9 जानेवारी दिनविशेष | सप्तरंगी परिपाठ, Daily Routine

9 जानेवारी दिनविशेष

सप्तरंगी परिपाठ

आज वार- सोमवार,

दिनांक- 09/01/2023,

मिती- पौष कृ.3

शके– 1944,

सुविचार- अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो.

म्हणी व अर्थ-
बळी तो कान पिळी –
बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.

आजचा दिनविशेष-

प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते. २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते.

७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजिiत केले जातात.

२०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

9 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 9वा किंवा लीप वर्षात 9वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी-

तेरावे शतक-

१२८८ – ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.

चौदावे शतक-

१३४९ – प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.

पंधरावे शतक-

१४३१ – जोन ऑफ आर्कवर खटला सुरू.

अठरावे शतक-

१७६० – बरारी घाटच्या लढाईत अफघाणांकडून मराठ्यांचा पराभव.

१७८८ – कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.

एकोणिसावे शतक-

१८५८ – प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ॲन्सन जोन्सने आत्महत्या केली.

१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.

१८६३ – अमेरिकन यादवी युद्ध – फोर्ट हिंडमनची लढाई.

१८७८ – उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.

१८८० – वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा.’तेहरान’ बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.

१८८२ – ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.

विसावे शतक-

१९१२ – अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.

१९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

१९१६ – कानाक्केलची लढाई – ब्रिटीश सैनिकांची माघार.

१९१७ – पहिले महायुद्ध – रफाची लढाई.

१९२२ – प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.

१९४५ – अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोनवर हल्ला केला.

१९५१ – न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.

१९६० – इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.

१९६४ – अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.

१९६६ – भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे करार झाला.

१९८० : आणीबाणीनंतर इंदिरा गांधीं विक्रमी मतं मिळवून सत्तेवर.

१९९० : पिसा कलता मनोरा पर्यटकांसाठी बंद झाला.

१९९१ – लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.

१९९७ – डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.

एकविसावे शतक-

२००१ – चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.

२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

२००३ – जमिनीवरून जमिनीवर मारा करु शकणाऱ्या ‘अग्नी १ ‘या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची ओरिसामधील बालासोर येथे यशस्वी चाचणी

२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

२०११ – इराण एर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.

२०१५ – व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरुवात.

जन्म-

१५५४ – पोप ग्रेगोरी पंधरावा.

१६२४ – मैशो, जपानी सम्राज्ञी.

१८५९ – जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८८७ – डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१८८९ – वृंदावनलाल वर्मा, हिंदी साहित्यिक.

१९१३ – रिचर्ड निक्सन, अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष

१९१८ – प्रभाकर उर्ध्वरेषे, मराठी लेखक.

१९२२ – हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.

१९२६ – कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९२७ – रा.भा. पाटणकर, सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक.

१९३४ – महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.

१९३८ – चक्रवर्ती रामानुजम, भारतीय गणितज्ञ.

१९५१ – पं. सत्यशील देशपांडे, ख्यालगायक, पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य.

१९५६ – डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९६५ – फराह खान, भारतीय नृत्यदिग्दर्शक.

१९६८ – जिमी ॲडम्स, वेस्ट-इंडियन क्रिकेट खेळाडू.

१९७२ – गॅरी स्टेड, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.

१९७४ – क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

१९७४ – फरहान अख्तर, हिंदी अभिनेता, दिग्दर्शक, गायक.

१९८३ – शरद मल्होत्रा, हिंदी चित्रपट अभिनेता.

१९८९ – हॅरीस सोहेल, पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू-

१२८३ – वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान (मृत्युदंड).

१८४८ – कॅरॉलीन हर्शेल – खगोलशास्त्रज्ञ.

१८७३ – नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.

१८७८ – व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.

१९२३ – सत्येंद्रनाथ टागोर, पहिले भारतीय सनदी अधिकारी (आयसीएस).

१९६१ – एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.

१९७५ – प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.

१९९५ – मधू लिमये, स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत

१९९७ – एडवर्ड ओसोबा – मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.

१९९८ – केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.

२००३ – कमर जलालाबादी, कवी.

२००४ – शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.

२०१३ – जेम्स बुकॅनन, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ज्ञ.

२०१८ – हू जिंताओ, चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन-

शहीद दिन – पनामा.

