4 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ,Daily Routine

4 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- बुधवार,

दिनांक- 04/01/2023,

मिती- पौष शुद्ध 13 (षौष त्रयोदशी)

शके-1944,

सुविचार- परिस्थिती गरीब असली तरी चालेल,पण विचार ‘भिकारी’ नसावेत.

म्हणी व अर्थ-
दगडापेक्षा वीट मऊ-
मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.

आजचा दिनविशेष-

4 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 4था किंवा लीप वर्षात 4था दिवस असतो.

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

ठळक घटना आणि घडामोडी-

नववे शतक-

८७१ – रीडिंगची लढाई – वेसेक्सचा एथेलरेड डेन्मार्कच्या आक्रमकांकडून पराभूत.

पंधरावे शतक-

१४९३ – क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.

सतरावे शतक-

१६४२ – इंग्लिश गृहयुद्ध – चार्ल्स पहिल्याने ब्रिटिश संसदेवर हल्ला केला.

अठरावे शतक-

१७१७ – नेदरलँड्स, इंग्लंड व फ्रान्सने तिहेरी तह केला.

१७६२ – इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरुद्ध युद्ध पुकारले.

एकोणिसावे शतक-

१८४७ – सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हाॅल्व्हर पिस्तूल विकले.

१८८१ – लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.

१८८५ डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रँट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर आंत्रपुच्छ काढून टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली.

१८९६ – युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.

विसावे शतक-

१९२६ – लखनौ येथे भारतीय क्रांतिकारकांवर काकोरी खटल्याच्या सुनावणीस सुरुवात.

१९४४ – अॅडोल्फ हिटलरने जर्मनीतील १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करून घेण्याबद्दलचा वटहुकूम काढला.

१९४८ – म्यानमार(तत्कालीन बर्मा) ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.

१९५१ – कोरियन युद्ध – चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेऊल काबीज केले.

१९५२ – ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.

१९५४ – मेहेरचंद महाजन भारताच्या सरन्यायाधीशपदी.

१९५८ – स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.

१९५८ – एडमंड हिलरी दक्षिण ध्रुवावर पोहोचले.

१९५९ – रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.

१९६२ – न्यू यॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.

१९६४ – वाराणसी येथे भारतातील पहिले डिझेल रेल्वे इंजिन येथे तयार झाले.

१९७४ – अमेरिकेची सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.

१९८९ – अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिबियाची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.

१९९० – पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.

१९९६ – चंद्रकांत खोत यांच्या बिंब प्रतिबिंब या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा पुरस्कार.

१९९९ – पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशिदीवर नमाजादरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.

एकविसावे शतक-

२००४ – मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी.

२००४ – नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.

२००७ – नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.

२०१० – बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीचे दुबईमध्ये उद्‍घाटन झाले.

जन्म-

१०७६ – झ्हेझॉॅंग, सॉंग वंशाचा चिनीसम्राट.

१६४३ – सर आयझॅक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.

१८०९ – लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी ‘ब्रेल लिपी’ तयार करणारा.

१८१३ – आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहॅंड) तयार करणारा.

१८४८ – कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.

१९०० – जेम्स बॉंड, अमेरिकन पक्षीिास्त्रज्ञ.

१९०९ – प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.

१९१४ – इंदिरा संत, मराठी कवियत्री.

१९२४ – विद्याधर गोखलेनाटककार,खासदार,लेखक संपादक.

१९२५ – प्रदीप कुमार, हिंदी व बंगाली चित्रपटअभिनेता.

१९३७ – सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९४० – श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.

१९४१ – कल्पनाथ राय, केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते.

१९५३ – जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा प्रमुख.

मृत्यू-

१२४८ – सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.

१५६४ – होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती.

१६९५ – फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रान्सचा सेनापती.

१८३१ – जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.

१८५१ – दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.

१८७७ – कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती.

१९०७ – गोवर्धनराम त्रिपाठी ‘सरस्वतीचंद्र’ या गुजराती कादंबरीचे लेखक.

१९०८ – राजारामशास्त्री भागवत विचारवंत व संस्कृत पंडित.विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दुधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते.

१९६५ – टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक.

१९९४ – राहुल देव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार

२००६ – मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम, दुबईचा शेख व संयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन-

आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन

स्वातंत्र्यदिन : म्यानमार (१९४८)

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

कावळा व चिमणी
एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे.
कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू…हू…हू…हू…!
कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’
चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते’ थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली ‘चिऊताई, चिऊताई, दार उघड !’ चिमणी आतून म्हणाली ‘थांब माझ्या बाळाला झोपवते’.
इकडे कावळयाला खूप भूक लागली होती. पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला.
चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली ‘तू बैस चुलीपाशी’. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.
तात्पर्य : एखाद्याने मदत केली तर त्याला त्रास देयू नये.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो

हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो

वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो

हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो

करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो

या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो

ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो

कवी : साने गुरुजी

बालगीत-

हु S S प… हु SS प… करत, माकड शिरले घरात ।

धडाड –धुडूम डबे पाडले,  कांदे — बटाटे — घरभर विखुरले ।

T V  वर जाऊन बसले, खी –खी — खी — खी हसू  लागले ।

बाबांनी उगारली काठी, धावले  माकडाच्या पाठी ।

माकड मुळु –मुळु रडत बसले माझ्या सोबत ।

मला सांगू लागले, आमचे जंगल तोडले ।

घर नाही उरले, हरवली पिल्ले !

