23 November
23 नोव्हेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- गुरुवार
दिनांक- 23/11/2023, 23 नोव्हेंबर
मिती- कार्तिक शुक्ल 11
शके- 1945
सुविचार- दुसर्याचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच दया.
म्हणी व अर्थ – आजा मेला नातू झाला
ठळक घटना आणि घडामोडी

नोव्हेंबर २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२७ वा किंवा लीप वर्षात ३२८ वा दिवस असतो.
एकोणिसावे शतक
- १८०८ – तुदेलाची लढाई – फ्रांस व पोलंडने स्पेनचा पराभव केला.
विसावे शतक
- १९०३ – कॉलोराडोच्या गव्हर्नर जेम्स पीबॉडीने क्रिपल क्रीक येथील खाणकामगारांचा संप मोडून काढण्यासाठी सैनिक पाठवले.
- १९१४ – सात महिने मुक्काम ठोकल्यावर व्हेराक्रुझमधून अमेरिकेने आले सैन्य काढून घेतले.
- १९४० – दुसरे महायुद्ध – रोमेनिया अक्ष राष्ट्रांत सामील.
- १९४६ – व्हियेतनाम युद्ध – फ्रांसच्या आरमाराने है फॉंग गावावर केलेल्या हल्ल्यात ६,००० नागरिक ठार.
- १९५५ – युनायटेड किंग्डमने कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या हवाली केला.
- १९८० – इटलीच्या दक्षिण भागात झालेल्या भूकंपांत सुमारे ४,८०० ठार.
- १९८५ – अथेन्सहून कैरोला जाणाऱ्या इजिप्तएर फ्लाइट ६४८ या विमानाचे अपहरण. माल्टामध्ये विमान उतरल्यावर इजिप्तच्या कमांडोंनी[मराठी शब्द सुचवा] विमानावर घातलेल्या धाडीत ६० ठार.
- १९९६ – इथियोपियन एरलाइन्स फ्लाइट ९६१ या विमानाचे अपहरण. कोमोरोस द्वीपांजवळ इंधन संपल्याने हे विमान हिंदी महासागरात कोसळले. १२५ ठार
एकविसावे शतक
- २००३ – जॉर्जियाच्या राष्ट्राध्यक्ष एदुआर्द शेवर्दनात्झेने राजीनामा दिला.
- २००५ – एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- २००७ – एम.एस. एक्सप्लोरर हे क्रुझ शिप[मराठी शब्द सुचवा] आर्जेन्टिना जवळ हिमनगाला धडकून बुडाले. सगळ्या १५४ प्रवासी व खलाश्यांचा बचाव.
जन्म
- ९१२ – ऑट्टो पहिला, पवित्र रोमन सम्राट.
- १२२१ – आल्फोन्सो दहावा, कॅस्टिलचा राजा.
- १६१६ – जॉन वॉलिस, ब्रिटिश गणितज्ञ.
- १७०५ – थॉमस बर्च, इंग्लिश इतिहासकार.
- १७१५ – पिएर चार्ल्स ले मोनिये, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
- १८०४ – फ्रॅंकलिन पीयर्स, अमेरिकेचा १४वा राष्ट्राध्यक्ष.
- १८२० – आयझॅक टॉडहंटर, ब्रिटिश गणितज्ञ.
- १८३७ – योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८५९ – बिली द किड, अमेरिकन दरोडेखोर.
- १८६० – ह्यालमार ब्रॅंटिंग, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडनचा पंतप्रधान.
- १८७२ – मराठी लेखक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वर्ग:मराठी लेखक.
- १८८७ – हेन्री मोझली, ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १८९७ – निरद चौधरी, इंग्लिश लेखक.
- १९२५ – होजे नेपोलियन दुआर्ते, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ – सत्य साई बाबा, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९५० – चक शुमर, अमेरिकन राजकारणी.
मृत्यू
- इ.स. १९८३ – गणेश विनायक अकोलकर, मराठी शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षणविषयक पुस्तकांचे लेखक.
- इ.स. २००० – बाबुराव सडवेलकर, मराठी चित्रकार, कलासमीक्षक आणि चित्रकलेवरील लेखक.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#23 november, 23 november 2023, 23 november 2021 panchang, 23 november 2022 special day, 23 november 2023 weather, 23 november 2022 panchang in hindi, 23 november is celebrated as, what is celebrated on 23 november, 23 november 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.