23 September | 23 सप्टेंबर दिनविशेष, शालेय परिपाठ, Daily Routine

23 September

23 सप्टेंबर दिनविशेष

शालेय परिपाठ, Daily Routine

वार- शनिवार

दिनांक- 23/09/2023, 23 सप्टेंबर

मिती-  भाद्रपद शु. 8

नक्षत्र ~मूळ,
योग ~सौभाग्य, करण ~ बव,
सूर्योदय- 06:27, सूर्यास्त-18:34,

शके– 1945

सुविचार- ज्यानं स्वतःच मन जिंकल. त्याने जग जिंकले . Who won his heart He conquered the world.

म्हणी व अर्थ – आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे

अर्थ :~ अपेक्षे पेक्षा जास्त फायदा होणे.

वाक्यप्रचार- गोडी लावणे – आवड निर्माण करणे.

ठळक घटना आणि घडामोडी

जेष्ठा गौरी विसर्जन

सप्टेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६६ वा किंवा लीप वर्षात २६७ वा दिवस असतो.

एकोणिसावे शतक

  • १८८४ – महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हँड्‌स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची ही सुरुवात होय.

जन्म

  • ६३ – ऑगस्टस सीझर, रोमन सम्राट.
  • ११६१ – ताकाकुरा, जपानी सम्राट.
  • १२१५ – कुब्लाई खान, मोंगोल सेनापती.
  • १७१३ – फर्डिनांड सहावा, स्पेनचा राजा.
  • १७७१ – कोकाकु, जपानी सम्राट.
  • १८६१ – रॉबर्ट बोश, जर्मन उद्योगपती.
  • १८९० – फ्रीडरीश पॉलस, जर्मन सेनापती.
  • १९११ – राप्पल संगमेश्‍वर कृष्णन, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९१४ – ओमर अली सैफुद्दीन तिसरा, ब्रुनेईचा राजा.
  • १९१५ – क्लिफर्ड शुल, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२० – भालबा केळकर, मराठी लेखक, नाट्यअभिनेते.
  • १९३० – रे चार्ल्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९३९ – हेन्री ब्लोफेल्ड, इंग्लिश क्रिकेट समालोचक.
  • १९४३ – तनुजा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
  • १९४९ – ब्रुस स्प्रिंग्स्टीन, अमेरिकन संगीतकार.
  • १९५० – डॉ. अभय बंग.
  • १९५७ – कुमार शानू, पार्श्वगायक.
  • १९६१ – विली मॅककूल, अमेरिकन अंतराळवीर.
  • १९५७ – मोइन खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

  • १९६४ – भार्गवराव विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर, नाटककार.
  • १९९९ – गिरीश घाणेकर – मराठी चित्रपट, जाहिरातपट निर्माते.

राष्ट्रगीत

जनगणमन अधिनायक जय हे

भारत भाग्य-विधाता |

पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,

विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,

उच्छल जलधितरंग,

तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,

गाहे तव जयगाथा,

जनगण मंगलदायक जय हे,

भारत भाग्य-विधाता|

जय हे, जय हे, जय हे,

जय जय जय, जय हे ||

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रतिज्ञा

भारत माझा देश आहे.

सारे भारतीय माझे बांधव आहेत.

माझ्या देशावर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि

विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.

त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता

माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.

मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि

वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन

आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.

माझा देश आणि माझे देशबांधव

यांच्याशी निष्ठा राखण्याची

मी प्रतिज्ञा करीत आहे.

त्यांचे कल्याण आणि

त्यांची समृद्धी ह्यांतच माझे

सौख्य सामावले आहे.

जय हिंद…

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

राज्यगीत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥

भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा

अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा

सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा

दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी

पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी

दारिद्रयाच्या उन्हात शिजला

निढळाच्या घामाने भिजला

देश गौरवासाठी झिजला

दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3

अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

भारताचे संविधान

उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस

सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा

व उपासना यांचे स्वातंत्र्य;

दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा

आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता

आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;

आमच्या संविधानसभेत

आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित

करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रार्थना

गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
  1. असो तुला देवा माझा
  2. देह मंदिर,चित्त मंदिर
  3. सर्वात्मका शिवसुंदरा
  4. केशवा माधवा
  5. या भारतात
  6. इतनी शक्ती हमे देना
  7. सत्यम शिवम सुंदरां
  8. हा देश माझा
  9. खरा तो एकची धर्म
  10. हंस वाहिनी
  11. तुम्ही हो माता
  12. शारदे मां
  13. ऐ मलिक तेरे बंदे
  14. हमको मन की शक्ती

