24 November | 24 नोव्हेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

24 November

24 नोव्हेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार-  शुक्रवार 

दिनांक-  24/11/2023, 24 नोव्हेंबर

मिती-  कार्तिक शुक्ल 12

शके- 1945

सुविचार- All things are possible because you are alive. तुम्ही जिवंत आहात म्हणून सर्व काही शक्य आहे.

म्हणी व अर्थ –  उचलली जीभ लावली टाळ्याला – विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे.

ठळक घटना आणि घडामोडी

नोव्हेंबर २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२८ वा किंवा लीप वर्षात ३२९ वा दिवस असतो.

  • १९२२ – आयरिश मुक्त राष्ट्राने लेखक आणि आयरिश रिपब्लिकन आर्मीचा सदस्य अर्स्किन चाइल्डर्स आणि इतर आठांना बेकायदेशीर रीत्या रिव्हॉल्वर बाळगल्याबद्दल गोळ्या घालून मृत्युदंड दिला.
  • १९४० – दुसरे महायुद्ध-स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध-यु.एस.एस. लिस्कोम बे या युद्धनौकेला टोरपेडो लागून बुडाली. ६५० ठार.
  • १९४३ – दुसरे महायुद्ध-टोक्योवर ८८ अमेरिकन लढाऊ विमानांनी हल्ला चढवला. जपानी राजधानीवर झालेला हा पहिलाच थेट हल्ला होता.
  • १९६३ – जॉन एफ. केनेडीचा खून करणाऱ्या ली हार्वे ऑसवाल्डचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबीने खून केला. योगायोगाने या प्रसंगाचे दूरचित्रवाणीवर देशभर प्रक्षेपण झाले.
  • १९६५ – जोसेफ डेझरे मोबुटुने कॉंगोमध्ये उठाव करून सत्ता बळकावली.
  • १९६६ – टॅब्सो फ्लाइट १०१ हे बल्गेरियाचे विमान चेकोस्लोव्हेकियाच्या ब्रातिस्लावा शहराजवळ कोसळले. ८२ ठार.
  • १९७१ – डी.बी. कूपरने नॉर्थवेस्ट ओरियेंट एरलाइन्सच्या विमानातून लुटीच्या दोन लाख अमेरिकन डॉलर सह पॅराशूटच्या साहाय्याने उडी मारली. कूपरचा मागमूस आजतगायत लागलेला नाही.
  • १९७६ – तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या भूकंपात ४,०००-५,००० मृत्युमुखी.

जन्म

  • १६५५ – चार्ल्स अकरावा, स्वीडनचा राजा.
  • १६९० – हुनिपेरो सेरा, स्पेनचा ख्रिश्चन धर्मप्रसारक.
  • १७८४ – झकॅरी टेलर, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८५३ – बॅट मास्टरसन, अमेरिकन गुंड.
  • १८६९ – ॲंतोनियो ऑस्कार कार्मोना, पोर्तुगालचा ९७वा पंतप्रधान आणि ११वा राष्ट्राध्यक्ष.
  • १८७७ – आल्बेन बार्कली, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १८७७ – कावसजी जमशेदजी पेटीगरा, भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचा (सी.आय.डी.) कमिशनर.
  • १८८४ – इत्झाक बेन-झ्वी, इस्रायेलचा राष्ट्राध्यक्ष.
  • १८८७ – एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी
  • १८८८ – डेल कार्नेगी, अमेरिकन लेखक.
  • १८९४ – हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९९ – वन यिदुओ, चिनी भाषेमधील कवी, लेखक.
  • १९४६ – टेड बंडी, अमेरिकन मारेकरी.
  • १९५५ – इयान बॉथम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ – अरुंधती रॉय, भारतीय लेखक.
  • १९७८ – कॅथरिन हाइगल, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू

  • ६५४ – सम्राट कोतोकू, जपानी सम्राट
  • १८४८ – विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
  • १९२९ – जॉर्जेस क्लेमेन्सू, फ्रांसचा पंतप्रधान
  • १९६३ – मारोतराव कन्नमवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
  • १९६५ – अब्दुल्ला तिसरा अल-सलीम अल-साबाह, कुवैतचा अमीर
  • १९९१ – फ्रेडी मर्क्युरी, ब्रिटिश संगीतकार
  • २००९ – समाक सुंदरावेज, थायलंडचा पंतप्रधान

