    त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

    सौख्य सामावले आहे.

    जय हिंद…

    @_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    राज्यगीत

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

    भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

    अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

    सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

    दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

    काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

    पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

    दारिद्रयाच्या उन्हात शिजला

    निढळाच्या घामाने भिजला

    देश गौरवासाठी झिजला

    दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

    जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

    @_जय जय महाराष्ट्र माझा mp3

    अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    भारताचे संविधान

    उद्देशिका

    आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

    समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

    व त्याच्या सर्व नागरिकांस

    सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

    विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

    व उपासना यांचे स्वातंत्र्य;

    दर्जाची व संधीची समानता;

    निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

    आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

    आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

    प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

    आमच्या संविधानसभेत

    आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

    याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

    करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

    @_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रार्थना

    सर्वेश्वरा, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
    तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना
    सुमनात तू, गगनात तू
    तार्‍यांमध्ये फुलतोस तू
    सद्धर्म जे जगतामध्ये
    त्यांच्या मध्ये वसतोस तू
    चोहीकडे रूपें तुझी जाणीव ही माझ्या मना
    श्रमतोस तू शेतांमध्ये
    तू राबसी श्रमिकांसवे
    जे रंजले अन्‌ गांजले
    पुसतोस त्यांची आसवें
    स्वार्थाविना सेवा जिथे, तेथे तुझे पद पावना
    न्यायार्थ जे लढती रणीं
    तलवार तू त्यांच्या करीं
    ध्येयार्थ जे तमीं चालती
    तू दीप त्यांच्या अंतरी
    ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना
    करुणाकरा, करुणा तुझी
    असता मला भय कोठले ?
    मार्गावरी पुढती सदा
    पाहीन मी तव पाउलें
    सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना
    1. असो तुला देवा माझा
    2. देह मंदिर,चित्त मंदिर
    3. सर्वात्मका शिवसुंदरा
    4. केशवा माधवा
    5. या भारतात
    6. इतनी शक्ती हमे देना
    7. सत्यम शिवम सुंदरां
    8. हा देश माझा
    9. खरा तो एकची धर्म
    10. हंस वाहिनी
    11. तुम्ही हो माता
    12. शारदे मां
    13. ऐ मलिक तेरे बंदे
    14. हमको मन की शक्ती

    बोधकथा

    अती शहाणा

    एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी, पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
    एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
    एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी – कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
    एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
    उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे.
    मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
    तात्पर्य-
    अती शहाणा त्याचा बैल रिकामा.

    @_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    पसायदान

    आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

    तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

    जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

    भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

    दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

    जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

    वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

    अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

    चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

    बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

    चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

    ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

    किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

    भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

    आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

    दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

    येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

    येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

    @_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    देशभक्तीपर गीत

    गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
    आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
    आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
    शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.
    आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
    जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !
    मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
    माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !
    आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
    माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

    बालगीत

    गोरी गोरीपान, फुलासारखी छान
    दादा, मला एक वहिनी आण ।।धृ।। दादा, मला एक…
    गोर्‍या गोर्‍या वहिनीची अंधाराची साडी
    अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
    चांदण्यांच्या पदराला बिजलीचा बाण ।।१।। दादा, मला एक…
    वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
    चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
    हरणांची गाडी तुडवी गुलाबाचे रान ।।२।। दादा, मला एक…
    वहिनीशी गट्टी होता तुला दोन थापा
    तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
    बाहुल्यांच्यापरी होऊ दोघी आम्ही सान ।।३।। दादा, मला एक…

    @_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    प्रश्नमंजुषा

    १) एका तासाचे किती मिनिटे होतात ?
    उत्तर = ६० मिनिटे
    २) एका मिनिटाचे किती सेकंद होतात ?
    उत्तर: ६० सेकंद
    ३) एका तासाचे किती सेकंद होतात ?
    उत्तर: ३६०० सेकंद
    ४) घड्याळातील मोठा काटा काय दाखवतो ?
    उत्तर : मिनीट
    ५) घड्याळातील लहान काटा काय दाखवतो?
    उत्तर : तास

    इंग्रजी प्रश्न

    1) Which animal guards the house?
    Ans: The dog guards the house
    2) animal is useful for agricultural work?
    Ans: Bullock is useful for agricultural work
    3) What does a cow give?
    Ans: Cow gives a milk
    4) Which is the fastest running animal?
    Ans: Cheetah is the fastest running animal.
    5) Who is called tiger aunt?
    Ans: The cat is called the tiger’s aunt

    अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

    @_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    @_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

    Tags

    #12 september, 12 september 2023, 12 september 2021 panchang, 12 september 2022 special day, 12 september 2023 weather, 12 september 2022 panchang in hindi,12 september is celebrated as, what is celebrated on 12 september, 12 september 2023,

    शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

    DECLAIMER

    वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.