प्रवासी भारतीय दिवस – भारत

जागतिक घरबांधणी कामगार दिन

राष्ट्रगीत-

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

प्रतिज्ञा-

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद

भारताचे संविधान 

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

प्रार्थना-

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना

मनाचे श्लोक

मना जे घडी राघवेवीण गेली।
जनीं आपुली ते तुवा हानि केली ॥
रघूनायकावीण तो शीण आहे।
जनीं दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥ ४६ ॥
मनीं लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनीं जाणता मुक्त होऊनि राहे ॥
गुणी प्रीति राखे क्रमूं साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥
सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे सत्य साचा॥
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥
सदा बोलण्यासारिखे चालताहे ।
अनेकी सदा एक देवासि पाहे॥
सगूणी भजे लेश नाही भ्रमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥
नसे अंतरी काम नानाविकारी।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥
निवाला मनीं लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

बोधकथा-

साधू आणि गवळण
एका गावात एक साधू राहत होता. लोक त्याचा फार आदर करत असत. त्या गावात दुसऱ्या गावातून दुध विकण्यासाठी एक गरीब गवळण येत असे. सर्वात प्रथम ती साधूला दुध आणून देत असे. त्यानंतर ती गावातील इतर लोकांकडे दुध वाढत असे.
एके दिवशी तिला येण्यास उशीर झाला. साधूने तिला कारण विचारले तेंव्हा तिने उत्तर दिले, “आज नदी पार करायला नाव उशिरा मिळाली, त्यामुळे येण्यास उशीर झाला.” साधू हसत म्हणाला,”लोक तर ईश्वराच्या नावावर संसार सागर पार करतात आणि तुला नदी पार करायला नाव लागते. असे वाटते कि तुला ईश्वरावर विश्वास नाही.” त्या भोळ्या गवळणीवर या बोलण्याचा खूपच परिणाम झाला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच ती गवळण साधूच्या आश्रमाच्या दारात साधूला हाक मारू लागली. साधू त्यावेळी अजून झोपलेले होते. तिच्या हाकेने साधू जागा झाला. दार उघडताच तिला पाहून साधू हैराण झाला. त्याने विचारले,”रोजच्या वेळेपेक्षा आज तुम्ही लवकर कशा काय आलात?” गवळण म्हणाली,”महाराज! तुमच्या उपदेशाने माझे काम झाले, नावेची समस्या कायमची संपली. रोजचे भाडे वाचले,आपल्या सांगण्यानुसार ईश्वराचे नाव घेतले आणि नदी पार करून आले”.
साधूचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. जेंव्हा ती नदीच्या रस्त्याने जाऊ लागली, तेंव्हा साधूही तिच्यापाठोपाठ नदीत गेला. जेंव्हा पाण्याची पातळी वाढली तेंव्हा साधू घाबरून पाण्यात पडला आणि वाचविण्यासाठी आवाज देवू लागला, तेंव्हा गवळणीने त्यांना पाण्यातून बाहेर काढले आणि विचारले,” तुम्ही आपलाच उपदेश अंमलात आणून जर ईश्वराकडे प्रार्थना केली असती तर तुम्ही नदी पार करू शकला असता.” गवळणीचा ईश्वरावरील गाढ विश्वास पाहून शरमिंदा झाला.
तात्पर्य : दृढ निश्चयाने सर्व काही साध्य होते.

पसायदान-

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

देशभक्तीपर गीत-

ध्वजगीत
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।
सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला,
वीरों को हरषाने वाला,
मातृभूमि का तन-मन सारा।। झंडा…।
शान न इसकी जाने पाए,
चाहे जान भले ही जाए,
विश्व-विजय करके दिखलाएं,
तब होवे प्रण पूर्ण हमारा।। झंडा…।
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।

बालगीत-

चल रे चल गड्या झिंमा खेळूया
वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया

उन्हाळ्याची सुटी लागली
आजोबाच्या गावांला जाऊ या , चल रे चल..

आजोबाचे दूर गांव
नांव नाही मलां ठांव, चल रे चल..

गांव किती लहान ते
शेत किती‍ छान ते, चल रे चल..

आजोबांच्या आमराईतील
गोड आंबट कैरया खाऊया, चल रे चल..

