22 November
22 नोव्हेंबर दिनविशेष
शालेय परिपाठ, Daily Routine
वार- बुधवार
दिनांक- 22/11/2023, 22 नोव्हेंबर
मिती- कार्तिक शुक्ल 10
शके- 1945
सुविचार- एकाग्र चित्ताने केलेल्या कार्याचे फलित म्हणजे यश होय.
म्हणी व अर्थ – कामापुरता मामा – गरजेपुरता गोड बोलणारा, मतलबी माणूस.
ठळक घटना आणि घडामोडी
नोव्हेंबर २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२६ वा किंवा लीप वर्षात ३२७ वा दिवस असतो.
पाचवे शतक
- ४९८ – पोप अनास्तासियस दुसऱ्याच्या मृत्यूनंतर रोमच्या लॅटेरन महालात सिमाकसची तर सांता मारिया मॅजियोर येथे लॉरेन्शियसची पोपपदी निवड झाली.
नववे शतक
- ८४५ – ब्रिटनीच्या राजा नॉमिनोने फ्रॅंकिश राजा टकल्या चार्ल्सचा पराभव केला.
अठरावे शतक
- १७१८ – रॉबर्ट मेयनार्डने समुद्री चाचा एडवर्ड टीच तथा ब्लॅकबीयर्डच्या जहाजावर हल्ला करून त्याला यमसदनी धाडले.
एकोणिसावे शतक
- १८३० – चार्ल्स ग्रे युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
- १८५८ – डेन्व्हर, कॉलोराडो शहराची स्थापना.
विसावे शतक
- १९२२ – हॉवर्ड कार्टर आणि लॉर्ड कॅर्नार्व्होननी तुतनखामनची कबर उघडली.
- १९३५ – चायना क्लिपर हे विमान अलामेडा, कॅलिफोर्नियाहून आपल्या पहिल्या सफरीवर निघाले. मनिलाला पोचायला त्याला एक आठवडा लागला.
- १९४२ – दुसरे महायुद्ध-स्टालिनग्राडची लढाई – जनरल फ्रीडरिश पॉलसने अॅडॉल्फ हिटलरला जर्मन सैन्य पूर्णपणे वेढले गेल्याने मदत पाठवण्यासाठी तार पाठवली.
- १९४३ – दुसरे महायुद्ध-कैरो बैठक.
- १९४३ – लेबेनॉनला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९६३ – डॅलस, टेक्सास येथे अमेरिकेच्या जॉन एफ. केनेडीची हत्या. लिंडन बी. जॉन्सन राष्ट्राध्यक्षपदी.
- १९७५ – फ्रांसिस्को फ्रॅंकोच्या मृत्यूनंतर हुआन कार्लोस स्पेनच्या राजेपदी.
- १९७७ – ब्रिटीश एरवेझने लंडन ते न्यू यॉर्क कॉंकोर्ड या स्वनातीत विमानाची सेवा सुरू केली.
- १९८८ – पामडेल, कॅलिफोर्निया येथे सगळ्यात पहिल्या बी-२ स्पिरिट या स्टेल्थ[मराठी शब्द सुचवा] विमानाचे अनावरण.
- १९८९ – वेस्ट बैरुत येथे लेबेनॉनच्या राष्ट्राध्यक्ष रेने मोआवादची बॉम्बस्फोटात हत्या.
- १९९८ – आल्बेनियाने नवीन संविधान अंगिकारले.
- २००२ – नायजेरियामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार.
- २००५ – एंजेला मर्केल जर्मनीची सर्वप्रथम स्त्री चान्सेलर झाली.
जन्म
- १६४३ – रॉबर्ट कॅव्हेलिये दिला साल, फ्रेंच शोधक.
- १७१० – विल्हेल्म फ्रीडमन बाख, जर्मन संगीतकार.
- १७२२ – ह्रिहोरी स्कोवोरोदा, युक्रेनियन कवी.
- १८०८ – थॉमस कूक, ब्रिटिश प्रवासयोजक.
- १८१९ – जॉर्ज इलियट, इंग्लिश लेखक.
