11 जानेवारी दिनविशेष
सप्तरंगी परिपाठ
आज वार- बुधवार,
दिनांक- 11/01/2023,
मिती- पौष कृ. 4
शके– 1944,
सुविचार- कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !
आजचा दिनविशेष-
लालबहादूर शास्त्री पुण्यतिथी
ठळक घटना आणि घडामोडी-
बारावे शतक-
११५८ – व्लादिस्लाव दुसरा बोहेमियाच्या राजेपदी.
सतरावे शतक-
१६९३ – सिसिलीमध्ये माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक.
अठरावे शतक-
१७८७ – विल्यम हर्शलने टायटेनिया व ओबेरोन या युरेनसच्या उपग्रहांचा शोध लावला.
एकोणिसावे शतक-
१८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – अलाबामा अमेरिकेपासून विभक्त झाले.
१८६३ – अमेरिकन यादवी युद्ध-आर्कान्सा पोस्टची लढाई – उत्तरेच्या जॉन मॅकक्लेर्नान्ड व डेव्हिड पोर्टर या सेनापतींनी आर्कान्सा नदीवर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.
१८६७ – बेनितो हुआरेझ पुन्हा मेक्सिकोच्या अध्यक्षपदी.
१८७९ – दक्षिण आफ्रिकेत ॲंग्लो झुलु युद्ध सुरू झाले.
विसावे शतक-
१९१६ – नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
१९१९ – रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया बळकावले.
१९२२ – मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
१९३५ : श्वेतबटू ताऱ्यांच्या वस्तुमान मर्यादेवरून चंद्रशेखर आणि एडिंग्टन यांचा वाद. (पुढे चंद्रशेखरना याच शोधासाठी नोबेल)
१९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने नेदरलंड विरुद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला.
१९४२ – दुसरे महायुद्ध – जपानने कुआलालंपुर जिंकले.
१९४३ – दुसरे महायुद्ध – युनायटेड किंग्डम व अमेरिकेने चीनमधील हक्क सोडले.
१९४९ – लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.
१९५५ – नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.
१९६० – चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.
१९६२ – पेरूमध्ये हुआस्कारन ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००० ठार.
१९६६ – गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९७२ – बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.
१९८० – बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शोर्ट वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
१९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.
२००० – छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना
२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००२ : अल्झायमर विकाराचे वेळेत निदान करणारी पहिली चाचणी कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजलिस (UCLA) यांनी जाहीर केली.
जन्म-
१३२२ – कोम्यो, जपानी सम्राट.
१३५९ – गो-एन्यु, जपानी सम्राट.
१७५५ – अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.
१८०७ – एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.
१८१५ – जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.
१८५८ – श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.
१८५९ – जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटीश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.
१८६२ – फ्रॅंक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९८ – विष्णू सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.
१९०३ – जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०६ – आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.
१९११ – झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.
१९२७ – जॉनी हेस, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
१९३४ – ज्यॉं क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.
१९४४ – शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.
१९५४ – बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.
१९५५ – आशा खाडिलकर – उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका
१९७१ – सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७३ – राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू-
३१४ – पोप मिल्टिआडेस.
७०५ – पोप जॉन सहावा.
१९२१ – वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.
१९२३ – कॉन्स्टन्टाईन पहिला ग्रीसचा राजा.
१९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी
१९३४ – क्रांतीकारक मास्टर सूर्यसेन यांना चित्तगाव येथे फ़ाशी देण्यात आली
१९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन
१९६६ – लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.यांचे ताश्कंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
१९८३ – घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.
१९९७ – भबतोष दत्ता – अर्थतज्ञ
२००८ – यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
२००८ – सर एडमंड हिलरी – माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यू झीलंडचे गिर्यारोहक
प्रतिवार्षिक पालन-
प्रजासत्ताक दिन – आल्बेनिया.
एकता दिन – नेपाळ.
स्वतंत्रता संघर्ष दिन – मोरोक्को.
चाडचा स्वातंत्र्यदिन
राष्ट्रगीत-
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
प्रतिज्ञा-
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
प्रार्थना-
मनाचे श्लोक
बोधकथा-
पसायदान-
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
देशभक्तीपर गीत-
बालगीत-
सामान्यज्ञान
किल्ले माहिती-
रायगड
रायगड हा समुद्रतळाहून सुमारे ८२० मीटर अंदाजे २७०० फूट उंचीवर आहे. गडावर पोहोचायला जवळ-जवळ १४००-१४५० पायऱ्या आहेत.रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ हे होते. जावळीचा प्रमुख यशवंतराव मोरे हा जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला.
छत्रपति शिवरायांनी,६ एप्रिल १६५६ रोजी रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला.कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद याच्याकडून लुटलेल्या खजिन्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी केला.रायगडाची जागा अवघड ठिकाणी असल्यामुळे तसेच ते सागरी दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे असल्यामुळे छत्रपति शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून निवड केली.
महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. महाराजांचे त्यावेळचे शब्द बखरीत मिळतात. “दीड गाव उंच – देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले – तख्तास जागा हाच गड करावा.”
महाराजांच्या पश्चात सुमारे सहा वर्षे रायगड राजधानी होता. गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक-खुबलढा बुरुज व दोन-नाणे (नाना) दरवाजा. याशिवाय कठीण अश्या हिरकणी कड्यावरुन उतरणार्या हिरकणीची कथा प्रसिद्ध आहेच. गडावर जाण्यासाठी सध्या रोप वे ची सोय आहे.
दळणवळण सुविधा
पुण्याहून रायगडापर्यंत जाण्यासाठी थेट बससेवा आहे. ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा घाटातून महाडमार्गे पाचाडगावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप वेच्या) तळावरून पाचाड खिंडीत येते. येथून आपण पायउतार होऊन अवघ्या १४३५ पायर्या चढून गेलं, की रायगडमाथा गाठता येतो. पण या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस अवघ्या ४-५ मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला म्हणतात “वाघबीळ’ किंवा “नाचणटेपाची गुहा!’ नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड’ असे म्हणू लागले आहेत.
गन्स ऑफ पाचाड
जगातील इतर सर्व गुहांपेक्षा या गुहेची रचना पूर्ण वेगळी आहे. पाचाड खिंडीतून इथवर चढून आले की गुहेचे एक तोंड दिसते. या तोंडातून आत गेले की समोर येणारे दृश्य अचंबित करणारे आहे. दोन गोलाकृती प्रचंड भोके पलीकडील बाजूला आहेत. तिथवर गेले, की पाचाडचा भुईकोट किल्ला, पाचाड गाव व पाचाडपासून ते पाचाड खिंडीकडे येणारा घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या गुहेत सतत वाहणारा थंडगार वारा, एकापाठोपाठ येणार्या थंड वार्याच्या झुळुका आपला सारा थकवा दूर करतात. ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे वस्ती होती. त्याअर्थी इथे जवळपास बारमाही पाण्याचे एखादे नैसर्गिक ठिकाण निश्चित असणार. त्याचा शोध घ्यायलाच हवा. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्ग यात्रींना या वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते. अश्मयुगीन मानवाचे जुने वसतिस्थान, ३ तोंडे असणारी गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा, सतत वाहणारा थंड वारा याचं आकर्षण येथे भेट देणार्याला पडते.
पर्यटनस्थळ
शाळा महाविद्यालयांच्या आणि अनेक पर्यटन कंपन्यांच्या सहली रायगडावर आयोजित केल्या जातात. गडावर दोरवाटेने पाळण्यात बसून जाता येते, तर हजार-बाराशे पायऱ्या चढून रायगडावर पोहोचता येते. पर्यटकांनी अवश्य पाहावी अशी वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा रायगडावर आहे.