24 Jully | 24 जुलै दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

24 Jully

24 जुलै दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार – सोमवार

दिनांक- 24/07/2023, 24 Jully

मिती- अधिक श्रावण शुक्ल 6

शके– 1945

सुविचार- आपली सर्व स्वप्न तेव्हाच खरी होऊ शकतात जेव्हा आपल्यामध्ये त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याचं धैर्य असतं. – वाॅल्ट डिस्ने

म्हणी व अर्थ : आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? –  जे मुळात आस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.

वाक्प्रचार-  शेतात राबणे – शेतात कष्ट करणे.

बातम्या

छत्रपती संभाजीनगर : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन रद्द करण्याचा सरकार पक्षाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला.
रायगड – इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर, आणखी तीन मृतदेह काढले बाहेर आहे.
कुर्ला स्थानकात पाणी साचलं! हार्बर रेल्वे ठप्प; मध्ये रेल्वेची वाहतूक उशिराने
हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर आज सकाळपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे.
पुणे – तीन दिवसांत तीन महिन्यांचा पाणीसाठा; खडकवासला धरण साखळीत ३.८५ टीएमसी पाणी
कोल्हापूरच्या दूधगंगा नदी काठावरील गावांचा कर्नाटकमध्ये सामील होण्याचा इशारा, इचलकरंजीसाठीच्या सुळकूड पाणी योजनेवरुन दूधगंगा बचाव कृती समितीचा आक्रमक पवित्रा
रायगड – रोह्याकडून तळ्याकडे येणाऱ्या रस्त्यावर पडवण पूलावरुन पाणी, खबरदारी म्हणून वाहतूक बंद
मणीपर – जयपूरनंतर मणीपूरमध्येही भूकंपाचा धक्का, उखरूल येथे ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा हादरा

ठळक घटना आणि घडामोडी

जुलै २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०५ वा किंवा लीप वर्षात २०६ वा दिवस असतो.

पंधरावे शतक

  • १४८७ – नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले.

सोळावे शतक

  • १५६७ – मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी.

अठरावे शतक

  • १७०१ – ऑंत्वान दिला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले.

एकोणिसावे शतक

  • १८३२ – बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती.
  • १८४७ – आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले.
  • १८६६ – टेनेसी परत अमेरिकेत दाखल.

विसावे शतक

  • १९०१ – प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बँकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका.
  • १९११ – हायराम बिंगहॅम तिसऱ्याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले.
  • १९१५ – ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी.
  • १९२३ – लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली.
  • १९३१ – पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.
  • १९६५ – व्हियेतनाम युद्ध – उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले.
  • १९६९ – सफल चांद्रमोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले.
  • १९७४ – वॉटरगेट कुभांड – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्धचा पुरावा अवैधरीत्या दडवून ठेवला होता.

एकविसावे शतक

  • २००१ – सिमिओन सॅक्स-कोबर्ग-गोथा बल्गेरियाच्या पंतप्रधानपदी.
  • २००२ – आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • २००५ – लान्स आर्मस्ट्रॉॅंगने आपली सातवी टुर दि फ्रांस ही सायकलशर्यत जिंकली.
  • २०१४ – एर अल्जेरी फ्लाइट ५०१७ हे मॅकडोनेल डग्लस एमडी-८३ प्रकारचे विमान मालीमध्ये कोसळले. ११६ ठार.

जन्म

  • १७८६ – जोसेफ निकोलेट, फ्रेंच गणितज्ञ व शोधक.
  • १८५१ – फ्रीडरिक शॉटकी, जर्मन गणितज्ञ.
  • १८६७ – फ्रेट टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९७ – आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक.
  • १९१७ – जॅक मोरोनी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ – अझीम प्रेमजी, भारतीय उद्योगपती.
  • १९४७ – झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ – कार्ल मलोन, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.
  • १९६४ – बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
  • १९६९ – जेनिफर लोपेझ, अमेरिकन गायिका.

मृत्यू

  • ११२९ – शिराकावा, जपानी सम्राट.
  • १८६२ – मार्टिन व्हॅन ब्युरेन, अमेरिकेचा ८वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७० – पीटर दि नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
  • १९८० – पीटर सेलर्स, ब्रिटीश अभिनेता.
  • १९९६ – मोहम्मद फराह ऐदीद, सोमालियातील नेता.