राहू कसा झाडाविना ? जगू कसा अन्ना विना ? मला त्याचे दुखः कळले, मनाशी एकच ठरवले ।

एक – एक झाड लावायचं, पर्यावरण राखायच ।

माकड झाले खूपच खुश !

गेले करत हु SS प  हु SS प ।

सामान्यज्ञान

फुलांचा राजा कोणाला म्हणतात ?
~गुलाब
फळांचा राजा कोणाला म्हणतात ?
~आंबा
प्राण्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
~सिंह
पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?
~गरूड
ऋतूंचा राजा कोणाला म्हणतात ?
~वसंत

व्यक्तीविशेष-

इंदिरा संत

इंदिरा संत (जन्म : इंडी, कर्नाटक, जानेवारी ४, १९१४; – पुणे, जुलै १३, २००० पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखिका होत्या.

शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५० च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती नारायण संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह ‘सहवास’ या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना. मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकर यांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता ‘मृण्मयी’ नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या.

जन्म आणि शिक्षण-

पूर्वाश्रमीच्या इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांचा जन्म जानेवारी ४, १९१४ रोजी कर्नाटकातील इंडी या गावी झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी. ए., बी.टी. डी. व बी. एड. या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले.

पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील सहाध्यायी नारायण संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

व्यक्तिमत्त्व आणि जीवनप्रवास-

गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत वासंती मुझुमदार ह्यांनी इंदिरा संतांविषयी सांगितले आहे की, “आपला आनंद अक्का (इंदिरा संत) स्नेहीजनांना सुंदर भेटवस्तू देऊन जरी साजरा करत तरी त्या स्वतः मात्र ह्या सर्वांतून अलिप्त असत. ही अलिप्तता त्यांना त्यांच्या आयुष्यातल्या खडतर अनुभवांनी मिळवून दिली होती. मात्र त्या खुल्या मनाने बदलांचं आणि नव्या गोष्टींचं स्वागत करत. यश आणि अपयश त्या एकाच मापाने तोलत असत.” एका उमद्या आणि जीवनाचा भरभरून आस्वाद घेत त्याच्याशी दोस्ती करण्याच्या त्यांच्या ह्या स्वभावधर्मामुळेच आपल्याला त्यांच्या कवितांतून गहिऱ्या, अंतरंग व्यापणाऱ्या आणि तरीही नवोन्मेशशालिनी अशा कवयित्रीचे दर्शन घडते.[१]

प्रकाशित साहित्य-

इंदिरा संत यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे :

कवितासंग्रह-

  • इंदिरा संत यांच्या समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१४). या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे.
  • गर्भरेशीम १९८२ – पॉप्युलर प्रकाशन
  • निराकार
  • बाहुल्या १९७२
  • मरवा
  • मालनगाथा : मालन नावाच्या बाईच्या ओव्यांचा संपादित संग्रह, भाग १, २.
  • मृगजळ १९५७
  • मेंदी १९५५
  • रंगबावरी १९६४
  • वंशकुसुम
  • शेला १९५१

कथासंग्रह-

  • कदली
  • चैतू
  • श्यामली

ललितलेख संग्रह-

  • मृद्गंध १९८६ – – मेहता पब्लिशिंग हाऊस
  • फुलवेल १९९४

कादंबरी-

  • घुंघुरवाळा

इंदिरा संतांवरील पुस्तके-

  • आक्का, मी आणि….: इंदिरा संतांच्या निकट सहवासात (वीणा संत)

संदर्भग्रंथ आणि इतर-

  • मालनगाथा – मेहता पब्लिशिंग हाऊस

पुरस्कार-

  • साहित्य अकादमी पुरस्कार – गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी
  • अनंत काणेकर पुरस्कार – गर्भरेशीम ह्या काव्यसंग्रहासाठी
  • साहित्य कला अकादमी पुरस्कार – घुंघुरवाळा ह्या लोकसाहित्यावरील संपादित पुस्तकासाठी.
  • महाराष्ट्र शासन पुरस्कार – शेला रंगबावरी, मृगजळ ह्या काव्यसंग्रहांसाठी
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार

मराठी परिपाठ,

परिपाठ ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,
परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.