माझ्या या ओटीवर
माझ्या या ओटीवर
कोण कोण येते-कोण कोण येते?
चिमणी येते नि कावळा येतो,
टपटप दाणे टिपून जातो-टिपून जातो.
होला येतो नि पारवा येतो,
हू हू घू घू करून जातो-करून जातो.
मैना येते नि पोपट येतो,
मंजूळ मंजूळ बोलून जातो-बोलून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थुई थुई थुई थुई नाचून जाते-नाचून जाते.
माझ्या या हौदावर
कोण कोण येते-कोण कोण येते?
चिमणी येते नि कावळा येतो,
बुडबुड गंगे न्हाऊन जातो-न्हाऊन जातो.
होला येतो नि पारवा येतो,
थेंबथेंब पाणी पिऊन जातो-पिऊन जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पाणी उडवून खेळून जातो-खेळून जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
थुई थुई थुई थुई नाचून जाते-नाचून जाते.
माझ्या या बागेत
कोण कोण येते-कोण कोण येते?
चिमणी येते नि कावळा येतो,
इकडे तिकडे उडून जातो-उडून जातो.
मैना येते नि पोपट येतो,
पेरू, डाळिंब खाऊन जातो-खाऊन जातो.
मोर येतो नि लांडोर येते,
आंब्याच्या डहाळीवर झुलून जाते-झुलून जाते.
कोकीळ येतो नि बुलबुल येतो,
गोड गोड गाणी गाऊन जातो-गाऊन जातो.
चला शिकूया.-
साभिनय व तालासुरात गीतगायन करणे.
गाण्याचा आनंद घेणे.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |