5 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

5 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- गुरुवार,

दिनांक- 05/01/2023,

मिती- पौष शुद्ध 14

शके-1944,

सुविचार- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

म्हणी व अर्थ-
भरंवशाच्या म्हशीला टोणगा
अर्थ- पूर्ण निराशा करणे

आजचा दिनविशेष-

5 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 5वा किंवा लीप वर्षात 5वा दिवस असतो.

पक्षी दिन – अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ठळक घटना आणि घडामोडी-

पंधरावे शतक-

१४६३ – कवि फ्रांस्वा व्हियोंची पॅरिसमधून हकालपट्टी.

१४७७ – नॅन्सीची लढाई – चार्ल्स द बोल्डचा मृत्यू. बरगंडी फ्रांसमध्ये समाविष्ट.

सतरावे शतक-

१६६४ – छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरून तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली.

१६७१ – छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले.छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला

१६७५ – कोल्मारची लढाई – फ्रेंच सैन्याने ब्रांडेनबर्गला हरविले.

अठरावे शतक-

१७५९ – जॉर्ज वॉशिंग्टन व मार्था डॅंड्रिज कर्टिसचे लग्न.

१७८१ – अमेरिकन क्रांती – बेनेडिक्ट आर्नोल्डच्या ब्रिटीश नौदलाने रिचमंड, व्हर्जिनिया जाळले.

एकोणिसावे शतक-

१८३२ – दर्पण या मराठी वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित.

१८५४ – सान फ्रांसिस्को जहाज बुडाले. ३०० ठार.

१८९६ – विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.

विसावे शतक-

१९०९ – कोलंबियाने पनामाचे स्वातंत्र्य मान्य केले.

१९१४ – फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर प्रती दिवशीचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठरावीक तासांचे काम करणे भाग नसे.

१९१९ – जर्मनीत जर्मन कामगारांच्या शांततेसाठीची मुक्त समिती स्थापन झाली. याचेच पुढे नाझी पक्षात रूपांतर झाले.

१९२४ – महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.

१९३३ – सान फ्रांसिस्कोच्या खाडीवर गोल्डन गेट ब्रिजचे बांधकाम सुरू झाले.

१९४१ – दुसरे महायुद्ध – लिब्यातील बार्डिया इथे २५००० इटालियन सैनिकांनी दोस्तसैन्यापुढे शरणागती पत्करली.

१९४८ – वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.

१९४९ – पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही संस्था सुरू झाली.

१९५७ – भारतात विक्रीकर कायदा लागू झाला.

१९६८ – अलेक्झांडर दुब्चेक चेकोस्लोव्हेकियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. चेकोस्लोव्हेकियामध्ये प्राग वसंत सुरू.

१९७२ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकूम दिला.

१९७४ – अंटार्क्टिकामधील सर्वोच्‍च तापमानाची (१५º सेल्सिअस) नोंद झाली.

१९७५ – ऑस्ट्रेलियातील टास्मानियाच्या टास्मान ब्रिजला खनिजवाहू जहाज लेक इलावाराने धडक दिली. १२ ठार.

१९७६ – कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे गणराज्य.

१९८४ – रिचर्ड स्टॉलमनने ग्‍नूवर काम सुरू केले.

१९९३ – तेलवाहू जहाज एम.व्ही.ब्रेर शेटलंड बेटांवर किनाऱ्यास घसटले. ८४,७०० टन खनिज तेल समुद्रात.

१९९७ – रशियाने चेचन्यातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.

एकविसावे शतक-

२००४ – संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर हल्ला करून अनेक अनमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.

जन्म-

१५८७ – झु झियाके, चीनी लेखक व शोधक.

१५९२ – शहाजहान, भारतातील मोगल सम्राट.

१७७९ – झेब्युलोन पाईक, अमेरिकन शोधक.

१८४६ – रुडॉल्फ क्रिस्टॉफ युकेन, जर्मन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता.

१८५५ – किंग कॅम्प जिलेट, अमेरिकन शोधक.सेफ्टी रेझर तयार करून प्रथम बाजारात आणणारा.

१८६८ – गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, मराठी संतकवी.

१८६९ – वेंकटेश तिरको कुलकर्णी, कन्नड साहित्यिक .

१८८३ – खलील जिब्रान, अरब कवी, तत्त्वज्ञानी व चित्रकार.

१८९२ – कृ.पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक.

१८९३ – परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.

१९१३ – श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.

१९२० – मोहम्मद अस्लम, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९२२ – मोहम्मद उमर मुक्री, हिंदी विनोदी चरित्र अभिनेता.

१९२५ – रमेश मंत्री, मराठी साहित्यिक .

१९२८ – इम्तियाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९३८ – पहिला हुआन कार्लोस स्पेनचा राजा.

१९४१ – मन्सूर अली खान पतौडी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पतौडी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.

१९४१ – बॉब क्युनिस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.

१९४८ – पार्थसारथी शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९४८ – फैय्याज अभिनेत्री व गायिका.

१९५१ – एझ्रा मोझली, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.

१९५५ – ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या.

१९६१ – ना. धों. ताम्हणकर कथालेखक, कादंबरीकार व बाल साहित्यकार.

१९६२ – ब्रॅंन्डन कुरुप्पु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९७७ – जमालुद्दीन अहमद, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.

१९८१ – मार्लोन सॅम्युएल्स, वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू.

१९८६ – दीपिका पदुकोण – कन्नड, हिंदी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री.

मृत्यू-

८४२ – अल मुतासिम, अब्बासी खलिफा.

१५८९ – मेदिचीची कॅथेरीन, फ्रान्सचा राजा हेन्री दुसरा याची पत्नी.

१६५५ – पोप इनोसंट दहावा.

१७६२ – रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.

१८४७ – त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक.

१९३३ – कॅल्विन कूलिज, अमेरिकेचा २९वा अध्यक्ष.

१९४३ – जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ.

१९७१ – पी.सी.सरकार, भारतीय जादूगार.

१९८२ – रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार.

१९८४ – सिद्धेश्वरशास्त्री चित्रा व वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार.

१९९० – रमेश बहल – चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.

१९९२ – द. ग. गोडसे समिक्षक , नाटककार, इतिहासकार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार

२००३ – गोपालदास पानसे – पखवाजवादक.

प्रतिवार्षिक पालन-

पक्षी दिन – अमेरिकेची संयुक्त संस्थाने

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

स्वप्न आणि सत्य
एकदा स्‍वप्‍न आणि सत्‍य यांचे जोरदार भांडण झाले. भांडणाचा विषय होता, ’भविष्‍य घडविण्‍यात सर्वाधिक सहभाग कोणाचा असतो’. दोघेही खूप भांडले, भरपूर वाद घातला पण निर्णय काही होईना.
शेवटी दोघेही आपल्‍या पित्‍याकडे गेले. पित्‍याला वादाचा विषय सांगितला. पिता म्‍हणाला,’’ज्‍या कोणाचे हात आभाळाला टेकतील पण तरीही पाय जमिनीवर असतील त्‍याचा भविष्‍य घडविण्‍यात निर्णायक सहभाग असतो.’’ दोघेही परत आले.
सर्वप्रथम स्‍वप्नाने एकाच उडीत त्‍याचे हात आभाळाला टेकले, मात्र पाय जमिनीपासून केव्‍हाच उचलले गेले होते. मग सत्‍याने प्रयत्‍न केला मात्र त्‍याचे पाय कायम जमिनीवर टेकलेले होते पण हात आभाळाला पोहोचू शकले नाहीत. दोघांनीही खूप प्रयत्‍न केले पण दोघेही अयशस्‍वी राहिले. शेवटी थकून ते पुन्‍हा एकदा पित्‍याकडे गेले.
तेव्‍हा पिता म्‍हणाला,’’ भविष्‍य घडविण्‍यात सत्‍य आणि स्‍वप्‍न या दोघांचाही समान सहभाग असतो.’’
तात्पर्य:- खऱ्या अर्थाने भविष्य घडवायचे असेल तर स्वप्नाला सत्याच्या खांद्यावर उभे राहला हवे.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

बालगीत-

आईचं बोट सोडून, एकटाच फिरतो ।

अंधारात चांदण्यांशी लपाछपी खेळतो ।

अंगाई गीत ऐकूनही जागाच राहतो ।

कधीच कोणाला घाबरत नाही ।

कसं होणार या माझ्या चांदोबाच, कळतच नाही ।

सामान्यज्ञान

✪  जगातील सर्वांत मोठे व्दीप कोणते ?
  ➜ ऑस्ट्रेलिया.
 ✪  अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणतं ?
  ➜ गुरू शिखर.
 ✪  ‘सिटी ऑफ गोल्डन गेट’ कोणत्या शहराला म्हणतात ?
  ➜ सॅन फ्रान्सिस्को.
 ✪  भारताची सर्वांत जास्त लांब स्थलसीमा कोणत्या देशासोबत आहे ?
  ➜ बांग्लादेश.
 ✪ कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?
  ➜ ८ राज्यातून.

व्यक्तीविशेष-

श्रीपाद नारायण पेंडसे-
मराठी कथालेखक व कादंबरीकार
जन्म :~ ५ जानेवारी १९१३ मुर्डी, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र
मृत्यू :~ २३ मार्च २००७, मुंबई, महाराष्ट्र,
कार्यक्षेत्र :~ कादंबरीकार
प्रसिद्ध साहित्यकृती :~  रथचक्र, गारंबीचा बापू, तुंबाडचे खोत
श्रीपाद नारायण पेंडसे
हे मराठी भाषेतील एक कथालेखक व कादंबरीकार होते

बालपण आणि प्रभाव

पेंडसेंचा जन्म ५ जानेवारी १९१९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्य़ातील मुर्डी या गावी झाला. १९२४ मध्ये पेंडसे मुंबईला स्थायिक झाले ते कायमचे. वयाच्या ११ व्या वर्षांपर्यंत त्यांनी जो कोकण पाहिला होता, आपल्या मनात साठवला होता, त्यावर ते आयुष्यभर लिहीत राहिले. मग तो साकव असेल, व्याघ्रेश्वराचे देऊळ असेल, किंवा नारळी-पोफळीच्या बागा असतील. त्या त्यांच्या भावविश्वाचा अतूट भाग झालेल्या होत्या.
श्री. ना. पेंडसेंना खाजगीत शिरूभाऊ म्हणत. खाजगीतील (कौटुंबिक) हे नाव त्यांच्या मित्रमंडळीत आणि पुढे लेखनाच्या क्षेत्रातही रूढ झाले. त्यांच्या नावाचा उल्लेख साहित्य प्रांतातही ‘पेंडसे’ असा होण्याऐवजी ‘शिरूभाऊ’ असाच होत होता, याची प्रचीती ‘श्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस’ या त्यांच्या आत्मचरित्रातूनही येते.

कारकीर्द

मुंबईच्या बेस्ट कंपनीत सेवानिवृत्तीपर्यंत नोकरी करून या संस्थेच्या आत्मीयतेपोटी त्यांनी १९७२ मध्ये ‘बेस्ट उपक्रमाची कथा’ हे पुस्तकही लिहिले.

साहित्यिक लेखन

प्रारंभी आपल्या कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले.

फडके, खांडेकर प्रभावित मराठी कादंबरी एका आवर्तात फिरत असताना पेंडसे यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत प्रादेशिक कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.
कादंबरी, कथा, नाटक, व्यक्तिचित्रण, आत्मचरित्र अशा विविध वाङ्मयप्रकारांत लेखन केलेल्या पेंडसेंची मराठी साहित्यात ओळख आहे ती कादंबरीकार म्हणूनच, पेंडशांची ‘जीवनकला’ ही पहिली कथा १९३८ मधे प्रसिद्ध झाली. नंतर काही व्यक्तिचित्रे त्यांनी लिहिली. ‘खडकावरील हिरवळ’ हे त्यांचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक १९४१ साली प्रकाशित झाले. हे त्यांचे प्रकाशित झालेले पहिले आणि शेवटचे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक.‘जुम्मन’ (१९६६) हा एकमेव कथासंग्रह सोडला तर त्यांनी नंतर कथालेखनही केले नाही.
व्यक्तीचा शोध, व्यक्तिमनाचा समग्र विचार हे त्यांच्या लेखनामागील प्रधान सूत्र होते.