- १८६८ – जॉर्ज नान्स गार्नर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
- १८६९ – आंद्रे गिदे, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच लेखक.
- १८७७ – एंद्रे ऍडी, हंगेरियन कवी.
- १८९० – चार्ल्स दि गॉल, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष.
- १८९८ – वायली पोस्ट, अमेरिकन वैमानिक.
- १८९९ – होगी कारमायकेल, अमेरिकन संगीतकार.
- १९०१ – होआकिन रोद्रिगो, स्पॅनिश संगीतकार.
- १९०४ – लुई युजिन फेलिक्स नेइल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१३ – बेंजामिन ब्रिटन, ब्रिटिश संगीतकार.
- १९१४ – पीटर टाउनसेंड, ब्रिटिश वैमानिक.
- १९२१ – रॉडनी डेंजरफील्ड, अमेरिकन अभिनेता.
- १९३९ – मुलायमसिंह यादव, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री.
- १९४३ – बिली जीन किंग, अमेरिकन टेनिस खेळाडू.
- १९६७ – बोरिस बेकर, जर्मन टेनिस खेळाडू.
- १९७० – मार्व्हन अटापट्टू, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२१ – स्कार्लेट योहान्सन, अमेरिकन अभिनेत्री.
- १९८८ – सुरेश गुप्तारा व ज्योती गुप्तारा, जुळे इंग्लिश लेखक.
राष्ट्रगीत
जनगणमन अधिनायक जय हे
भारत भाग्य-विधाता |
पंजाब, सिंधू, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे तव शुभ आशिस मागे,
गाहे तव जयगाथा,
जनगण मंगलदायक जय हे,
भारत भाग्य-विधाता|
जय हे, जय हे, जय हे,
जय जय जय, जय हे ||
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे.
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि
वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे.
जय हिंद…
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा
दरी दरीतन नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटेखेळती, खेळ जीव घेणी
दारिद्रयाच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3
अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
भारताचे संविधान
उद्देशिका
आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा
व त्याच्या सर्व नागरिकांस
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता
आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर, १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रार्थना
- असो तुला देवा माझा
- देह मंदिर,चित्त मंदिर
- सर्वात्मका शिवसुंदरा
- केशवा माधवा
- या भारतात
- इतनी शक्ती हमे देना
- सत्यम शिवम सुंदरां
- हा देश माझा
- खरा तो एकची धर्म
- हंस वाहिनी
- तुम्ही हो माता
- शारदे मां
- ऐ मलिक तेरे बंदे
- हमको मन की शक्ती
बोधकथा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
पसायदान
आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनिं मज द्यावे । पसायदान हें ॥
जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो ।
भूतां परस्परे पडो । मैत्र जिवाचें ॥
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।
जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥
चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥
किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी ।
भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी ॥
येथ ह्मणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
देशभक्तीपर गीत
बालगीत
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
प्रश्नमंजुषा
इंग्रजी प्रश्न
अधिक माहिती मिळवण्यासाठी …..
@_राष्ट्रगीत विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_मराठी,हिंदी,संस्कृत व इंग्रजी प्रतिज्ञा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बालगीते अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_पसायदान विषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_बोधकथा अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_छान छान गोष्टी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_भारताचे संविधानविषयी अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
@_जय जय महाराष्ट्र माझा mp3 अधिक माहितीसाठी – येथे क्लिक करा
Tags
#22 november, 22 november 2023, 22 november 2021 panchang, 22 november 2022 special day, 22 november 2023 weather, 22 november 2022 panchang in hindi, 22 november is celebrated as, what is celebrated on 22 november, 22 november 2023,
शालेय परिपाठ,परिपाठ दाखवा,मराठी परिपाठ,परिपाठ शायरी,शालेय परिपाठ सूत्रसंचालन,परिपाठ सुविचार,हिंदी परिपाठ
DECLAIMER
वरील सर्व माहिती ही संग्रहित असून आपण पडताळून पहावी. काही चुका असू शकतात. फक्त शैक्षणिक माहिती असल्याने आम्ही कोणतेही कायदेशीर हक्क (copy right) सांगत नाही.