25 Jully | 25 जुलै दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

25 Jully

25 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – मंगळवार

दिनांक- 25/07/2023, 25 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 7

शके– 1945

सुविचार- शिक्षक हे शाळेच्या बगीच्याचे माळी असतात,ते बदलून गेले तरी आठवणींचे फुल आणि मूल त्यांना जीवन प्रवासात कधीच विसरत नाही.

म्हणी व अर्थ : आईजीच्या जिवावर बाईजी उदार – दुसऱ्याचा पैसा दान करून स्वतः चा बडेजाव दाखविणे.

वाक्प्रचार- तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.

बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मंगळवारी पुण्यात; मदनदास देवी यांच्या अंत्यसंस्काराला राहणार उपस्थित
इर्शाळवाडीसाठी चंद्रकांत पाटलांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे ११ लाखांचा मदतीचा धनादेश सुपूर्द
कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे, नदीकाठच्या गावांचे स्थलांतर सुरू
अमरावती – अमरावती जिल्ह्या बँकेच्या अध्यक्षपदी बच्चू कडू, यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का
राज्यात विकासाचा महायज्ञ राबविण्यात येत आहे – मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान
वर्षा सहलीला सिंहगडावर प्रचंड गर्दी; जवळपास राहणाऱ्या पुणेकरांचाही मूड ऑफ
सोलापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत सोलापुरात; थोड्याच वेळात विजयपूरकडे मार्गस्थ होणार
नाशिक: मुक्तीधाममागील आनंदनगर भागात बिबट्याचा राजू शेख नामक पादचाऱ्यावर हल्ला
मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक ठप्प, दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा
अमरावती – ब्राह्मणवाडा थडी येथे पूर्णा नदीपात्रात एक तरुण वाहून गेला, शोएब असलम सौदागर असे तरुणाचे नाव

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०६ वा किंवा लीप वर्षात २०७ वा दिवस असतो.

चौथे शतक

  • ३०६ – कॉन्स्टॅटाईन पहिला रोमन सम्राटपदी.

नववे शतक

  • ८६४ – इंग्लंडचा राजा टकल्या चार्ल्सने व्हाईकिंग लुटारूंपासुन संरक्षणासाठी तटबंदी उभारण्यास सुरुवात केली.

सोळावे शतक

  • १५४७ – हेन्री दुसरा फ्रांसच्या राजेपदी.
  • १५९३ – फ्रांसचा राजा हेन्री चौथ्याने जाहीररीत्या कॅथोलिक धर्म स्वीकारला.

अठरावे शतक

  • १७९७ – स्पेनच्या तेनेरीफ द्वीपांवरील हल्ल्यात होरेशियो नेल्सनने ३०० सैनिक व स्वतःचा उजवा हात गमावला.
  • १७९९ – नेपोलियन बोनापार्टने ईजिप्तमधील अबु किर जवळ ओट्टोमन सैन्याचा पराभव केला.

एकोणिसावे शतक

  • १८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – अमेरिकन काँग्रेसने जाहीर केले की युद्ध हे गुलामगिरीच्या विरुद्ध नसून देशाची एकसंधता कायम ठेवण्यासाठी आहे.
  • १८६८ – वायोमिंगला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
  • १८९४ – पहिले चीन-जपान युद्ध सुरू.
  • १८९८ – अमेरिकेने पोर्तोरिकोवर आक्रमण केले.

विसावे शतक

  • १९०७ – कोरिया जपानच्या आधिपत्याखाली आले.
  • १९०८ – किकुने इकेदाने मोनोसोडियम ग्लुटामेट(आजिनोमोटो)चा शोध लावला.
  • १९०९ – लुई ब्लेरियोने प्रथम विमानातून इंग्लिश खाडी पार केली.
  • १९१७ – कॅनडात आयकर लागू
  • १९२५ – सोवियेत संघाची वृत्तसंस्था तासची स्थापना.
  • १९३४ – ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.
  • १९४४ – दुसरे महायुद्ध-ऑपरेशन स्प्रिंग – तुंबळ युद्धात ५,०२१ ठार, १३,०००पेक्षा जास्त जखमी.
  • १९५२ – पोर्तोरिकोने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९५६ – अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.
  • १९५६ – नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.
  • १९७३ – सोव्हिएत संघाचे मार्स ५ हे अंतराळयान प्रक्षेपित.
  • १९७८ – जगातील प्रथम टेस्ट ट्यूब बेबी लुईझ जॉय ब्राऊनचा इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे जन्म.
  • १९८४ – सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्तोस्काया अंतराळात चालणारी प्रथम महिला अंतराळवीर.
  • १९९४ – इस्रायेल व जॉर्डनमधले १९४८पासूनचे युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
  • १९९५ – पॅरिसच्या उपनगरी रेल्वेत स्फोट. ८ ठार, ८० जखमी.
  • १९९७ – के.आर. नारायणन भारताच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९९९ – लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली पहिली टुर दि फ्रांस सायकल शर्यत जिंकली.

एकविसावे शतक

  • २००० – एर फ्रांस फ्लाइट ४५९० हे कॉॅंकोर्ड विमान पॅरिस विमानतळावरून उडताच कोसळले. जमिनीवरील चौघांसह ११३ ठार.
  • २००७ – प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपतीपदी.

जन्म

  • ११०९ – अफोन्सो पहिला, पोर्तुगालचा राजा.
  • १५६२ – केटो कियोमासा, जपानी सामुराई.
  • १८४८ – आर्थर बॅलफोर, युनायटेड किंग्डमचा ३३वा पंतप्रधान.
  • १९०८ – बिल बोव्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२९ – सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
  • १९७८ – लुईस ब्राऊन, पहिली मानव टेस्टट्यूब बेबी

मृत्यू

  • १४०९ – मार्टिन पहिला, सिसिलीचा राजा.
  • १४९२ – पोप इनोसंट आठवा.
  • १९३४ – एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
  • १९७३ – लुई स्टीवन सेंट लोरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.

प्रतिवार्षिक पालन

  • गॅलिशिया दिन – गॅलिशिया(स्पेन).
  • संविधान दिन – पोर्तोरिको.
  • प्रजासत्ताक दिन – ट्युनिसीया.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

घोड्याला चांगलीच अद्दल घडली
एका व्यापाऱ्याकडे एक घोडा आणि एक गाढव होते. एके दिवशी तो त्या दोघांना घेऊन बाजाराला निघाला. त्याने गाढवाच्या पाठीवर खूप ओझे लादले होते. घोड्याच्या पाठीवर मात्र काहीच ओझे नव्हते.
वाटेत गाढव घोड्याला म्हणाला, “मित्रा माझ्या पाठीवर चे थोडे ओझे तू घे. मला ते फारच जड होत आहे.”
घोडा म्हणाला, “जड होवो की हलके. मला त्याची पर्वा नाही. ओझी वाहून नेणे हे तुझे काम आहे. व तू ते केलेच पाहिजे. तुझ्या पाठीवरचे ओझे मला घ्यायला सांगू नकोस.”
घोड्याचे हे शब्द एकूण गाढव काहीच बोलला नाही. तसेच निमूटपणे दोघी चालू लागले. थोड्यावेळाने ओझ्या मुळे गाढवाचे पाय लटपटू लागले, त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
व्यापाऱ्याने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने गाढवाच्या पाठीवरचे सर्व ओझे उतरवले. आणि ते सर्व ओझे घोड्याच्या पाठीवर लादले. यानंतर मग ते पुढे चालू लागले.
चालता चालता घोडा मनात म्हणाला, “मी मघाशी गाढवाचे ऐकले नाही. जर त्याच्या पाठीवर चे थोडे ओझे मी घेतले असते, तर मला ही शिक्षा झाली नसती. आता हे सर्व ओझे मलाच बाजारापर्यंत वाहून न्यावे लागेल.
तात्पर्य: इतरांना सहाय्य करा.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी …..
॥२॥

बालगीत

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ?
भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातनं रविवार येतील का रे तीनदा ?
भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?
कवी : मंगेश पाडगावकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) आहार म्हणजे काय ?
उत्तर: दिवसभरात आपण जे खाद्यपदार्थ खातो व पेयपदार्थ पितो त्या सर्वांना मिळून आहार असे म्हणतात.
२) कोकणात जास्त काय पिकतो ?
उत्तर : कोकणात भात भरपूर पिकतो .
३) कोकणातील लोकांच्या आहारात काय असते?
उत्तर : कोकणातील लोकांच्या आहारात मासे व भात असतो.
४)  खूप भूक कोणती कामे केल्यावर लागते ?
उत्तर : अंगमेहनतीची कामे केल्यावर खूप भूक लागते.
५ ) ओला हरभरा बाजारात कोणत्या ऋतूत येतो ?
उत्तर : ओला हरभरा बाजारात हिवाळा ऋतूत येतो.

ENGLISH QUESTION

1) What is the colour of a sunflower?
Ans : Yellow
2) What is the colour of blood in a human body?
Ans : Red
3) What is the colour of a leaf in a plant?
Ans : Green
4) What  colour is the Crow ?
Ans : Black
5) Which color is at the top of the Indian national flag?
Ans : Saffron

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#25 jully, 25 jully 2023, 25 jully 2021 panchang, 25 jully 2022 special day, 25 jully 2023 weather, 25 jully 2022 panchang in hindi, 25 jully is celebrated as, what is celebrated on 25 jully, 25 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.