पुरस्कार-

पेंडसेंची पहिली कादंबरी ‘एल्गार’ १९४९ मध्ये प्रकाशित झाली. ‘एल्गार’ ने पेंडसेंना जसे कादंबरीकार म्हणून नाव मिळाले, तसेच या कादंबरीच्या निमित्ताने मराठीत प्रादेशिकतेच्या संदर्भात चर्चा झडू लागल्या.‘एल्गार’ (१९४९),  ‘हद्दपार’ (१९५०), ‘गारंबीचा बापू’ (१९५२)
या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि प्रादेशिक कादंबरीकार म्हणून पेंडसेंनी मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
गारंबीचा बापू’ ही तर तत्कालीन वाचकांना झपाटून टाकणारी, चेटूक करणारी कादंबरी ठरली. याच तीन कादंबऱ्या समोर ठेवून गंगाधर गाडगीळांनी ‘हर्णैचा दीपस्तंभ’ हा लेख लिहून पेंडसेंचे कादंबरीकार म्हणून मूल्यमापन केले होते.
सातत्य आणि प्रयोगशीलता हे कादंबरीकार म्हणून पेंडसे यांच्या प्रकृतीचे एक वैशिष्टय सांगता येईल. मधल्या काळात हत्या’ (१९५४), ‘यशोदा’(१९५७), ‘कलंदर’ (१९५९) या तीन कादंबऱ्या आणि ‘यशोदा’ व ‘राजेमास्तर’ ही दोन नाटके त्यांनी लिहिली.
१९६२ मध्ये त्यांची ‘रथचक्र’ ही कादंबरी प्रकाशित झाली आणि कादंबरीकार म्हणून त्यांच्या यशात यानिमित्ताने मानाचा तुरा खोवला गेला. ‘रथचक्र’ला १९६३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
रथचक्र’ला अभिजात कलाकृतीचे परिमाण प्राप्त झाले. यातील निनावी पात्रांचा प्रयोग तर मराठी कादंबरीत अपूर्वच म्हणता येईल. ‘ रथचक्र’नंतर ‘लव्हाळी’ आली त्यामध्ये दुसऱ्या महायुद्धोत्तर काळातील जीवन जाणिवा, क्षुद्रत्व हा आशय मांडण्यासाठी त्यांनी दैनंदिनीची शैली स्वीकारली. त्यांनी ‘लव्हाळी’नंतर ‘आकांत’ नावाची आणखी एक कादंबरी लिहिली.
पण त्यानंतर १९८८ मध्ये १३५८ पृष्ठांची ‘तुंबाडचे खोत’ ही त्यांची द्विखंडात्मक कादंबरी प्रकाशित झाली आणि पुन्हा पेंडसेंचे नाव चर्चेत आले. पृष्ठसंख्येच्या दृष्टीने मराठीतील ही एकमेव मोठी कादंबरी होती.कादंबरीलेखनासोबतच पेंडसेंनी नाटय़लेखनही भरपूर केले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अकरा नाटके लिहिली. त्यातील ‘राजेमास्तर’, ‘यशोदा’, ‘गारंबीचा बापू’, ‘असं झालं आणि उजाडलं’ आणि ‘रथचक्र’ ही नाटके त्यांच्याच कादंबऱ्यांवर आधारित होती. याशिवाय ‘महापूर’, ‘संभूसाच्या चाळीत’,‘चक्रव्यूह’, ‘शोनार बांगला’, ‘पंडित! आता तरी शहाणे व्हा’, ‘डॉ. हुद्दार’ ही वेगळ्या पिढीतली नाटके.
त्यांची नाटके आणि कादंबऱ्या या दोन्हीही सारख्याच लोकप्रिय आहेत.त्यांच्या नाटकात कोणती ना कोणती समस्या असते. प्रेक्षकांच्या विचारशक्तीला चालना देणारे विचार त्यांच्या नाटकात असतात. संवाद मोठे प्रभावी व सहज सुंदर असतात. एखाद्या समस्येच्या मुळाशी खोल खोल जाणे हा त्यांच्या प्रतिभेचा विशेष होता.

मिळालेले पुरस्कार-

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
प्रियदर्शिनी पुरस्कार
महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचे पाच पुरस्कार
लाभसेटवार साहित्यसन्मान पुरस्कार
साहित्य अकादमी पुरस्कार,

मराठी परिपाठ

परिपाठ ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.