6 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, DAILY ROUTINE

6 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- शुक्रवार,

दिनांक- 06/01/2023,

मिती- पौष शुद्ध 15

शके-1944,

सुविचार- विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.

म्हणी व अर्थ-
पळसाला पाने तीनच – कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे .

आजचा दिनविशेष-

पत्रकार दिन (महाराष्ट्र)

6 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 6वा किंवा लीप वर्षात 6वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी-

सतरावे शतक

१६६४ – मराठी सैन्य सुरतेत शिरले.

१६६५ – शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाबाई व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.

१६७३ – कोंडाजी फर्जंद यांनी ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला.

एकोणिसावे शतक-

१८३२ – बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई येथे दर्पणचा पहिला अंक प्रकाशित केला.

१८३८ – सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.

विसावे शतक-

१९२४ – वि.दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून  जन्मठेपेतून सुटका.

१९२९ – मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

१९०७ – मारिया माँटेसोरी यांनी पहिली माँटेसोरी शाळा सुरू केली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.

१९१२ – न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७वे राज्य बनले.

१९२९ – मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.

१९४४ – दुसरे महायुद्ध – सोवियेत सैन्य पोलंडमध्ये शिरले.

१९९३ – सोपोर हत्याकांड – अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी ५५ काश्मिरी नागरिकांची हत्या केली.

जन्म-

१४१२ – संत जोन ऑफ आर्क.

१७४५ – ऐलियन मॉंटगोल्फिएर बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा.

१८१२ – बाळशास्त्री जांभेकर – दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे आणि दिग्दर्शन या मासिकाचे प्रकाशक.

१८६८ – गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज.

१९२५ – रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक

१९२८ – विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक

१९३१ – डॉ. आर.डी. देशपांडे, मराठी पर्यावरणशास्त्रज्ञ.

१९५९ – कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. भारतीय क्रिकेट संघनायक, समालोचक व प्रशिक्षक.

१९६६ – ए.आर. रहमान, भारतीय संगीतकार.

मृत्यू-

१७९६ – जिवबा दादा बक्षी, महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी.

१८४७ – त्यागराज, दाक्षिणात्य संगीतकार

१८५२ – लुई ब्रेल, अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक.

१८८५ – भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिंदी साहित्याचे जनक मानले जाणारे हिंदी साहित्यिक.

१९१९ – थियोडोर रूझवेल्ट अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष.

१९७१ – प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार.

१९८४ – विद्यानिधी महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्रा व वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार.

१९८७ – जयदेव , हिंदी चित्रपट संगीतकार.

२०१० – प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक

२०१७ – ओम पुरी, हिंदी अभिनेता.

प्रतिवार्षिक पालन-

पत्रकार दिन (महाराष्ट्र).

वर्धापनदिन : मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२)

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

बोधकथा-

उंदराची टोपी
एक होता उंदिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घेऊन तो गेला धोब्याकडे. धोब्याला म्हणाला, ‘धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धुवून दे. धोब्याने फडके धुवून दिले.
मग उंदिरमामा गेला शिंप्याकडे. ‘शिंपीदादा, ‘शिंपीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे. तिला रंगीत गोंडेही लाव. शिंप्याने उंदिरमामाला टोपी शिवून दिली. उंदिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घेतले. ते वाजवत तो गाणे गाऊ लागला.
‘राजाच्या टोपीपेक्षा माझी टोपी छान. ढुम,ढुम,ढुमक !’ राजाने हे ऐकले. तो शिपायांना म्हणाला, ‘ जा रे, त्या उंदराला पकडून आणा.’ शिपायांनी उंदिरमामाला पकडले. दरबारात आणले.
त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उंदिरमामा म्हणाला ‘राजा भिकारी, माझी टोपी घेतली. ढुम,ढुम,ढुमक !’ हे ऐकून राजा खूपच रागावला. त्याने उंदराकडे टोपी भिरकावली. उंदिरमामाने टोपी पुन्हा डोक्यावर घातली व तो गाणे गाऊ लागला ‘राजा मला भ्याला. माझी टोपी दिली.
ढुम,ढुम,ढुमक !’ हे गाणे गात गात तो राजवाडयातून निघून गेला.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

हे राष्ट्र देवतांचे
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे
येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे
येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे
हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे
येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच ‘सत्य’ आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे

बालगीत-

घड्याळ दादा — घड्याळ दादा –जरा थांब थांब !

