कोण आले मदतीला?
चला शिकूया.-
घटना, कृती आणि पात्र यांना एकसंघपणे पाहून त्यांचे समजपूर्वक वाचन करता येणे.
[शाळेच्या आवारात मुलामुलींचा घोळका… सगळ्यांचे लक्ष समोरच्या बाजूने आकाशात दिसणाऱ्या धुराच्या दिशेने…रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची गाडी आवाज करत जाताना…]
अमित – अरे बापरे! समोर पाहा ना. किती मोठा धूर दिसत आहे.
रोहित – हो ना! अरे अमित, त्या बाजूला मेघनाच्या आजोबांचे शेत आहे.
शिक्षक – अरे मुलांनो! शांत राहा….शांत राहा. गोंगाट करू नका. शेतात काहीतरी घटना घडलेली दिसत आहे. [तेवढ्यात शाळेचेसेवक तेथे येतात.]
सेवक – सर, भाऊंच्या शेताच्या बाजूला असलेल्या गोठ्याला आग लागली आहे.
त्यांच्या गाई-म्हशींना आगीची थोडीशी झळ लागली आहे.
शिक्षक – भाऊही शेतात होते का?
सेवक – होते ना……. भाऊंच्या शेतात काही मजूरही काम करत होते. ते मदतीला धावून गेले. त्यांनाही थोडे भाजले आहे.
सुमन – सर, आग कशामुळे लागली असेल?
शिक्षक – याबाबत पोलीस सर्व चौकशी करतील. तेव्हाच नेमके कारण कळू शकेल.
तनया – पण फायर ब्रिगेडची गाडी, ॲम्ब्युलन्स कोणी बोलावली असेल?
सेवक – अगं तनया, भाऊंच्या मुलाने पटापट १००, १०१, १०८ या नंबरवर फोन लावले. फोन करताच अग्निशामक दलाची गाडी आली. त्या जवानांनी भराभर आग विझवली. डॉक्टर आले. त्यांनी भाऊंना व शेतमजुरांना तपासले. औषध दिले. काही मजुरांना थोडे भाजले होते. नर्सने नेत्यांना लावायला मलम दिले. बघ्यांची गर्दी खूप झाली तेवढ्यात पोलीसही आले. गाई-म्हशींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही आले.
शिक्षक – पण सर्वजण ठीक आहेत ना?
सेवक – सुदैवाने फारसं काही झालं नाही. वेळेवर सर्वांची मदत मिळाली.
शिक्षक – आपणही भाऊंना भेटायला जायला हवे. पाहिलंत ना मुलांनो, संकटाच्या वेळी कोण-कोण मदतीला धावून आले? सर्वांनी केलेल्या मदतीमुळेच फारसे नुकसान झाले नाही. म्हणूनच आपण या सर्वांचे आभार मानायला हवेत.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |