10 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- मंगळवार,
दिनांक- 10/01/2023,
मिती- पौष कृ.3
शके– 1944,
सुविचार- ज्याची आपल्याला भीती वाटते त्याचीच आपण निंदा करतो.
आजचा दिनविशेष-
जागतिक हास्य दिन
ठळक घटना आणि घडामोडी-
पहिले शतक-
४९ – ज्युलियस सीझरने रुबिकोन नदी ओलांडली. इटलीतील गृहयुद्ध सुरू.
तिसरे शतक-
२३६ – संत फाबियान पोपपदी.
सतरावे शतक-
१६६६ – सुरत लुटून शिवाजी महाराज राजगडाकडे निघाले.
अठरावे शतक-
१७३० – पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
१७६० : ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ या वाक्याने प्रसिद्ध असलेली दत्ताजी शिंदे वि. कुतुबशहा लढाई
एकोणिसावे शतक-
१८०६ – बोअर युद्ध – केप टाउनच्या डच वसाहतीने ब्रिटीश सैन्यासमोर शरणागती पत्करली.
१८१० – नेपोलियन बोनापार्ट व जोसेफिन दि बोहार्नेचे लग्न मोडले.
१८११ – लुईझियानातील दोन पॅरिशमध्ये(जिल्हे) गुलामांचा उठाव.
१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – फ्लोरिडा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातून विभक्त झाले.
१८६३ – लंडनमधील भुयारी रेल्वे पॅडिंग्टन व फॅरिंग्डन स्ट्रीट या स्थानकांमध्ये सुरू.चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरुवात झाली.
१८७० – बॉम्बे, बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीचे चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
विसावे शतक-
१९०१ – बोमोन्ट, टेक्सास जवळ खनिज तेल सापडले.
१९२० – लीग ऑफ नेशन्सने आपल्या पहिल्या बैठकीत व्हर्सायच्या तहाला मान्यता दिली.
१९२३ – लिथुएनियाने मेमेल बळकावले.
१९२६ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
१९२९ – टिनटिनची चित्रकथा पहिल्यांदा प्रकाशित.
१९४६ – लंडनमध्ये संयुक्त राष्ट्रांचीची पहिली सर्वसाधारण सभा. ५१ राष्ट्रे उपस्थित.
१९५७ – हॅरोल्ड मॅकमिलन युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
१९६६ – भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
१९७२ – शेख मुजीबुर रेहमान हे पाकिस्तानच्या कारावासातून ९ महिन्यानंतर सुटून बांगलादेश मध्ये नवीन राष्ट्रपती म्हणून परतले.
१९८९ – क्युबाने ॲंगोलातून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
१९९९ : संजीव नंदा (माजी नौदलप्रमुखाचा नातू) नवी दिल्लीत गाडी चालवताना तीन पोलिसांची चिरडून हत्या केली
एकविसावे शतक-
२००१ – विकिपिडीया न्यूपिडीयाचा एक भाग म्हणून सुरू झाला. पाच दिवसांनी त्याचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले.
जन्म-
१७७५ – दुसरे बाजीराव पेशवे.
१८१५ – सर जॉन अलेक्झांडर मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
१८६९ – ग्रिगोरी रास्पुतिन, रशियन सन्यासी, राजकारणी.
१८७१ – ज्यो ट्रॅव्हर्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९४ – पिंगली लक्ष्मीकांतम, तमिळ कवी.
१८९६ – काकासाहेब तथा नरहर विष्णू गाडगीळ, भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी साहित्यिक, वक्ता.
१८९६ – दिनकर गंगाधर केळकर, वस्तुसंग्रहक.
१९०० – मारोतराव सांबशिव कन्नमवार, महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३)
१९०१ – डॉ. गणेश हरी खरे, इतिहास संशोधक.
१९०२ – शिवराम कारंथ, कन्नड साहित्यिक.
१९०३ – पड थर्लो, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९१३ – गुस्ताव हुसाक, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९१७ – टायरेल जॉन्सन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९१८ – आर्थर चुंग, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.
१९१९ – श्री.र. भिडे, संस्कृत अभ्यासक, मराठी लेखक.
१९२७ – शिवाजी गणेशन, तमिळ चित्रपट अभिनेता.
१९३३ – लेन कोल्डवेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९३८ – डोनाल्ड क्नुथ, अमेरिकन गणितज्ञ व संगणकशास्त्रज्ञ.
१९४० – येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
१९५० – नाजुबाई गावित, आदिवासी समाजसेविका.
१९७४ – ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.
१९७५ – जेम्स कर्टली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९८१ – जेहान मुबारक, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
६८१ – पोप अगाथो.
१०९४ – खलिफा अल् मुस्तान्सर.
१२७६ – पोप ग्रेगोरी दहावा.
१७६० – दत्ताजी शिंदे, पानिपतच्या पहिल्या युद्धातील मराठा सरदार.
१८६२ – सॅम्युएल कोल्ट, अमेरिकन संशोधक.
१९१७ – बफेलो बिल कोडी, अमेरिकन साहसवीर.
१९९९ – आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
१९२२ – ओकुमा शिगेनोबु, जपानाचा आठवा पंतप्रधान.
१९६६ – लालबहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.
१९९९ – आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर, भारतीय स्वातंत्र्यसैनिक व समाजवादी विचारवंत.
२००२ – पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी.आर. व्यास, ख्यालगायकव बंदिशकार.
प्रतिवार्षिक पालन-
मार्गारेट थॅचर दिन – फॉकलंड द्वीप.
वर्धापनदिन : मुंबईचे छत्रपती शिवाजी संग्रहालय (१९२२)
जागतिक हास्य दिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
मनाचे श्लोक
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
चल रे चल गड्या झिंमा खेळूया
वडा्च्या पारंब्यावरती झिंमा खेळूया
उन्हाळ्याची सुटी लागली
आजोबाच्या गावांला जाऊ या , चल रे चल..
आजोबाचे दूर गांव
नांव नाही मलां ठांव, चल रे चल..
गांव किती लहान ते
शेत किती छान ते, चल रे चल..
आजोबांच्या आमराईतील
गोड आंबट कैरया खाऊया, चल रे चल..
गण्या, दिन्या अनं बाळू सोबत
आबडूबली अनं लपाछपी खेळू या, चल रे चल…
अंगनातील झोपाळ्यावर झोके घेऊया
झोपतांना रात्रीच्या चांदण्यात न्हाऊया, चल रे चल…
सामान्यज्ञान
किल्ले माहिती-
सिंहगड
महाराष्ट्रातील एक प्रसिद्घ डोंगरी किल्ला. तो पुणे जिल्ह्यातल्या हवेली तालुक्यात पुण्याच्या नैर्ऋत्येस सु. २० किमी. वर वसला आहे. त्याच्या पुणे दरवाजापर्यंत जाण्यास मोटार रस्ता आहे. याचा नामोल्लेख कागदोपत्री कुंधाना,कोंढाणा, बक्षिंदाबक्ष, सिंहगड वगैरे भिन्न नावांनी आढळतो. त्याची सस. पासून उंची १,३१६ मी. व पायथ्यापासून ७०१ मी. असून आकार एखाद्या त्रिकोणी फरशी कुऱ्हाडीसारखा आहे. त्याचे क्षेत्रफळ सु. ७०,००० चौ. मी. आहे.
यास पुणे-डोणजे आणि कल्याण अशी दोन प्रमुख द्वारे आहेत. त्यांवर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, पैकी एक पुणे-डोणजे द्वाराच्या प्रवेशद्वारातून व दुसरा शिवापूर-कोंढणपूर (पुणे-सातारा रस्त्यावरील) गावांवरुन कल्याण द्वारापर्यंतचा होय. शिवकालात दुसरा मार्ग उपयोगात होता. पेशवाईत पुणे दरवाजा अधिकतर उपयोगात होता.
इतिहास
या गडाचा इतिहास रोमांचकारी व मनोरंजक आहे. सुरुंगाचे पाणी व तेथे जवळच असलेली घोड्याची पागा हे अवशेष मुसलमानपूर्व कालातील निश्चित आहेत, तसेच कोंढाणेश्वर मंदिरातील गर्भगृहाच्या चारही बाजूंची नक्षी व तेथील मानवाकृती शैलीकरणावरुन यादव-कालीन वाटतात. त्यामुळे यादवकाळात (९१०– १३१८) हा किल्ला केव्हा तरी बांधला असावा. तो कुणी आणि केव्हा बांधला याविषयी निश्चित पुरावा उपलब्ध नाही. मुसलमानी कालाच्या आरंभी नाग कोळ्यांच्या अखत्यारीत किल्ला असताना तो मुहम्मद तुघलक (कार. १३२५– ५१) याच्या सरदाराने हस्तगत केला (१३४०).
या किल्ल्याविषयीचा पहिला लिखित निर्देश १३५० मधील इसामलिखित फुतूहुस्सलातीन (शाहनामा-इ-हिंद) या फार्सी ऐतिहासिक महाकाव्यात आढळतो. पुढे १४८२ — ८३ च्या दरम्यान मलिक अहमद बहरी निजामशाह याने तो घेतला. निजामशाही काळात (१४९० — १६०८) हा किल्ला नसीरुल्मुल्क या बंडखोराच्या ताब्यातील काही काळ वगळता सतराव्या शतकापर्यंत निजामशाहीकडेच होता. निजामशाहीच्या पडत्या काळात हा किल्ला आदिलशाही सत्तेकडे गेला. या सुमारास शहाजी भोसले यांना भीमा व नीरा या दोन नद्यांमधील प्रदेश जहागीर म्हणून मिळाला. या प्रदेशातच तो असल्याने शहाजींच्या दृष्ट्या त्यास फार महत्त्व होते. तो कधी त्यांच्या पूर्ण ताब्यात असे, तर कधी आदिलशाहाचा किल्लेदार तिथे असे. स्वराज्याच्या स्थापनेच्या प्रयत्नात छ. शिवाजी महाराजांना सिंहगडसारख्या डोंगरी किल्ल्यांची आवश्यकता वाटू लागली. म्हणून त्यांनी १६४७ नंतर मावळातील अनेक किल्ले जिंकले. त्यात हा किल्ला त्यांनी किल्लेदारास लाच देऊन हस्तगत केला.
तह-
पुढे छ. शिवाजी महाराज व मिर्झाराजा जयसिंग यांच्यातील तहानुसार (१६६५) तो मोगलांकडे गेला; परंतु आग्ऱ्याहून सुटून आल्यानंतर महाराजांनी औरंगजेबाविरुद्घ मोहीम उघडली (१६७०). तीत त्यांनी पायदळाचा एक सेनापती तानाजी मालुसरे ह्याच्या करवी तो किल्ला हस्तगत केला. या वेळी तानाजीने उदयभान राठोड या किल्लेदाराशी युद्घ केले –विशेषतः द्वंद्वयुद्घ केले – आणि दोघेही त्यात मरण पावले.
हा प्रसंग एवढा रोमहर्षक बनला की, त्यावर पुढे पोवाडा व ललित साहित्य निर्माण झाले. तानाजीचे नाव अजरामर झाले. यानंतर कोंढाणा किल्ल्यास ‘सिंहगड’ नाव मिळाले. महाराजांनंतर औरंगजेब दक्षिणेत स्वारीवर आला. त्याने किल्ला घेतला; पण १६९३ मध्ये नावजी बलकवडे या मराठ्यांच्या सरदाराने तानाजीप्रमाणेच पराकम करुन तो जिंकून पुन्हा मराठ्यांच्या सत्तेखाली आणला.
त्यानंतर एखादा अपवाद वगळता तो प्रायः १७५० पर्यंत सचिवांच्या ताब्यात होता. या दरम्यान तिथे छ. राजारामांचे निधन झाले (१७००). त्यानंतर महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाशी सु. सात वर्षे निकराचा लढा दिला. त्या राजारामांच्या समाधिदर्शनाच्या निमित्ताने सिंहगडास जात असत; पण याचा उपद्रव आपणास होईल म्हणून बाळाजी बाजीराव (कार. १७४०–६१) याने तुंग आणि तिकोना किल्ल्यांच्या मोबदल्यात चिमाजी नारायण सचिव यांच्याकडून हा किल्ला घेतला. या किल्ल्याच्या कल्याणद्वाराच्या गणेशपट्टीच्या माथ्यावर बाळाजी बाजीरावाने ‘श्री शालीवाहन शके १६७२ कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान’ हा दोन ओळींचा लेख कोरवून घेतला आहे.
तो पेशवाईअखेर पेशव्यांच्या ताब्यात होता. त्याचा उपयोग मुख्यत्वे एक सुरक्षित स्थान व कैदी ठेवण्यासाठी करीत. निजामाने १७६३ मध्ये पुण्यावर स्वारी केली, तेव्हा पेशवे घराण्यातील सर्व मंडळी सिंहगडावर जाऊन राहिली. नारायणराव पेशव्यांचे लग्नसुद्घा येथेच झाले. दुसऱ्या बाजीरावाविरुद्घ इंग्रजांनी युद्घ सुरु करताच त्याने आपली संपत्ती व पत्नी राधाबाई यांस सुरक्षिततेसाठी सिंहगडावर ठेवले. इंग्रजांनी बाजीरावाचा पाडाव केल्यानंतर १८१८ मध्ये प्रिटझ्लरच्या नेतृत्वाखाली सिंहगड जिंकला. त्यांनी तेथील संपत्ती लुटली तसेच तटबंदी पाडली. स्वातंत्र्यापर्यंत तो इंग्रजांच्या ताब्यात होता.
टाक्या-
सिंहगडावर एकूण ४८ टाकी होत्या. त्यांपैकी चार-पाच सोडता सर्वांत पाणी असे. गणेश, राजाराम, देव आदी टाकी प्रसिद्घ असून देवटाके व सुरुंगाचे पाणीटाके यांत भरपूर पाणी असे. याशिवाय तीन तळी व एक विहीर आहे. गडावर बालेकिल्ला व त्याची सदर, राजमंदिर, थोरली व धाकटी सदर, त्यापुढील बंगला, राजवाडा,जवाहीरखान्यासह सरकारवाडा, अंमलदाराचा वाडा, पुणे वाडा, इस्तादकोठी, भातखळ्याची कोठी, दोन अंबरखाने, दारुखाना, कल्याण दरवाजा, यशवंत, झुंझार, आले व खांदकडा असे चार भक्कम बुरुज, चौक्या, अमृतेश्वर भैरव, कोंढाणेश्वर, गणपती, नरसिंह इ. मंदिरे, राजाराम व तानाजी यांच्या समाध्या, उदयभानचे थडगे, शृंगारचौकी इ. अनेक वास्तू होत्या. त्यांपैकी बऱ्याच १७७१ मध्ये दारुखान्यावर वीज पडल्याने स्फोट होऊन जमीनदोस्त झाल्या. काहींची दुरुस्ती झाली आणि काही नवीन बांधण्यात आल्या.
त्यांत लो. टिळकांचा बंगला आहे. आज यांतील थोड्या वास्तू सुस्थितीत अवशिष्ट आहेत. त्यांपैकी छ. राजारामांची समाधी, तानाजीची समाधी, जवाहीरखाना, दारुखाना,राजवाड्याचे अवशेष आणि कोंढाणेश्वर व अमृतेश्वर भैरव ही दोन मंदिरे इ. प्रेक्षणीय आहेत. दरवर्षी फाल्गुन वद्य नवमीला (मार्च-एप्रिल) राजारामांच्या समाधीचा उत्सव असतो, तर तानाजीच्या समाधीचा उत्सव प्रतिवर्षी माघ वद्य नवमीला भरतो.
सांप्रत येथे दूरदर्शन केंद्राची आदायी (रिसेप्टिव्ह) यंत्रणा व मनोरा असून अनेक गिर्यारोहक ट्रेकिंगच्या निमित्ताने सिंहगडला भेट देतात. शिवाय पुण्याच्या सान्निध्यामुळे हे एक सफरीचे पर्यटनस्थळ म्हणून झपाट्याने विकास पावत आहे. त्या निमित्ताने येथील परिसरात हॉटेलिंगचा व्यवसाय वाढत आहे.