एक राखी सैनिकासाठी ,A rakhi for a soldier
बाई वर्गात येताच मुलांना म्हणाल्या, ‘‘या वर्षी आपण सीमेवरील सैनिकांसाठी राख्या बनवूया का?’’ वर्गातील सर्व मुले मुली एका सुरातच ‘होऽऽ’ म्हणाली.
तनिषा म्हणाली, ‘‘बाई, तन्वी खूप छान राख्या बनवते.’’ स्मिता म्हणाली, ‘‘बाई, आपण याबरोबर शुभेच्छा कार्डही बनवूया का?’’ रोहन म्हणाला, ‘‘बाई, माझा मामाही सैनिक आहे. आई नेत्याला कालच राखी पाठवली.’’ बाईंनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले.
बाईंनी सर्व मुला मुलींचे ५-५ चे गट केले. गटांमध्ये सर्वांना राखी तयार करण्यासाठी साहित्य दिले. बाईंनी तन्वीला पुढे बोलावले.राखी कशी तयार करायची हे सांगायला सांगितले.
तन्वीने टेबलावरील साहित्य घेतले, कात्रीने विशिष्ट आकार कापत, त्यावर रंगीबेरंगी टिकल्या चिकटवत राखी तयार केली. हे पाहून सर्वांना नवनवीन कल्पना सुचू लागल्या.
सर्व मुलांनी आपापल्या कल्पनेप्रमाणे सुंदर राख्या बनवल्या. सोबत शुभेच्छा कार्डही तयार केली. बाईंनी सर्व मुला मुलींचे कौतुक केले. बाईंनी सर्वांना राख्या एकत्रित करण्यास सांगितले. एक मोठे पाकीट घेतले. त्यावर पत्ता टाकला. सर्व राख्या पाकिटात भरल्या.
शाळेतील सेवकाला बोलावून पाकीट पोस्टात टाकण्यास सांगितले. सर्वजण आपण केलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांना पाठवणार या कल्पनेने आनंदून गेले होते.
जोडाक्षरयुक्त शब्द लिही.
म्हणाल्या,राख्या,तन्वी,स्मिता,म्हणाली, शुभेच्छा,नेत्याला,म्हणणे,साहित्य,टिकल्या,कल्पना,लागल्या,आपापल्या,कल्पनेप्रमाणे, बनवल्या,त्यावर, पत्ता,टाकण्यास
राखीचे चित्र रंगव. (Colour the picture of a rakhi.)चला शिकूया.-
समजपूर्वक वाचन करता येणे.
जोडशब्दांचे लेखन करता येणे.
मराठी व सेमी माध्यम
क्र | घटकाचे नाव | लिंक |
1 | बालभारती भाग 1 | क्लिक करा |
2 | बालभारती भाग 2 | क्लिक करा |
3 | बालभारती भाग 3 | क्लिक करा |
4 | बालभारती भाग 4 | क्लिक करा |
5 | गणित (सेमी इंग्रजी) | क्लिक करा |
6 | जुना अभ्यासक्रम | क्लिक करा |