प्रतिवार्षिक पालन

  • सिमोन बॉलिव्हार दिन – इक्वेडोर, व्हेनेझुएला.
  • बाल दिन – व्हानुआतु.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

देव दयेचा अथांग सागर
विश्वचि मानी तो आपुले घर
मेघ- घटातुनी जल
तो ओती मातीतून
तो पिकवी मोती
अवघे जीवन त्याच्या हाती
नाव तयाचे कणाकणावर
आईरूपे तो माया करितो
पिता होउनी सदा रक्षितो
गुरूस्वरूपे ज्ञान शिकवितो
तिन्ही जगांचा तो जगदीश्वर
राम होउनी वचन पाळतो
कृष्णमुखाने गीता सांगतो
बुद्ध होउनी शांती निर्मितो
अनंत रूपे, एकच ईश्वर
  1. असो तुला देवा माझा 
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा 
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9.  खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती 

बोधकथा

मूर्ख गाढव
 एकदा प्राण्यांमध्ये रोगाची साथ सुरू होऊन हजारो प्राणी मरू लागले. आपण फार पाप केल्यामुळे देवाने हा कोप केला आहे असे सर्व प्राण्यांना वाटून त्यांनी आपली वाईट कृत्ये कबूल करायचे ठरविले.
व जो सर्वात मोठा अपराधी ठरेल त्याने देवाच्या कोपाला शांत करण्यासाठी बळी जावे असे ठरले.
ठरल्या वेळी सगळेजण हजर झाले व न्यायाधीशाच्या जागी एकमताने कोल्ह्याची निवड केली गेली. प्रथम सिंहाने पुढे होऊन कबुली दिली, ‘मी फार गरीब कोकरांना ठार मारलं, एवढंच नव्हे तर फार भूक लागल्याने एका धनगरालाही ठार मारून खाल्लं.
त्यावर न्यायाधीश म्हाराज मोठ्या गंभीरतेने म्हणाले, ‘एखाद्या सामान्य प्राण्याने अशा गोष्टी केल्या असत्या तर नक्कीच मोठा अपराध ठरला असता.
पण महाराजांना इतरांपेक्षा जास्त सवलती असतात. मूर्ख बकऱ्या नि एकच धनगर खाणं हा काही मोठा अपराध नाही.
या निकालामुळे हिंस्त्र प्राण्यांनी कोल्ह्याची तारीफ केली. यानंतर वाघ, चित्ता, अस्वल वगैरे प्राण्यांनी आपापल्या कबूली दिल्या व कोल्ह्याने वरीलप्रमाणेच निकाल दिला.
शेवटी एक गरीब गाढव पुढे येऊन म्हणाले, एका शेतकऱ्याच्या इनाम जमिनीतलं मूठभर हिरवं गवत मी खाल्लं. आणि त्याबद्दल मला पश्चात्ताप’ काय पश्चात्ताप ?’ न्यायाधीश झालेले कोल्होबा ओरडले.
अरे पाप्या नक्कीच तुझ्या पापामुळे सध्या हा देवाचा कोप झालेला आहे. यालाच मरणाची शिक्षा योग्य आहे !’ असा निकाल कोल्होबांनी देताच सगळ्यांनी मिळून त्या बिचाऱ्या गाढवाला ठार मारले.
तात्पर्य – बळी तो कान पिळी

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥
अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी …..
॥२॥

बालगीत

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
ढगांशि वारा झुंजला रे
काळाकाळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी, वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच !
झरझर धार झरली रे
झाडांचि भिजली इरली रे
पावसात न्हाऊ, काहितरि गाऊ
करुन पुकारा नाच !
थेंबथेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानांत वाजती रे
पावसाच्या रेघांत, खेळ खेळु दोघांत
निळ्या सौंगड्या नाच !
पावसाचि रिमझिम थांबली रे
तुझिमाझि जोडी जमली रे
आभाळात छान छान, सातरंगी कमान
कमानीखाली त्या नाच !
कवी : ग. दि. माडगूळकर

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

1) परिसराचे प्रमुख चार घटक कोणते?
उत्तर : मानव, वनस्पती, प्राणी आणि पक्षी
२) बीजांकुरण म्हणजे  काय ?
उत्तर : अंकुर फुटण्याच्या प्रक्रियेला बीजांकुरण असे म्हणतात .
 ३) मुला-मुलींची उंची वयाच्या कितव्या वर्षापर्यंत वाढते?
उत्तर : मुलामुलींची उंची वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत वाढते.
४) वनस्पतीचे अन्न कोठे तयार होते ?
उत्तर : वनस्पतीचे अन्न पानात तयार होते.
५) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?
उत्तर : महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे १९६० रोजी झाली.

ENGLISH QUESTION

1) What is your favourite colour  ?
– Green / Pink / Yellow
2) What is your favourite friend  ?
– Sudam/ Mahesh / Manisha
3) What is your favourite teacher ?
– Mr.Dighe / Kadam / Bhagwat
4) What is your favourite game ?
 – Cricket/ Kabaddi
5) What is your favourite prayer ?
– Deva tuze kiti / Satyam shivam sundra

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#24 jully, 24 jully 2023, 24 jully 2021 panchang, 24 jully 2022 special day, 24 jully 2023 weather, 24 jully 2022 panchang in hindi, 24 jully is celebrated as, what is celebrated on 24 jully, 24 jully 2022,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.