गण्या, दिन्या अनं बाळू सोबत
आबडूबली अनं लपाछपी‍ खेळू या, चल रे चल…

अंगनातील झोपाळ्यावर झोके घेऊया
झोपतांना रात्रीच्या चांदण्यात न्हाऊया, चल रे चल…

सामान्यज्ञान

1) How many days are there in a week ?
– 7 days
2) How many hours are there in a day ?
– 24 hours
3) How many letters are there in the English alphabet ?
– 26 letters
4) What is the National Anthem of India ?
– The National Anthem of India is Jana Gana Mana.
5) Name the national flower of India ?
– Lotus flower

किल्ले माहिती-

प्रतापगड- 

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोगरी किल्ला. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात महाबळेश्वरच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. वर आहे. त्याची समुद्रसपाटीपासून उंची १,०८१ मी. असून दोन्ही बाजूस २०० ते २५० मी खोल दरी आहे.

शिवाजी महाराजांनी जावळी खोरे जिंकल्यानंतर मोरो त्रिंबक पिंगळे यास १६५६ मध्ये हा किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली. मुख्यकिल्ला व बालेकिल्ला असे या किल्ल्याचे दोन भाग होतात. दोन्ही भागांत तलाव असून संरक्षणाच्या दृष्टीने किल्ल्याच्या चोहोबाजूंस भक्कम तटबंदी व बुरूज आहेत. बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ ३,६६० चौ. मी.,

तर मुख्य किल्ल्याचे ३,८८५ चौ. मी असून दक्षिणेकडील बुरूज १० ते १५ मी. उंचीचे आहेत. त्यांपैकी अफझल, रेडका, राज-पहारा, केदार इ. बुरूजांचे अवशेष टिकून आहेत.

खालच्या मुख्य किल्ल्यात शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये मोरो त्रिंबक पिंगळे यांच्या हस्ते स्थापिलेले तुळजा भवानीचे मंदिर आहे. या देवालयासमोर दोन उंच दीपमाळा आहेत. त्या जवळच नगारखान्याची इमारत आहे. तिचा १९३५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. भवानी देवीचे मूळ मंदिर हे फक्त दगडी गाभाऱ्याचे होते.

१८२० साली सातारच्या प्रतापसिंह महाराजांनी (१८१८-३९) तेथे लाकडी मंडप बांधला. हा मंडप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व मंदिरातील दागिन्यांची चोरी झाली. औरंगजेब दक्षिणेत आला असता या मंदिरासही काही उपद्रव झाला.

प्रतापगडचे ऐतिहासिक महत्त्व-

अफझलखान – शिवाजी भेट व त्या प्रसंगी झालेला अफझलखानाचा वध या घटनेमुळे वाढले (१६५९). छत्रपती राजारामसुद्धा जिंजीस जात असताना प्रथम प्रतापगडास आला. पेशवाईत नाना फडणीसाने येथे सखाराम बापूस काही दिवस नजरकैदेत ठेवले होते (१७७८). पुढे ज्या वेळी नाना फडणीसाविरुद्ध दौलतराव शिंदे व त्यांचा विश्वासू मंत्री बाळोबा कुंजीर हे चालून आले, तेव्हा नानाने १७९६ मध्ये काही दिवस या किल्ल्याचा आश्रय घेतला. १८१८ च्या ब्रिटिश – मराठे युद्धानंतर तो ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.

स्वातंत्र्योत्तर काळात या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ५ मी. उंचीचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण १९५७ च्या नोव्हेंबर महिन्यात त्यावेळचे पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांनी केले. शिवछत्रपती प्रतिष्ठानाने तेथे एक प्रशस्त सभागृह उभारले आहे. भवानी मंदिरापासून थोड्या अंतरावर अफझल बुरूजाच्या आग्नेयीस अफझलखानाची कबर आहे. तेथे दर वर्षी उरूस भरतो.

कुंभरोशी या महाबळेश्वर – महाड रस्त्यावरील गावापासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत १९५७ साली मोटार रस्ता करण्यात आला असून, तेथे एक धर्मशाळा आहे.

मराठी परिपाठ

परिपाठ,
सुविचार,
Marathi paripath pdf,
Paripath,
Sutrasanchalan,
आजचा दिनविशेष,
दिनविशेष,
आजचा दिनविशेष,
मराठी दिनविशेष,
इतिहासातील जागतिक दिवस,
ठळक घटना,
वाढदिवस,
स्मृती दिवसांची संदर्भासहित

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.