बोधकथा

गरूड आणि घुबड
एक गरुड आणि एक घुबड, फार दिवस एकमेकांशी भांडत असत. शेवटी त्यांनी परस्परांशी मित्रत्वाने वागण्याची शपथ घेतली व एकमेकांच्या पिल्लांस खाऊ नये असे ठरविले.
घुबड गरुडास म्हणाले, ‘गडया ! पण माझी पिल्ले कशी असतात, हे तुला ठाऊक आहे ना?
ठाऊक नसेल, तर ती दुसऱ्या एखादया पक्ष्याची आहेत असे समजून तू त्यांना गट्ट करशील, अशी मला भीति वाटते,’ गरुड म्हणाला, ‘खरेच, तुझी पिल्ले कशी असतात, हे मला मुळीच ठाऊक नाही.’
घुबड म्हणाले, ‘ ऐक तर. माझी पिल्ले फार सुंदर असतात. त्यांचे डोळे सुंदर, पिसे सुंदर, सगळेच काही सुंदर असते. या वर्णनावरून माझी पिल्ले कोणती हे तुला सहज समजेल.
’ पुढे एके दिवशी, एका झाडाच्या ढोलीत, गरुडास घुबडाची पिल्ले सापडली.
त्याच्याकडे पाहून तो म्हणाला, ‘किती घाणेरडी, कंडाळवाणी आणि कुरूप पिल्ले ही !
आपली पिल्ले फार सुंदर असतात, म्हणून घुबडाने सांगितले आहे. तेव्हा, ही घुबडाची पिल्ले खास नव्हते. यास मारून खाण्यास काही हरकत नाही.’ असे म्हणून त्याने त्या पिलांचा फडशा उडविला!
आपली पिल्ले नाहीशी झालेली पाहून घुबड गरुडाला म्हणाले, ‘गडया ! माझी पिल्ले तूच मारून खाल्लीस, असे मला वाटते.’ गरुड म्हणाला, ‘मी खाल्ली खरी, पण तो माझा दोष नव्हे.
आपल्या पिल्लाचे जे खोटेचे वर्णन केलेस, त्यामुळे ती मला ओळखिता आली नाहीत.
इतकी कुरूप पिल्ले घुबडाची नसतील, दुसऱ्या एखादया पक्ष्याची असतील, असे समजून मी ती मारून खाल्ली, यात माझा काय अपराध आहे बरे?’
तात्पर्य : स्वतःसंबंधाची खरी हकीकत लपवून ठेवून, भलतीच हकीकत सांगणारा मनुष्य शेवटी आपणास संकटात पाडून घेतो.

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

पसायदान

आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।

तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥

जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।

भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥

वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।

अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥

चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।

बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।

ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥

किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।

भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।

दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥

येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।

येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

देशभक्तीपर गीत

एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !
अखिल देश पाठीशी, ‘जवान’ व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !
शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !
अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !

बालगीत

पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे
मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ।।धृ।।
इवल्या इवल्या घरट्यात, चिमणा चिमणी राहतात
चिमणा-चिमणी अन्‌ भवती, चिमणी पिल्लेही चिवचिवती ।।१।।
आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी
चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ।।२।।
पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना
हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर, भिंती, दारे ।।३।।

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

प्रश्नमंजुषा

■ पहिले जलविद्युत यंत्र-
    ➜ दार्जिलिंग (१८९७-९८)
■ पहिला आकाशवाणी केंद्र-
    ➜ मुंबई (१९२७)
■ पहिला बोलपट-
    ➜ आलमआरा (१९३१)
■ पहिली पंचवार्षिक योजना-
    ➜ १९५१
■ पहिल्या सार्वत्रिक निवडणुका-
    ➜ १९५२

इंग्रजी प्रश्न

What day is it today?
Ans : Friday
What day was it yesterday?
Ans : Thursday
What day will be tomorrow?
Ans : Saturday
How many days are there in a week?
Ans : Seven
When is the school holiday during the week?
Ans : Sunday

अधिक माहिती मिळवण्यासाठी …..

@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा

Tags

#23 september, 23 september 2023, 23 september 2021 panchang, 23 september 2022 special day, 23 september 2023 weather, 23 september 2022 panchang in hindi, 23 september is celebrated as, what is celebrated on 23 september, 23 september 2023,

शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ

DECLAIMER

वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.

Author: Active Guruji

Blogger

आपल्या प्रतिक्रिया लिहा.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.