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

 नमने वाहुनि स्तवने
नमने वाहुनि स्तवने उधळा, जयजयकार करा
बंधुहो, जयजयकार करा
सकल मनांचा विकास येतो आज आपुल्या घरा.
विमलहास्यसुमवृष्टीमध्ये असो तुझे स्वागत
निरंतर असो तुझे स्वागत
परमात्म्याच्या चित्सौंदर्या, येई बा हासत.
आत्मवेलिच्या स्फूर्तिफुलांवर वसंत जे विकसती
बुद्धिचे वसंत जे विकसती
त्याच वसंता त्वदीय विकासा, सरस्वती बोलती.
विश्वकाव्य वाचीत बैसली चित्तमयूरावरी
दीप्‍ती जी चित्तमयूरावरी
त्या दीप्‍तीला, त्या ज्ञप्‍तीला, वदती वागीश्वरी.
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

 गरुड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले. घुबड गरुडास म्हणाले,” गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना? ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखाद्या पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीती वाटते,”गरुड म्हणाला, ” खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.
घुबड म्हणाले, ” ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते.
या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल. “
पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली. त्यांजकडे पाहून तो म्हणाला,  किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही ! आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.” असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला !
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ” गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.” गरुड म्हणाला, ” मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे. तू आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखता आली नाहीत.
इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?
तात्पर्य-
स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

एक सुराने गाऊ
हिंदू , मुस्लिम , बौद्ध , ख्रिस्तीअन , सीख आपण भाऊ
या देशाचे भविष्य घडवू , एक जुटीने राहू ll धृ ll
काश्मीर ठेवे भाल उंच ते नंदनवन ही साजे
जलधि मधे चरण टाकुनी , कन्याकुमारी विराजे
हिमालयाची ढाल घेवूनी , फडकत ठेवे बाहु ll १ ll
या देशाचे …..
लाल , बाळ अन् पालही लढले , लढली राणी झाशी
लढले गांधी भगतसिंगही , हासत गेले फाशी
जालियनवाला बाग घातली , रक्तामधे न्हावू ll २ ll
या देशाचे …..
कलाम अब्दुल , मनमोहनजी सकलां येथे संथी
महाराष्ट्राच्या प्रतिभा पाटील , गुजराथ मधले मोदी
मंदिर मस्जिद गुरुद्वारा अन् बौद्ध विहारी जावू ll ३ ll
या देशाचे …..
ऑगस्ट पंधरा घेवून येई , स्वातंत्र्याचा उत्सव
जानेवारीची सव्वीस करते , गणराज्याचा महोत्सव
सर्व धर्म समभाव जागवू ,
एक सुराने गावू ll ४ ll
या देशाचे …

बालगीत

झुक झुक झुक झुक अगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
मामाचा गाव मोठा
सोन्याचांदीच्या पेठा
शोभा पाहुन घेऊया
मामाची बायको गोरटी
म्हणेल कुठली पोरटी
भाच्यांची नावे सांगूया
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गुलाबजामुन खाऊया
मामा मोठा तालेवार
रेशीम घेईल हजार वार
कोट विजारी लेऊया

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

१) हदयविकार असणाऱ्या व्यक्तीसाठी कोणते तेल उपयुक्त आहे?
उत्तर : करडई
२) वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?
उत्तर- ०.०४ टक्के
३) खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?
उत्तर – ‘क’ जीवनसत्व
४) निद्रानाश हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो?
उत्तर- ‘ब’ जीवनसत्व
५) हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते ?
उत्तर: ‘ड’ जीवनसत्व

इंग्रजी प्रश्न

1) How many consonants are there in the English alphabet?
Ans. 21 Consonants
2) How many vowels are there in the English alphabet and name them?
Ans. 5 vowels namely a, e, i, o, and u.
3) Which animal is known as the king of the jungle?
Ans. The Lion is known as the king of the jungle.
4) Name the National bird of India?
Ans. The Peacock
5) Name the National animal of India?
Ans. Tiger

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#24 november, 24 november 2023, 24 november 2021 panchang, 24 november 2022 special day, 24 november 2023 weather, 24 november 2022 panchang in hindi, 24 november is celebrated as, what is celebrated on 24 november, 24 november 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.