7 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- शनिवार,
दिनांक- 07/01/2023,
मिती- पौष कृ.1
शके-1944,
सुविचार- इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.
आजचा दिनविशेष-
7 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 7वा किंवा लीप वर्षात 7वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी-
सतरावे शतक-
१६१०- गुरूचे आयो, युरोपा, गॅनिमीड व कॅलिस्टो हे चार चंद्र गॅलिलिओने दुर्बिणीद्वारे शोधले.
१६८० – मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.
अठरावे शतक-
१७८९ – अमेरिकेतील राष्ट्रध्यक्षपदाच्या पहिल्या निवडणुकीत जॉर्ज वॉशिंग्टन विजयी.
विसावे शतक-
१९२२ – पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतनाम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्यांची शिक्षा झाली.
१९२७ – न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
१९३५ – कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
१९५९ – क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.
१९६८ – अमेरिकेचे सर्वेक्षक यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.
१९७२ – कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
१९७८ – एम.व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचाऱ्याांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.
१९७९ – कंबोडियामध्ये हुकूमशहा पॉल पॉट आणि ख्मेर रूजच्या क्रूर सत्तेचा अंत.
१९८० – आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर इंदिरा गांधी प्रचंड बहुमताने पुन्हा विजयी झाल्या व केंद्रात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
१९८८ – विश्वनाथन आनंदने बुद्धिबळात ग्रॅंडमास्टर दर्जा मिळवला.
एकविसावे शतक-
२००१ – २१० मेगावॉटचा प्रकल्प खापरखेडा औष्णिक केंद्राकडून ४० महिन्यांत पूर्ण.
२०१५ – पॅरिसमध्ये शार्ली एब्दो ह्या उपरोधिक नियतकालिकावर दहशतवादी हल्ला; संपादक व प्रमुख व्यंगचित्रकारांसह १२ मृत.
जन्म-
१५०२ – पोप ग्रेगोरी तेरावा
१७८९ – आइल्हार्ड मिट्शेर्लिख – रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
१८०० – मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
१८२७ – सर सॅंडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
१८५८ – एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
१८८५ – माधव नारायण जोशी, मराठी नाटककार
१८९३ – जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
१९१० – फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
१९१२ – चार्ल्स अॅडाम्स – न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
१९२० – सरोजिनी बाबर- लोकसाहित्याच्या अभ्यासक. लेखिका, संत साहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी
१९२१ – चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
१९२५ – जोराल्ड डरेल, निसर्ग लेखक.
१९२८ – विजय तेंडुलकर, मराठी पत्रकार व साहित्यिक.
१९४५ – रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
१९४८ – शोभा डे, भारतीय लेखिका.
१९५० – जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
१९६१ – सुप्रिया पाठक, अभिनेत्री.
१९६४ – निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
१९७९ – बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू-
१९८९ – मिचियोमिया हिरोहितो, जपानचे सम्राट.
२००० – डॉ. अच्युतराव आपटे, विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक.
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
पावसाची सर आली बोलवायला,
जाऊ का ग आई खेळायला?
गर गर गिरकी मारायला . . .
भर भर गारा वेचायला !
जाऊ का ग आई खेळायला ?
पाण्यात नावा सोडायला
अन टप टप तालावर नाचायला
जाऊ का ग आई खेळायला ?