5 october | 5 ऑक्टोबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

5 october

5 ऑक्टोबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- गुरुवार

दिनांक- 05/10/2023, 5 ऑक्टोबर

मिती-  भाद्रपद कृ.7

शके– 1945

सुविचार-  प्रत्येक यशामागे अपयशाची मोठी पायरी असते.

म्हणी व अर्थ –  एका हाताने टाळी वाजत नाही- भांडणातील दोन्ही बाजू दोषी असतात.

वाक्यप्रचार- तोंड देणे- सामना करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

ऑक्टोबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७८ वा किंवा लीप वर्षात २७९ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८६४ – कोलकात्यावर आलेल्या चक्रीवादळात ६०,००० मृत्युमुखी.

विसावे शतक

  • १९१० – पोर्तुगाल प्रजासत्ताक झाले.
  • १९४८ – अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.

जन्म

  • १८२९ – चेस्टर ए. आर्थर, अमेरिकेचा २१वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८२ – रॉबर्ट गॉडार्ड, अमेरिकन रॉकेटतज्ञ.
  • १८९० – किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला, हिंदी पत्रकार, संपादक.
  • १९३२ – माधव आपटे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९३४ – डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३५ – जिमी बिंक्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३६ – वाक्लाव हावेल, चेक प्रजासत्ताकचा नाटककार व राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ – तेरेसा हाइन्झ केरी, अमेरिकन उद्योगपती.
  • १९४० – बॉब काउपर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४१ – एदुआर्दो दुहाल्दे, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६१ – डेरेक स्टर्लिंग, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ – टोनी डोडेमेड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ – ह्यु मॉरिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ – सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७५ – केट विन्स्लेट, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू

  • ५७८ – जस्टीन दुसरा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ८७७ – टकल्या चार्ल्स, फ्रांसचा राजा व पवित्र रोमन सम्राट.
  • १०५६ – हेन्री तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
  • १२१४ – आल्फोन्सो आठवा, कॅस्टिलचा राजा.
  • १२८५ – फिलिप तिसरा, फ्रांसचा राजा.
  • १५६५ – लोडोव्हिको फेरारी, इटालियन गणितज्ञ.
  • १९१८ – रोलॉॅं गॅरो, फ्रेंच वैमानिक.
  • १९९१ – रामनाथ गोएंका, भारतीय वृत्तपत्रसंचालक.
  • १९९२ – परशुराम भवानराव पंत, भारतीय राजनैतिक मुत्सद्दी.
  • १९९६ – सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
  • २००१ – थॉमस वॉटरफील्ड, ब्रिटिश-भारतीय साहित्यिक.
  • २००३ – विल्सन जोन्स, भारतीय बिलियर्ड्सपटू.
  • २००४ – रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
  • २०११ – स्टीव्ह जॉब्स, अमेरिकन उद्योगपती, ॲपल कम्प्युटर्सचे सहसंस्थापक

प्रतिवार्षिक पालन

  • प्रजासत्ताक दिन – पोर्तुगाल.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

लोभी शिक्षा
एक ब्राह्मण यजमानाकडे पूजाअर्चा करून आपला चरितार्थ चालवत होता. दुर्दैवाने देशात दुष्काळ पडला. त्यामुळे ब्राह्मणाला रोजच्या जेवणाची भ्रांत पडली, यापेक्षा मरण पत्करलेले परवडले असा विचार करून तो जंगलात गेला.
तेथे वाघाला पाहिले. ब्राह्मणाने विचार केला, या वाघाने मला जर खाल्ले तर तर त्याची भूक भागेल व माझीही मृत्यूची इच्छा पूर्ण होईल. तसा तो वाघासमोर उभा राहिला.
वाघ मनुष्यवाणीत बोलू लागला,”तू असा माझ्यासमोर का उभा आहेस ” ब्राह्मणाने आपली कर्मकहाणी त्याला सांगितली. तेव्हा वाघाला त्याची दया आली. तो प्रत्यक्षात वाघ नसून वाघाचे रूप घेतलेली वनदेवता होती.
वनदेवतेने आपले खरे रूप प्रगट करून त्याला एक हजार सुवर्णमुद्रा व धान्य दिले व भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार करू नकोस असे बजावून त्याला परत पाठविले.
ब्राह्मण अत्यानंदाने घरी परतला. दुस-या दिवशी एक सुवर्णमुद्रा घेऊन तो दुकानदाराकडे सामान खरेदी करण्यासाठी गेला तेव्हा दुकानदाराने या सुवर्णमुद्रा तुला कोठे मिळाल्या असे विचारले असता भाबडेपणाने ब्राह्मणाने खरेखरे सर्व सांगून टाकले. लोभी दुकानदाराला तोंडाला पाणी सुटले. त्यानेही तसेच वागण्याचे ठरविले.
दुस-याच दिवशी त्याने जंगलात जाऊन त्याच ठिकाणी ठिय्या मांडला. वाघ त्याच्यासमोर प्रगटला. त्याला व्यापा-याने खोटी कर्मकहाणी सांगितली. वाघाला तत्काळ समजले, हा खोटे बोलत आहे, त्याने त्याच्यावर हल्ला चढवला आणि जखमी व्यापा-याला सुनावले, आज तुला जिवंत सोडत आहे ज्यायोगे तू असे धाडस पुन्हा करणार नाहीस.
तात्पर्य : लोभाने माणसाच्या जीवावर बेतू शकत.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

हिमालयाशी सांगती नाते
हिमालयाशी सांगती नाते सह्यागिरीचे कडे
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे ||धृ||
दगडांचा हा देश छाती दगडाची याची
अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवबांची
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||१||
गडागडावर कड्याकड्यावर इतिहासाच्या खुणा
मनामनावर मंत्र घालुनि देत नव्या प्रेरणा
मान रक्षिण्या इथे शिंपले रक्ताचे किती सडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||२||
संताचा हा देश, सोयरा पीडित दुखीतांचा
वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दीनांचा
तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे
राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धी शक्तीच्या पुढे ||३||

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) नदी कशी तयार होते?
उत्तर : असंख्य ओहोळ एकत्र येऊन नदी तयार होते.
२) झरा कशाला म्हणतात ?
उत्तर : जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीतून बाहेर पडते  त्याला झरा म्हणतात.
३) जलरूपांची नावे सांगा.
उत्तर: झरा , ओढा, नदी,  तळे,  जलाशय, खाडी,  समुद्र,  महासागर
४) भूरूपांची नावे सांगा .
उत्तर : पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने, खिंड, दरी
५) धरण कशाला म्हणतात?
उत्तर :  नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते त्याला धरण म्हणतात.

इंग्रजी प्रश्न

1) How many fingers on both hands?
Ans : Ten
2) How many fingers on one hand?
Ans : Five
3) How many eyes do you have?
Ans : Two
4) How many legs do you have ?
Ans : Two
5) How many nose do you have?
Ans : One

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#5 october, 5 october 2023, 5 october 2021 panchang, 5 october 2022 special day, 5 october 2023 weather, 5 october 2022 panchang in hindi, 5 october is celebrated as, what is celebrated on 5 october, 5 october 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.