सारखी कीट -कीट का करतोस खर-खर सांग !
तुझा एक हात आहे खूप -खूप मोठा
मिनटा-मिनटाला टोचे वेळेचा काटा
तुझा दुसरा हात आहे छोटा छोटा
पण तासाची गणिते करतो पटा -पटा
मोजतोस तू फक्त एक-ते – बारा आहेस ढ गोळा !
आमच्या आळसावर मात्र सतत तुझा डोळा !
हसतोस फक्त गोड-गोड बसून भिंतीवर !
सारे जग मात्र चाले तुझ्या तालावर !

सामान्यज्ञान

✪  जगातील सर्वांत मोठे व्दीप कोणते ?
  ➜ ऑस्ट्रेलिया.
 ✪  अरवली पर्वतातील सर्वांत उंच शिखर कोणतं ?
  ➜ गुरू शिखर.
 ✪  ‘सिटी ऑफ गोल्डन गेट’ कोणत्या शहराला म्हणतात ?
  ➜ सॅन फ्रान्सिस्को.
 ✪  भारताची सर्वांत जास्त लांब स्थलसीमा कोणत्या देशासोबत आहे ?
  ➜ बांग्लादेश.
 ✪ कर्कवृत्त भारतातील किती राज्यातून जाते ?
  ➜ ८ राज्यातून.
 ✪ एका तासाचे किती मिनिटे होतात ?
 ➜ ६० मिनिटे
 ✪ एका मिनिटाचे किती सेकंद होतात ?
 ➜ ६० सेकंद
 ✪ एका तासाचे किती सेकंद होतात ?
 ➜ ३६०० सेकंद
 ✪ घड्याळातील मोठा काटा काय दाखवतो ?
 ➜ मिनीट
 ✪ घड्याळातील लहान काटा काय दाखवतो?
 ➜ तास

व्यक्तीविशेष-

बाळशास्त्री जांभेकर
दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत.

जन्म-

१९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी ६ जानेवारी १८१२ रोजी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.
ब्रिटिशांनी भारतात येताच कोलकत्त्यामध्ये ‘बेंगाल गॅझेट’ नावाने इंग्रजी साप्ताहिक २९ जानेवारी १७८० रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालये सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्त्वाचे साधन आहे. त्याकरिता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये, अशी त्यांची धारणा होती. परंतु कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो.
ब्रिटिशांनी भारतात आपले बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संघर्ष निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळे भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीने कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळाले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडले. यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत, याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनाची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांचे आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली.

वृतपत्र –

ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतु जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होते. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या-येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावे, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली. इंग्रजी भाषेत वृत्तपत्रे निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रे का निघू नयेत, असा प्रश्न निर्माण झाला.
कोलकत्त्ता येथे पहिले इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळे या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजाने नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली.
जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी ‘बेंगॉल गॅझेट’च्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकाने म्हणजेच ५२ वर्षांनी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं ‘दर्पण’ च्या रुपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरु केले. मुंबईत जांभेकरांनी ‘दर्पण’च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमीत रुजण्यास सुरुवात झाली.

दर्पणकार-

एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या जांभेकरांना आपण दर्पणकार म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकीय सत्तेला उलथून टाकायचे असेल तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही, हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री हे कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला.
मराठी वृत्तपत्रविश्वात नवी पहाट उगवली. दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्यावेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.
साधारणपणे १८३० ते १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान देशाला दिले. या काळात समाज बहुसंख्येने निरक्षर, अंधश्रद्धाळू व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रात त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्भूत ठरते. ६ जानेवारी रोजी दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस पत्रकार दिन म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केला. त्याचबरोबर जातीभेद निर्मूलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिले. त्यामुळेच त्यांचा उल्लेख “आद्य समाजसुधारक” असा केला जातो.
परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंबुर्ले येथे १८१२ च्या उत्तरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी १८४६ मध्ये निधन झाले.

मराठी परिपाठ

परिपाठ ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
परिपाठ दाखवा,परिपाठ म्हणजे काय?,
Marathi paripath
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.