29 June | 29 जून दिनविशेष, परिपाठ, Daily Routine

29 June

29 जून दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

आज वार– गुरुवार

दिनांक- 29/06/2023, 29 June

मिती- आषाढ शुक्ल 11

शके– 1945

सुविचार- “Happiness depends upon ourselves.”

“आनंद स्वतःवर अवलंबून असतो.”

म्हणी व अर्थ- साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते.

वाक्प्रचार- काटकसर करणे – बचत करणे
29 JUNE

ठळक घटना आणि घडामोडी

जून २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८० वा किंवा लीप वर्षात १८१ वा दिवस असतो.

बारावे शतक

  • ११९४ – स्व्हेर नॉर्वेच्या राजेपदी.

सतरावे शतक

  • १६१३ – विल्यम शेक्सपियरच्या नाटकांचे पहिले प्रयोग जेथे झाले ते ग्लोब थियेटर आगीत भस्मसात.

एकोणिसावे शतक

  • १८५० – कॅनडात व्हॅनकुवर द्वीपावर कोळसा सापडला.
  • १८८० – ताहिती फ्रांसची वसाहत झाले.

विसावे शतक

  • १९१४ – सायबेरियात जिना गुसेव्हाने रास्पुतिनचा खून करण्याचा प्रयत्न केला.
  • १९२२ – पहिल्या महायुद्धातील शौर्याच्या कृतज्ञतेदाखल फ्रांसने कॅनडाला व्हिमी रीज येथे १ वर्ग कि.मी. जागा तहहयात दिली
  • १९२६ – आर्थर मेइघेन कॅनडाच्या पंतप्रधानपदी.
  • १९५६ – अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.
  • १९७६ – सेशेल्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • १९८६ – आर्जेन्टिनाने १९८६चा फुटबॉल विश्वकप जिंकला.
  • १९९५ – दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये दुकानाची ईमारत कोसळली. ५०१ ठार, ९३७ जखमी.

जन्म

  • १३९७ – जॉन दुसरा,अरागॉनचा राजा.
  • १५९६ – गो-मिझुनू, जपानी सम्राट.
  • १८६१ – विल्यम मेयो, अमेरिकन डॉक्टर व मेयो क्लिनिकचा स्थापक.
  • १८६८ – जॉर्ज एलेरी हेल, अमेरिकन अंतरिक्षशास्त्रज्ञ.
  • १८७१ – श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, मराठी नाटककार, विनोदकार, व वाङ्मय समीक्षक.
  • १९३४ – कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
  • १९३९ – ऍलन कॉनोली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ – चंद्रिका कुमारतुंगा, श्रीलंकेची राष्ट्राध्यक्ष.
  • १९४६ – अर्नेस्टो पेरेझ बॅलादारेस, पनामाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९५६ – पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.
  • १९६५ – पॉल जार्व्हिस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • ६९ – संत पीटर.
  • १२५२ – एबेल, डेन्मार्कचा राजा.
  • १८७३ – मायकेल मधुसूदन दत्त, बंगाली कवी.
  • १८७५ – फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
  • १८९५ – थॉमस हेन्री हक्सले, ब्रिटीश जीवशास्त्रज्ञ.
  • १९९२ – मोहम्मद बुदियाफ, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • २००० – कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर, मराठी ऐतिहासिक कादंबरीकार.
  • २००३ – कॅथेरिन हेपबर्न अमेरिकन अभिनेत्री.

प्रतिवार्षिक पालन

  • स्वातंत्र्य दिन – सेशेल्स.
  • सैनिक दिन – नेदरलँड्स.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देह मंदिर चित्तमंदिर 
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्‍या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

सेवा हाच धर्म 
एका पत्रकारांनी स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्वामी विवेकानंदांना भेटून त्यांच्याकडून चार ज्ञानाच्या गोष्टी शिकाव्याात अशी त्यांची तीव्र इच्छा होती.
त्यां पत्रकारांचे दोन मित्र त्यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्वामी विवेकानंदांचा उल्लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्याचे ठरविले. तिघेही मिळून स्वामीजींकडे गेले.
विवेकानंदांनी तिघांचीही आस्थेने विचारपूस केली.
 या दरम्यान स्वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्या काळात पंजाबात दुष्काळ पडलेला होता. त्यांनी त्यासंदर्भात चर्चा केली. दुष्कांळग्रस्तांसाठी चाललेल्याा मदतकार्याची माहिती घेतली.
त्यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्या.नंतर तिघेही निघाले.
निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्हणाले,”स्वा मीजी, आम्हीच तुमच्यांकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्ही मात्र सामान्य‍ अशा बाबींवरच चर्चा केलीत.
आम्हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.” यावर  स्वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,” मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्या पेक्षा त्याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्त महत्वाचे आहे.
ज्याचे पोट भरलेले नाही त्याला धर्मोपदेश देण्यापेक्षा भाकरी देणे हे महत्वाचे आहे.
तात्पर्य : रिकाम्या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला हो
हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य करायाला हो
करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो
या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो
ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो
कवी : साने गुरुजी

बालगीत

चांदोबा चांदोबा भागलास का ?
निंबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निंबोणीचे झाड करवंदी,
मामाचा वाडा चिरेबंदी !
आई-बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का ?
आता तरी परतुनी जाशील का ?
दूध न्‌ शेवया खाशील का ?
आई बिचारी रडत असेल,
बाबांचा पारा चढत असेल !
असाच बसून राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा, चांदोबा कुठे रे गेला ?
दिसता दिसता गडप झाला !
हाकेला ‘ओ’ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
कवी : ग. दि. माडगुळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) शरीराचे कोणते भाग मिळून धड बनते ?
उत्तर : छाती, पाठ व पोट या तिन्हींचे मिळून धड बनते.
२) हाताचे तीन भाग कोणते ?
उत्तर : दंड, अग्रबाहू आणि पंजा हे हाताचे तीन भाग आहेत.
३) डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास काय म्हणतात?
उत्तर : डोके आणि धड जोडणाऱ्या शरीराच्या भागास मान म्हणतात.
४) पायाचे तीन भाग कोणते ?
उत्तर : मांडी, तंगडी आणि पाऊल हे पायाचे तीन भाग आहेत.
५) अवयव म्हणजे काय?
उत्तर : ठरावीक कामासाठी वापरला जाणारा शरीराचा भाग म्हणजे अवयव होय.

ENGLISH QUESTION

1) Which is the national bird of India?
Ans: Peacock
2) Which is the state bird of Maharashtra?
Ans: Green Pigeon
3) Which bird flies the highest in the sky?
Ans : Kite
4) Who is called the king of birds?
Ans: Eagle
5) Which is the fastest bird on land?
Ans: Ostrich

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#29 june, 29 june 2023, 29 june 2021 panchang, 29 june 2022 special day, 29 june 2023 weather, 29 june 2022 panchang in hindi, 29 june is celebrated as, what is celebrated on 29 june, 29 june 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.